निथ साँग - निंदानालस्तीस मुक्त आणि शिवराळ एस्कीमोंची एक जुगलबंदी गायन-न्याय परंपरा
लेखनप्रकार
कशावरून कुणाच्या भावना दुखावल्या जातील याचा नेम नसतो म्हणून तर आपण मकर संक्रांतीला तीळगूळ घ्या गोड गोड बोला म्हणतो पण अवघ्या दिड - दोन महिन्यात धूलीवंदन आणि होळी येते आणि मग दिल्या घेतल्या शिव्यांची... मनमोकळी उधळण अधिकृतपणे करता येते. गोडगोड बोला हे कृत्रिम संस्कृतीकरण तर शिव्या देऊन मनमोकळे करणे हे अकृत्रिम आणि नैसर्गीक. हि होळीची शिवराळ परंपरा आपण होळीच्या निमीत्ताने जपतो तशीच एक वेगळी परंपरा एस्कीमो लोक जपतात त्या परंपरेला निथ साँग म्हणतात.
एस्कीमोंच्या निथ साँगचे वेगळेपण ? निथ साँग परंपरेची दखल विधी-अनुवंशशास्त्रात (लिगल अँथ्रॉपॉलॉजी) घेतली जाते कारण 'हत्या' हा एक विषय वगळता इतर सर्व तंट्यांचा तक्रारींची दखल म्हणजे केवळ आणि केवळ निथ साँग म्हणजे ज्याच्या/जिच्या विरुद्ध तक्रार आहे त्याला/तिला निथ साँगसाठी तयारी करून आख्ख्या ग्रामसभेसमोर येण्यास सांगणे मग तक्रार असणार्या दोन किंवा जेवढ्या असतील तेवढ्या बाजूचे लोक विशेष रचलेल्या गाण्यांमधून एकमेकांची उणी-दुणी, निंदा नालस्ती, अपमान अगदी सर्व प्रकारच्या शिव्यांच्या आंतर्भावासह, कोणत्याही सेंसॉरशीप शिवाय, गावच्या संपूर्ण जनसमुदायापुढे गायन - जुगलबंदीच्या माध्यमातून करतात. जनसमुदाय ज्यांची बाजू पटते त्यांना वा वा करतो ज्यांना सरते शेवटी सर्वाधिक वा वा मिळाली ती बाजू जिंकली. आणि एकमेकांची निथसाँग सभेत झालेली निंदा नालस्ती हिच काय ती शिक्षा. अर्थात एकदा सभा संपली कि एकमेकांशी मिळून मिसळून वागावयाचे असते.
तीळगूळ खाणार्यांच्या भावना अधिक दुखावतात आणि निथ साँग गाणारे अधिक मोकळेपणाने जगतात तर मग कोणती गोष्ट अधिक योग्य असा प्रश्न पडतो !
वाचने
2660
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
हा लेख वाचून एक जपानी सामाजिक
वा वा!
मस्त!
In reply to मस्त! by पैसा
मला असे पुतळे बर्याच जणांचे
मला असे पुतळे बर्याच जणांचे हवे आहेत!मग बनवा पुतळे अंगणात आणि द्या त्यांना सर्व जनतेसमोर बांबूचे फटके. हाकानाका :)अतिशय मस्त शैलीत एक नेमका
मिसळपाव नसेल त्या एस्किमोंकडे
In reply to मिसळपाव नसेल त्या एस्किमोंकडे by पिवळा डांबिस
(No subject)