Skip to main content

इराणचा अणूकोन

लेखक माहितगार यांनी सोमवार, 02/03/2015 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमेरीकेचे अध्यक्ष बराक ओबामांचे निमंत्रण नसतानाही इस्राएलचे पंतप्रधान आमेरीकी काँग्रेसपुढे भाषण करणार आहेत.

आख्खा मसुर

लेखक जयंत माळी यांनी सोमवार, 02/03/2015 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
मला खुप आवडतो म्हणून शिकलो कराडचा स्पेशल "आख्खा मसूर" साहित्य :- भिजवून फुललेले मसूर दीड वाटी (साधारण अर्धी-पाऊण वाटी कोरडे भिजवावे लागतील, ७-८ तासांसाठी) एक मोठा कांदा - बारीक चिरून एक मध्यम टोमॅटो - बा.चि. टोमॅटो प्युरे - दोन मोठे चमचे कांदा-लसूण मसाला - तिखटाच्या आवडीनुसार हिंग, हळद, मोहरी - फोडणीसाठी तेल, मीठ कृती मसूर कुकरमधे वाफवा. दाणे अखंड आणि वेगळे राहिले पाहिजेत. (म्हणूनच अख्खा मसूर नाव?) तेल तापवून फोडणी करा. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या. टोमॅटोही परता.

मन अतर्क्य....

लेखक निनाद जोशी यांनी सोमवार, 02/03/2015 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी मन खरंच किती चंचलअसतं. मनाचे झालेले समज,मनाने तयार केलेल्या अनेक दिवसांच्या ओळखी पूर्णपणे बदलायलाकाही क्षणच पुरेसे असतात. आपल्याला सर्वात जवळचा वाटणारा व्यक्ती काही क्षणातचइतका परका होतो कि ज्याच्या बरोबर आपण अनेक गोष्टी शेअर केलेल्या असतात त्यालानुसते समोर पाहायला हि आपल्याला नकोसे वाटू लागते. त्याच्याशी बोलणे तर सोडाचत्याचा आवाज ऐकला तरी आपल्या मनातील कोलाहल जागृत होऊ लागतो. अश्यावेळी मनाला शांतकरणे अगदीच अशक्य होते. हे मनाचे बदलच मानवी मनाला अतर्क्य बनवतात.

तुझा प्रवास सुखाचा होवो

लेखक निनाद जोशी यांनी सोमवार, 02/03/2015 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
माझे घरंगळणारे अश्रू तुझ्या पायापाशी पोहोचले ....... तुझा स्पर्ष होताच थोडेसे गालात हसले...... म्हणाले तुझा सहवास फारच मोजका झालाय..... सावलीत बसूनही माझा जीव उन्हाने त्रासालय.... हवीये तुझी भेट काही क्षण तुझे हवे आहेत .... आठवणीचा प्रकाश उजळवायला थोडे भास तुझे हवे आहेत .... जाताजाता तुझी छोटी भेट दे मला .... तू नाही तर तुझा आभास दे मला .... किमान आठवण ठेव माझी हृदयाच्या एका कोपऱ्यात.... अडगळीत का होईना पण राहण्याचे समाधान असेल त्यात.... चाल आता मी धरतो परतीची दिशा.... तुझा प्रवास सुखाचा होवो हीच माझी आशा.... चल आता मी धरतो परतीची दिशा.... तुझा प्रवास सुखाचा होवो हीच माझी आशा....
काव्यरस

मातृभाषेची सेवा

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 02/03/2015 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मातृभाषेचा आदर आणि अभिमान बाळगण्यासाठी इतर भाषांचा अपमान आणि द्वेष करावा हे सर्वस्वी चूक आहे. इतर भाषांचा अपमान करून मातृभाषेची सेवा होत नसून मातृभाषेत बोलून, लेखन वाचन करून, लेखकांची पुस्तके विकत घेऊन त्यांना दाद प्रोत्साहन देऊन, इतर भाषेतील उत्कृष्ट साहित्य मातृभाषेत आणून तसेच शब्दकोश सतत वृद्धिंगत करून ती सेवा घडत असते आणि मातृभाषा टिकून राहते. खरा मातृभाषेचा पुरस्कर्ता इतर भाषाही तेवढयाच तन्मयतेने शिकतो, वाचतो, बोलतो, लिहितो.

आनंदवन प्रयोगवन

लेखक मनिष यांनी सोमवार, 02/03/2015 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
'आनंदवन प्रयोगवन' हे डॉ. विकास आमटेंचे पुस्तक नुकतेच वाचले. आनंदवन, बाबा आमटे ह्यांचे कार्य, शिवाय साधनाताईंचे 'समिधा' आणि डॉ. प्रकाश आमटे ह्यांच्या 'प्रकाशवाटा' ह्या पुस्तकांमधून आनंदवन आणि त्यांचे इतर प्रकल्प ह्यांची ओळख आहेच, तरीही गेल्याच महिन्यात आनंदवनला गेलो असतांना तिथले विविध उद्योग आणि आनंदाने आपल्या कामात रमलेली माणसे बघून स्तिमित झालो होतो. प्रत्यक्ष आनंदवनातल्या ह्या उद्योगांविषयी आणि प्रयोगांविषयी मलातरी आधी फारसे माहित नव्हते.

लावणी – एक मराठमोळी निशाणी (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 02/03/2015 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
‘टांग टांग टांग धडांग टांग टिक टिक..’ असा ढोलकी-हलगीचा आवाज कानावर पडला की सजग होऊन कान टवकारणार नाही तो मराठी माणूसच नव्हे ! तमाशा आणि खास करून लावणी ही खास ‘मऱ्हाटी’पणाची ओळख. मराठी भाषा लोकप्रिय आणि समृद्ध करण्यामध्ये मोलाचा वाटा आहे, तमाशा आणि त्यातही लावणी या नृत्य-प्रकाराचा. तमाशा ही गेल्या दोन शतकांपासून ग्रामीण मराठी माणसाची सर्वात लोकप्रिय लोक-कला आहे. सुरुवातीला मनोरंजनार्थ सुरु झालेल्या या कलेचा पाहता पाहता विकास होऊन ती सामान्य जन-मानसाच्या मुखात, बोलात सहज रुळून गेली.

प्रेमाचे हाय कू (?)

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 01/03/2015 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबी कळ्यांची कत्तल झाली प्रेमाच्या दिनी. कमलिनीच्या प्रेमात बंदिवान भृंग* नाहक प्राण गेला. (*भृंग = भ्रमर. ......मिटता कमलदल होई बंदी हा भृंग. श्वास कोंडून प्राण गेला)

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र.७: निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी रविवार, 01/03/2015 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/30186 या सातव्या स्पर्धेलाही अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. अनेक सदस्यांनी आपली उत्तमोत्तम छायाचित्रे सादर केली. सदस्यांनी दिलेल्या गुणांनुसार पुढीलप्रमाणे पहिले ३ विजेते ठरले आहेत.

व्हिएन्ना - बुडापेस्ट - भाग २

लेखक मधुरा देशपांडे यांनी रविवार, 01/03/2015 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
व्हिएन्ना - बुडापेस्ट - भाग १ आधल्या दिवशी मेट्रोने जाताना संयुक्त राष्ट्रसंघाचे व्हिएन्नातील मुख्यालय दिसले होते. हे आधीपासून भेट देण्याच्या यादीत नव्हते, पण मग रात्री याबद्दल माहिती काढली तेव्हा भेट द्यावी असे वाटले. सकाळी उठून हॉटेलवर भरपेट नाश्ता केला आणि या मुख्यालयाच्या स्थानकावर उतरलो. 'Vienna Internation Centre' च्या या परिसरात 'संयुक्त राष्ट्रसंघ' आणि 'International Atomic Energy Agency' या संयुक्त राष्ट्रसंघाशी निगडीत असलेल्या संस्थेची कार्यालये आहेत.