Skip to main content

अंजनेरीची भग्न मंदिरे

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 09/04/2015 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
अंजनेरी, नाशिकपासून जेमतेम वीसएक किमी असलेले गाव. त्र्यंबकेश्वराला जवळजवळ खेटूनच असलेले. गावापाठीमागेच असलेल्या अंजनेरी -ब्रह्मगिरीच्या सणसणीत कातळीभिंतींमुळे अतिशय लक्ष्यवेधी. अंजनेरी किल्ला आणि कातळकोरीव जैन लेणी ह्याच डोंगरावर. हनुमानाचे जन्मस्थान म्हणून अंजनेरी प्रसिद्ध. ह्याच लहानशा गावात भारतातील एक प्रसिद्ध संस्था आहे ती म्हणजे भारतीय नाणेशोध संस्थान अर्थात 'इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ रिसर्च इन न्यूमिस्मॅटिक स्टडीज'. लोकप्रभेच्या गेल्या पर्यटन विशेषांकात प्रा.

विकिमिडीया कॉमन्सवरील प्रताधिकार त्याग परवान्याच्या अनुवादात साहाय्य हवे आहे

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 09/04/2015 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, विकिमिडीया कॉमन्सवरच्या सदस्यांना Creative Commons Attribution-Share Alike 4.0 International license. ला अनुसरुन छायाचितांचे प्रताधिकार त्याग करण्यासाठी https://commons.wikimedia.org/wiki/Template:Cc-by-sa-4.0 हा परवाना साचा उपलब्ध आहे. सध्या त्याचे लेखन आणि मराठी अनुवाद खालील प्रमाणे आहे. *This file is licensed under the Creative Commons Attribution-Share Alike 4.0 International license.

दिवस असे कि (भाग २ )

लेखक मालविका यांनी गुरुवार, 09/04/2015 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
घरातील कार्य म्हटलं कि कामांचा डोंगर उभा राहतो . बहिणींच्या घरी सुद्धा अशीच खूप कामे होती . त्यातही मुंज घरीच करायची होती . कुठे कार्यालय वगैरे घेवून नाही . म्हणजे अगदी आचारी घरी येउन जेवण बनवणार आणि निमंत्रितांच्या पंगती उठणार . म्हणजे तर अतिशय जय्यत तयारी आवश्यक होती . त्यामुळे आम्ही गेलो ते त्या तयारीला हातभार लावायला म्हणूनच . पहिल्या दिवशी दुपारून पोहोचलो . अगदी जेवायच्या वेळेवर . जेवून झाल्यावर छान झोप काढली . तोपर्यंत माझ्या मुलाला भाच्याची सायकल मिळाली होती . समोर मोठ अंगण पसरलेलं त्यामुळे तो लगेचच रमला . झोप झाल्यावर दुपारचा चहा घेवून फ्रेश झालो .

आमच्या विवाहाची कहाणी - ४

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 09/04/2015 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या विवाहाची कहाणी १ - http://www.misalpav.com/node/30588 आमच्या विवाहाची कहाणी - २- http://www.misalpav.com/node/30631 आमच्या विवाहाची कहाणी - ३- http://www.misalpav.com/node/30795 गुरुवारी हा निर्णय आला होता कि मुलीला पण मुलगा पसंत आहे. म्हणजे आता लग्न ठरले होतेच. रविवारी काय होते याची मला फारशी चिंता नव्हती. शुक्रवार आणि शनिवार आपण तिला फोन करावा कि न करावा या बद्दल मी विचार करत होतो.

प्राइम टाईम आणि व्यक्तिस्वातंत्र्य

लेखक आकाश खोत यांनी गुरुवार, 09/04/2015 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र सरकारने मराठी चित्रपटांना पाठबळ देण्यासाठी एक स्तुत्य असा निर्णय घेतला. राज्यातील मल्टीप्लेक्स चालकांना संध्याकाळी ६-९ अशा मोक्याच्या वेळी मल्टीप्लेक्स मधील एका स्क्रीनमध्ये मराठी चित्रपट दाखवणे बंधनकारक केले आहे. हे न पाळणाऱ्या चित्रपटगृहावर कारवाई करण्यात येईल. हा निर्णय जाहीर करताच त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. मराठी कलाकार आणि मराठी रसिक नक्कीच या निर्णयाबद्दल शासनाचे अभिनंदन करतील. परंतु हिंदी चित्रपटसृष्टीतील काहीजणांना हे पचलेले दिसत नाही. महेश भट, शोभा डे अशा कुठल्याही विषयावर बडबड करणाऱ्या स्वयंघोषित विचारवंतांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

आसवांच्या प्रतिबिंबात

लेखक शब्दानुज यांनी गुरुवार, 09/04/2015 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
चेहयावरचे कापड न हटविण्यास सांगितले म्हणुन आसवांच्या प्रतिबिंबात त्यास पाहिले रक्ताळलेला पोराचा हात हाती घेतला टाहो माझा आभाळ छेदुन गेला हुतात्मांच्या नावात एकाची भर होती युद्धाच्या अग्निकुंडाने पोराचीही आहुती घेतली खांदयावर माझ्या सुनेने हात ठेवला अभिमानाने चेहरा होता प्रफुल्लित झालेला "इथे समोर त्यांचे पदक लावेन आयुष्यभर मी त्यातुन त्यांना पाहेन" "एका पदकासाठी मी पोराला गमावले लाखोंच्या बळीतुन कोणी काय साधले? अव्याहत प्रवास हा का आरंभला बलिदानाचा सोहळा दोन दिवस चालला" "व्यक्तिसापेक्षतेची इथे अपेक्ष्ाच नसते परि पदसापेक्षतेला अनेक मुजरे झडले"

लोकल (लघु भयकथा)

लेखक स्पा यांनी गुरुवार, 09/04/2015 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
पण माझीच चूक आहे असं का वाटतंय मला? साला हा एक विचार मनातून जातच नाहीये, आजचा दहावा दिवस. घरी बसून आहे मी, उद्यापासून ऑफिस ला जावच लागणार, नाहीतर नोकरी जायची. कितीही मन रमवायचा प्रयत्न केला तरी ती रात्र डोक्यातून जातच नाही. ट्रेन चा भयंकर गोंधळ झाला होता त्या रात्री.नाहीतर ११ :३५ ची कसारा किती रिकामी असते. पण त्या दिवशी तब्बल ३ तास ट्रेन बंद होत्या, आणि त्यानंतर सुटणारी हि पहिली ट्रेन होती. काय भयंकर गर्दी होती.मी कसाबसा लटकत भायखळ्याहून आत चढलो. आत कसला जेमतेम दारात उभं राह्यला मिळेल इतकीच जागा होती.ट्रेन दणदणत निघाली,पुढील स्टेशन दादर. मागून लोंढा अंगावर कोसळला, पण आत जायला जागाच नव्हती.

सुगंधा - भाग ३ (अंतिम)

लेखक कविता१९७८ यांनी गुरुवार, 09/04/2015 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
अमोघला आपल्या कानावर विश्वासच बसेना, "अपंग मुल दत्तक घ्यायची काय गरज आहे? आपल्याला मुल होणार नाहीये का? " रागातच तो तीच्यावर ओरडला, त्याने कधी या गोष्टीचा विचारच केला नव्हता. अपंग मुल तर सोडाच पण कधी नॉर्मल अनाथ मुल दत्तक घेण्याचा विचारही त्याच्या मनात आला नव्हता. "हे काय ऐकतोय मी? आपण दुसर्‍याचं मुल दत्तक घ्यायचं, त्या मुलाची काही माहीती नाही, कोण , कुठलं, कोण त्याचे आईवडील काही माहीत नसताना? आणि मुळात आपण ते मुल दत्तक घ्यायचंच का?" ती पार गोंधळुन गेली, "अमोघ माझं ऐकुन तर घ्या ..

एक विचारवंत -शतशब्दकथा

लेखक तिमा यांनी गुरुवार, 09/04/2015 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
एक विचारवंत आणि त्याची बायको विहीरीच्या कांठावर बोलत बसले होते. अचानक तोल जाऊन बायको आंत पडली. विचारवंत घाबरला. त्याला पोहता येत नव्हते.

रोगप्रतिबंधात्मक उपाय २

लेखक आयुर्हित यांनी गुरुवार, 09/04/2015 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
रोगप्रतिबंधात्मक उपाय १ व्यक्ती जर सुखी व आनंदी असेन तर ती व्यक्ती स्वत:ला मोठी भाग्यवान समजत असते. पण जर तीच्या वाट्याला कधीकाळी दु:ख आले तर तीच व्यक्ती त्याचे कारण दुसऱ्याच्या कपाळावर फोडून(नावावर टाकून) मोकळी होते. पण अशाने दु:ख तर कमी होत नाहीच; उलट पक्षी जास्त त्रास व मानसिक कुचंबना होत असते. आपल्याला जर अधिक सुखी, अधिक आनंदी व्हायचे असेल तर मात्र आपण स्वत: (वेळेआधी) ठरवून जे हवे ते (कालांतराने) मिळवू शकतो. याचाच अर्थ मनुष्यजीवनात काय हवे आहे ते आधी ठरवावे लागते व नंतर आपण ठरवलेले मिळवण्यासाठी भरपूर परिश्रम करून व पुरेसा वेळ देवून ते मिळेल याची तजवीज करावी लागते.