गुजरात.......५...... बडोदा-लोथल-जामनगर
बडोद्याला परत आल्यावर प्रथम शोध घेतला मला आवडणार्या एका पदार्थाचा. "उंधियो' याचा उच्चार हाच असवा असे वाटते. परंतू बडोद्यातील उंधियो हा पुण्यातील बाकरवडी असावी. बर्याच ठिकाणी उंधियो संपला अशा पाट्या लागल्या होत्या. शेवटी अलकापुरीत एका दुकानात आम्हाला तो गवसला. दुकानदाराने तो संपत आल्यामुळे जे काही राहिले होते ते प्रथम दाखविले व मग घेण्याचा विचार करावा असे सुचविले. गुजरातमधे एकंदरीत मला प्रामाणिकपणा आढळला. म्हणजे सुटे पैसे प्रत्येक ठिकाणी परत मिळत होते. सिगरेट योग्य भावात सगळीकडे मिळत होती.
बडोद्याला दोन वस्तूसंग्रहालये आहेत त्यातील एक राजघराण्यातीला कोणाचा तरी मृत्यू झाल्यामुळे बंद होते.
मिसळपाव