Skip to main content

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३७

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 08/04/2015 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. "तुमच्या मधली प्रीती अविच्छिन्न राहो." भावार्थ तर कळला होताच..पण त्यातल्या प्रीती.., या शब्दाचा मतितार्थ कळण्यासाठी, मी माझ्या सुभगेसह..एका सर्वस्वी अनोळखी..परंतू जगण्याला नवी दिशा आणि आनंद देणार्‍या नव्या जीवनाच्या वाटेवर निघालो होतो. पुढे चालू... ===================== "गगन...सदन तेजोमय तिमिर हरून करुणाकर दे प्रकाश.... देई अभय...गगन...सदन..." "आत्मू... अरे तुझी ती गाणी किती वस्तू कुठे कुठे विसरायला लावतात रे........!!!

रोगप्रतिबंधात्मक उपाय

लेखक आयुर्हित यांनी बुधवार, 08/04/2015 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
जीवन सदैव आनंदात घालवणे प्रत्येकाला प्रिय असते व प्रत्येकजण त्यासाठी सदैव धडपडत असतो. परंतु कुटुंबातील एखाद्या जवळील व्यक्तीला जर अचानक काही आजार जडला किंवा आजारपणामुळे महिनोंमहिने त्रास सुरु असेल तर कुटुंबातील सर्वांच्या आनंदावर विरजण पडते.

रगडा पॅटिस

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 08/04/2015 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य रगड्यासाठी: १ मोठी वाटी पांढरे वाटाणे स्वच्छ धुवून ६-७ तास भिजवून ठेवणे १/४ टीस्पून हिंग १/२ टेस्पून हळद १-१/२ टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) १ टीस्पून काळा मसाला मीठ चवीनुसार १ टीस्पून चिंचेचा कोळ .

रामायण - कथा - सीता ???

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 07/04/2015 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
(लेखाचा उद्देश्य कुणाची ही भावना दुखविण्याचा नाही. माझ्या दृष्टीने सीता कोण होती, हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे, एवढेच. बाकी ‘हरी अनंत हरी कथा अनंता’.) रामायणात सीते भोवती एक गूढ वलय आहे. सीता पृथ्वीतून प्रगट आणि पुन्हा पृथ्वीच्या कुशीत समावली. आता ही सीता आहे तरी कोण?

नाटक वाटू नये

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 07/04/2015 19:27 या दिवशी प्रकाशित केले.

नाटक वाटू नये


थुंकली थुंकी पुन्हा पुन्हा, उगीच चाटू नये
नाटक सुद्धा असेच वठव की, नाटक वाटू नये

लाख उमटू दे देहावरती, आपुलकीची चरे
पण इवलेसे काळीज माझे, तितुके फाटू नये

नकोस दाखवू दिव्य धबधबे, अत्तरवर्णी झरे
मी मागत नाही फार परंतु; पाझर आटू नये

वरून सांत्वन, आतून चिमटा; नाद तुझा वेगळा
जाणीव इतकी तरी असू दे, मैतर बाटू नये

सपाट टक्कल चमचमी माझे, लोभसवाणे जरी
संधी मिळाली म्हणून त्यावर, पोळी लाटू नये

संगणक घेताना (भाग-१)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी मंगळवार, 07/04/2015 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
संगणक हा आजच्या जगाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. घराघरामधे आता संगणक असणं हे अनिवार्य होतं चाललेलं आहे. बर्याचं जणांना संगणक/ लॅपटॉप आणि त्याच्या अॅक्सेसरीज घेताना नक्की कॉन्फिगरेशन कसं घ्यावं, कुठल्या अॅक्सेसरीज घ्याव्यात, किंमत आणि हार्डवेअरचं गणित कसं जुळवावं हे प्रश्ण पडलेले असतात. मी संगणक क्षेत्रामधला नाही पण संगणकाचं वेडं आणि स्वतः गेमर असल्यानी हार्डवेअर मधली बरीचं माहिती आहे. त्यामुळे संगणक घेताना साधारण काय काय गोष्टी विचारात घ्याव्यात आणि कुठलं हार्डवेअर त्यासाठी उपयुक्त आहे त्याची माहिती मी ह्या लेखाद्वारे द्यायचा प्रयत्न करणार आहे.

सुगंधा - भाग २

लेखक कविता१९७८ यांनी मंगळवार, 07/04/2015 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
अमोघला तातडीने इस्पितळात नेण्यात आले, पायाला फ्रॅक्चर झाले होते, ऑपरेशन करणे गरजेचे होते, तीने लगेचच फोन करुन कळवल्याने आईवडील ही कोल्हापुरला यायला निघालेच होते, तीचा मामा देखील गावाहुन निघाला. मावशी आणि तिचा मुलगा धक्क्यातुन सावरले नव्हते तरीही तिच्या बरोबरच इस्पितळात होते, तिने धावपळ करुन इस्पितळातले सोपस्कार पार पाडले. अमोघच्या ऑफीसमधे कळवुन तिने रजा वाढवुन घेतली. अमोघचे ऑपरेशन झाले, पायात रॉड बसवला गेला.

आज्जीबाईंचे लोणचे........... खलिल जिब्रान

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 07/04/2015 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
एका सरदाराच्या घरात त्याच्या आज्जीबाई राहायच्या. आज्जीबाईना आपल्या स्वैपाकघरातील ओळीने भरून ठेवलेल्या लोणच्यांच्या बरण्यांचा खूप अभिमान होता. ती लोणची आज्जीबाईंनी स्वतः घातली होती. पण त्यातल्या एका बरणीला मात्र त्या कुण्णाला म्हणून हात लावू द्यायच्या नाहीत. त्यात त्यांनी घातलेले खास लोणचे मुरत होते. ते खास लोणचे त्या खास प्रसंगालाच काढणार होत्या. पण तो ‘खास’ प्रसंग कोणता, त्यांनाच माहित! एकदा त्या सरदाराकडे, एक विद्वान परदेशी पाहुणा भोजनासाठी आला. आज्जीबाईंच्या मनात आले, ‘एका परदेशी पाहुण्या साठी वर्षानुवर्षे मुरवलेले लोणचे मी का काढू?

माय चॉईस

लेखक पॉइंट ब्लँक यांनी मंगळवार, 07/04/2015 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
दिपिका काकुन "माय चॉईस" ही चित्रफित दाखवून सर्व जगात खळबळ माजवली आहे. हे औचित्य साधून मूलभुत हक्कांवर सुदृढ चर्चा घडवून आणण्याचा मानस आहे. मिपाकरांनी मनमोकळेपनाने आपले मत व्यक्त करावे अशी नम्र विनंती. अनाहितामध्ये जरी ह्या विषयाचा खिस पाडून कोशिंबर झाली असली तरिही स्त्री वर्गाने इथे भाग घेवून सर्वांच्या ज्ञानात भर घालण्याची कृपा करावी. चर्चेचा पाया मह्णून गेल्या काहि दिवसातील घडामोडी इथे संदर्भासाठी देत आहे.