Skip to main content

उटी-कोडईकॅनल बद्दल माहिती हवी आहे

लेखक त्रिवेणी यांनी गुरुवार, 16/04/2015 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
लोक्स हो मदत करा. 30 एप्रिल ते 4 मे उटी-कोडईकॅनलची ट्रीप बूकिंग मिळाले तर करणार आहोत. मी आपले भटकंतीचे धागे चेक केले पण काही माहिती नाही मिळाली. तर तिकडे भेट दिलेल्या मिपाकरांनी मार्गदर्शन करावे ही विनंती. जर कुणाकडे माहितीतील ड्रायवर किवा गाडी यांचे संपर्क क्रमांक असतील तर तेही द्या.

नाऱ्या नाऱ्या

लेखक चुकलामाकला यांनी गुरुवार, 16/04/2015 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
नाऱ्या नाऱ्या चल्लस खय? मालवणाची माका इल्ली सय. नाऱ्या नाऱ्या पलतस कित्याक? गरज पडलीहा निल्या नित्याक. नाऱ्या नाऱ्या बांद्र्याक काय जाला? तुजे तोंडात शिरो पडो मेल्या. नाऱ्या नाऱ्या तुजा नेसाण सुटला? गप बस मारे , काम कर वायला.
काव्यरस

खाऊगल्ली

लेखक त्रिवेणी यांनी गुरुवार, 16/04/2015 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याचदा आपल्याला एखादी रेसीपी हवी असते मग ती शोधण्यात बराच वेळ जातो आणि कासकाय वर आपले हितचिंतक लगेच उपलब्ध असतील असेही नाही म्हणून थोडक्यात रेसीपी शेअर करण्यासाठी हा धागा. तर चला एकमेका सहाय्य करू--------- अप्पु ताई ही पहिली रेसीपी तुझ्यासाठी ग. वाग्यांची घोटलेली भाजी साठी तेलात मोहरी, जिरं, हिंग, हळद टाकून भरपूर लसूण आणि हिरवी मिरचीची चुरचुरीत फोडणी करून घ्यायची. नंतर त्यात हिरव्या वांग्यांच्या फोडी टाकुन परतवून घ्यायचे आणि भांड्यावर ताटात पाणी टाकुन मस्त दणदणीत वाफ काढायची. 10 मिनिटात वांगी बर्या पैकी शिजतात आता त्यात मीठ टाकुन वरण घोटायच्या रवीने भाजी मस्त घोटून घ्यावी.

राधा …....२

लेखक चुकलामाकला यांनी गुरुवार, 16/04/2015 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
राधा …....१ पहाटवाऱ्यानं सोबत आणलेल्या बासरीच्या सुरांनी राधेला उठवलं . राधेची लगबग चालू झाली . राधा जणू सोळा वर्षाची अल्लड युवती बनली. कितीप्रकारे नटली तरी तिचं समाधान होईना. शेवटी एकदाचा साजशृंगार आटपला आणि ती झपाझप शिवमंदिराच्या दिशेने चालू लागली . सूर्य नुकताच आकाशात डोकावत होता . मंदिरात पोचली तेव्हा तिथं कुणीच नव्हतं . कृष्णाची वाट पाहत ती आवारात बसून राहिली. हळूहळू लोक येऊ लागले. क्वचित कुणाच्या तोंडून त्यांच्या राजाची स्तुती ऐकू येई . आणि इकडे राधेचा उर अभिमानाने भरून जाई .

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४०

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 16/04/2015 04:15 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि ह्या काहिश्या समाधानानी दाटलेल्या हृद्य प्रसंगी, काकूचा निरोप घेऊन आंम्ही घराकडे परतलो. पुढे चालू... =================================================== काहि व्यवसायच असे असतात..की त्यामधे सुट्टी घेण्याचं स्वातंत्र्य असलं,तरी ती मिळण्याचं असेलच असं नाही. आता हेच बघा ना.. मी इकडे दिडदोन महिन्याकरिता आलो आणि त्यातले पंधरावीस दिवस गेले कसे ते खरच कळलं नाही..असं म्हणण्यासारखे दिवस सुखात चाललेले होते.

कुक्कुट शर्विलक-विलाप

लेखक चलत मुसाफिर यांनी बुधवार, 15/04/2015 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
(किंचित्कवी समजून चू.भू.द्या.घ्या.) मालवणातिल सागरलहरी मला खिजविती अष्टौप्रहरी बाण लागता नको तिथे हा पर झाली 'कनका'ची नगरी 'कुक्कुट गेले साथ सोडुनी 'विकास' दिसता दुज्या अंगणी चोचीमधला दाणा जपती नख्या आपुल्या तीक्ष्ण परजुनी 'वाघ' लागला मागावरती 'वांदरे'हि किलकारा करती वनवासातुन सुटका या हो कधी व्हायची? घटिका सरती.. 'सोनिया'सम ते दिन ना उरले 'घड्याळा'तलेही क्षण सरले ठेवावे हे मस्तक ऐसी दिसतिल का चरणांची 'कमले'?
काव्यरस

इतिहासाचे मारेकरी आणि पहारेकरी

लेखक विकास यांनी बुधवार, 15/04/2015 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
सुभाषबाबूंच्या संदर्भातील गेल्या काही दिवसात आलेल्या अधिकृत बातम्यांवरून मिपावर नको इतके चर्वितचर्वण झालेले दिसले. त्यामुळे जरी वरकरणी विषय समान असला तरी चर्चेचे मुद्दे वेगळे आहेत हे कृपया सर्वांनी विचारात घ्यावे. सुभाषबाबूंचा इतिहास हा "आजच्या संदर्भात" सगळा आदर्श नसावा. त्यांच्या उद्देशांवर (देशाचे स्वातंत्र्य) कोणी शंका घेऊ शकेल असे मात्र वाटत नाही... आणि हे मी काही ते सशस्त्र क्रांतीचे सक्रीय समर्थक होते म्हणून म्हणतोय असे समजू नका. त्यात काहीच गैर नव्हते. ज्यांना सक्रीय क्रांती करणे जमले ती त्यांनी केली आणि ज्यांना नि:शस्त्र क्रांती करायची होती ती त्यांनी केली.

ह्युमन रिसोर्स - एक प्रजात

लेखक चिनार यांनी बुधवार, 15/04/2015 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत असं सांगतो की, "कालानुरूप प्रत्येक प्रजातीचा जीव स्वत: मध्ये बदल घडवून आणतो जेणेकरून तो जीव इतर जीवांशी स्पर्धा करूनही टिकून राहू शकतो आणि पुनरुत्पादन करू शकतो" नाही नाही... या सिद्धांतावर आक्षेप नाहीये माझा. किंबहुना आक्षेप घेण्याएवढी पात्रतासुद्धा नाहीये. पण काहीही म्हणा, या डार्विनभाऊंना दूरदृष्टी नव्हतीच. मुळात त्यांनी अभ्यास केलेल्या प्रजातींशिवाय अस्तित्वात येऊ शकणाऱ्या काही प्रजातींकडे त्यांचे दुर्लक्षचं झाले.

वळ्ण

लेखक योगेश भालेकर यांनी बुधवार, 15/04/2015 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
अनोळखी वळणावर माझं आणखी एक पाउल, तू इथं नसतानाही इथंच असल्याची चाहूल, प्रत्येक शब्दं शब्दं मला सगळं स्पष्ट आठवतंय, तुझ्यामाझ्यातलं अंतर मला पुन्हा मागे पाठवतंय, तसं बरंच काही सांगायचं होतं,राहून गेलं, मनात साठलं ते, पावसासकट वाहून गेलं, "तू कसा आहेस?",विचारताना तु़झी घालमेल कळ्लीच, प्रश्न होते नवीन पण आपुलकी तुझी अगदी पहिलीच, थंड पडले होते तुझे ते काळे डोळे, ओठांवर हसु तरी शब्द थोडे ओले, बघ तुला काही अजुनही आठवतंय का? आठवणींच्या गाठोड्यात माझं काही सापडतंय का? गालांवर ओघळ्णार्या माझ्या त्या आठवणी, ओठांवर तरळणार्या माझ्या त्या आठवणी, थरथरत्या हातांत अडकलेल्या माझ्या त्या आठवणी, अन तुझ्या

नारळी अंडा करी

लेखक अनन्त अवधुत यांनी बुधवार, 15/04/2015 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
नारळी अंडा करी फार ललित लिहिता येत नाही, थेट मुद्द्याचे लिहितो. यातला मसाला फ़ळभाजी साठी सुद्धा वापरता येइल. विशेषत: बटाटा. साहित्य: ०१. १ मध्यम बारिक चिरलेला कान्दा ०२. १ टोमॅटोचे चौकोनी आकारात कापलेले तुकडे ०३. १/२ वाटी मटार ०४. २ वाटी नारळाचे दूध ०५. १ टे.स्पून किसलेला लसुण (५-७ पाकळ्या पुरतात) ०६. १ टे.स्पून किसलेले आले ०७. १ टे.स्पून धणे पावडर ०८. १ टे.स्पून जिरे पावडर ०९. १ टे.स्पून तिखट १०. १ टे.स्पून हळद ११. १-२ बारिक कापलेल्या मिरच्या १२. सोयीनुसार तेल (मी १/२ वाटी तेल वापरले होते) १३. १ टे.स्पून मीठ १४. १/२ टे. स्पून हिंग १५. १ टे.स्पून मोहरी १६. १ टे.स्पून गरम मसाला १७.