मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(दि ची कहाणी)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
प्रेम 'दि' च्या आयुष्यातलं एक महत्वाचा वळण आहे. 'प्रेम रतन धन पायो' (दुव्यावर नका जाऊ प्लीज) मधील प्रेम पाहुन मला अनेक मित्र मैत्रीणींनी विचारलं कसं जमतं हो तुम्हाला ? त्यातल्या एका मैत्रीणीने हट्टच केला मलाही प्रेम करायचं आहे. माझ्या प्रेमाबद्दल तशी कोणालाच काही कल्पना नव्हती, मला तरी कुठे होती. माझ्या प्रेमाचं नाव काय ठेवायचं काही ठरलेलं नव्हतं. प्रेमाला नाव नसतंच नै का, पण प्रेमाला उपमा असते. माझ्या प्रेमाची कारागिरी अधिक सुबक व्हावी म्हणुन मी भरपूर प्रॅक्टीस करत होतो. प्रॅक्टीस करता करता माझं प्रेम तांब्या पितळेचं सॉरी माझं प्रेम अतिशय तरल असं बनलं. मैत्रीणीच्या मनातलं मी जनात आणायचं ठरवलं. आम्ही एक स्टाईल ठरवली. मराठी समीक्षेत त्याला शैली असे म्हणतात. मैत्रीणीला हव्या असलेल्या तारखेपर्यंत प्रेम व्यक्त झालंच पाहिजे असं ठरलं त्याच वेळी त्या प्रेमाचं मी दि हे नाव नक्की केलं. राधा-कृष्ण, लैला-मजनु, हिर रांझा, जोधा-अकबर, आणि अशा विविध प्रेम कहाण्यातून काही दगड गोळा केले सॉरी काही प्रेमाची तत्व शोधली. आणि दिच्या प्रेमाला एक आकार आला

(चित्र आवडलं म्हणुन टाकलं आहे, कथेचा आणि नटीच्या चित्राचा काहीही संबंध नाही, तसे कोणाला वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा) 


वाचने 9118 वाचनखूण प्रतिक्रिया 42

In reply to by सतिश गावडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 21/05/2015 - 22:46
२९ वाचने आणि एकच प्रतिसाद नाही..तोही असा मुड घालवणारा. दगड तर नीट मिळायला पाहिजे शब्दांमधे हळुवारपणा यायला. पूर्वीचं मिपा आणि सद्य काळातील मिपा काहीच बदललेलं नाही. मिपा संपादकांना विनंती धागा काढून टाकावा. -दिलीप बिरुटे

In reply to by टवाळ कार्टा

म्हणजे? तुमच्याकडे चलच्चित्रे आहेत की काय? ;) आय मीन या केसमध्ये कधी चलच्चित्रे आल्याचे पाहिले नाही म्हणून विचारतोय हो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सूड 22/05/2015 - 17:52
पूर्वीचं मिपा आणि सद्य काळातील मिपा काहीच बदललेलं नाही. मिपा संपादकांना विनंती धागा काढून टाकावा.
का हो? रागावलातशासे?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेकपटाईत 23/05/2015 - 22:12
बिरुटे साहेब, नाराज होऊ नका. वाचणार्याचा मूड आणि लिहिण्यासाठी वेळ, या दोन बाबी मुळे सुद्धा इच्छा असताना ही पुष्कळदा प्रतिसाद देणे जमत नाही. शिवाय कुठल्या धाग्याला किती प्रतिसाद आणि का याचे गणित अजून तरी मला कळले नाही(कुणालाच कळले नसेल) आहे. याचा अर्थ धागा चांगला किंवा वाईट होत नाही. प्रतिसादाच्या आधारावर लेखनाचा दर्जा ठरत नाही. आपल्या लेखनाबाबत आपणच सर्वश्रेष्ठ समीक्षक असतो. मग दुसर्या कुणाला लेख आवडला नाही किंवा त्यांनी प्रतिसाद दिले नाही तरी काही फरक पडत नाही. बाकी बटाट्याची भाजी, पित्जा, बर्गर सारख्या वस्तू सर्वांनाच आवडतात. असा ही एक भ्रम आहे.

In reply to by विवेकपटाईत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 24/05/2015 - 13:54
गंभीर झालात काय ? (की मी गंभीर झालोय) मुळ धाग्याचं हे विडंबन आता मुळ धागा हरवला आहे. बाकी, प्रतिसादाचा आपण विचार करत नाही. कमी प्रतिसाद यावेत पण दर्जेदार प्रतिसाद यावेत. मिपावर चांगल्या लेखांना चांगले प्रतिसाद येतातच, तो कै प्रश्न नाही. अमुक अमुक वाचनं झाली आणि प्रतिसाद आले नाही, असं म्हणून कोणी आपला संयम घालवू नये असं वाटतं. मिपाकर आपापल्या सद्सदविवेक बुद्धीने आणि सवडीने लेखनाला प्रतिसाद देतात. :) -दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले 21/05/2015 - 22:45
=))

टवाळ कार्टा 21/05/2015 - 22:59
=))

अत्रुप्त आत्मा 21/05/2015 - 23:26
काय शिकार आहे. वाक्यांची टोके घासून थोडी गुळगुळीत करावी लागत असावी ना? तसेच जिलब्यांची वळणे एकसारखी व एकाच आकाराची करण्यासाठी काही इम्रती प्रमाणे करता आले तर पहा. ते 'जिल्बि' चे सु'पाडन आपणच केले आहे का? फार चान आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

एस 22/05/2015 - 11:13
वाक्यांची टोके घासून थोडी गुळगुळीत करावी लागत असावी ना? हो. >> तसेच जिलब्यांची वळणे एकसारखी व एकाच आकाराची करण्यासाठी काही इम्रती प्रमाणे करता आले तर पहा. ओके. (हे बिरुटेसाहेबांनी करायला हवे होते, ते करीनात म्हणून आम्हीच केले! :-) )

कॅप्टन जॅक स्पॅरो 22/05/2015 - 06:27
धागा वाचला नाही पण सईचा फोटो मात्र आवर्जुन पाहिला. मस्तयं. दिवसाची सुरुवात "सै" केल्याबद्दल प्रा.डॉ. तुमचा आभारी आहे.

किसन शिंदे 22/05/2015 - 07:26
खिक्क.. सरांनू ते कदाचित तुम्ही सो काॅल्ड शेलिब्रिटी नसल्यामुळे तुमच्या धाग्याकडे कुणी ढुंकूनही पाह्यले नाही. - ही

In reply to by किसन शिंदे

प्रसाद गोडबोले 22/05/2015 - 14:04
आमच्या धाग्यावर सारे तुटुन पडले आहेत म्हणजे आम्ही सेलिब्रिटी आहोत असे काही अनुमान काढता येईल काय ? ;) =)) ( सौम्य सुधारित आवृत्ती )प्रगो

In reply to by प्रसाद गोडबोले

मंदार दिलीप जोशी 22/05/2015 - 15:22
तुम्ही काढलेला एखादा रडूबाई सिनेमा ऑस्करला गेलाय का? नसल्यास तुम्ही सेलेब्रिटी नाही.

In reply to by मंदार दिलीप जोशी

यशोधरा 24/05/2015 - 16:06
पण ज्या सो कॉल्ड रडूबाई सिनेमाबद्दल तुम्ही बोलताय तो श्वास सिनेमा मात्र खरोखरच उत्तम होता. टिंगल टवाळी करताना ओल्याबरोबर सुकं जळू नये ह्यासाठी ही पोस्ट.

नाखु 22/05/2015 - 09:10
प्रवास सायी पासून सई पर्यंत.
अजून अश्याच अनवट आणि प्रफुल्लीत व्यक्तींची आपण तोंड ओळख करून द्यावी व त्यांच्या कलाकृतीचे रसग्रहण करावे ही विनंती. कलादालन प्रेक्षक नाखु

मदनबाण 22/05/2015 - 14:50
S (चित्र आवडलं म्हणुन टाकलं आहे, प्रतिसादाचा आणि नटीच्या चित्राचा काहीही संबंध नाही, तसे कोणाला वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi

In reply to by मदनबाण

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 22/05/2015 - 19:32
मला हंटर चित्रपट आवडला. पण सईनं छोटी भूमिका मस्त रंगवलीय. सालं तेवढं दृश्य सईनं द्यायलाच पाहिजे होतं का ? असं सारखं वाटत होतं अर्थात आपल्या म्हनण्याला काही अर्थ नसतो. पण एक विवाहित स्री आणि मित्राशी सबंध सहीच व्यक्त झाली आहे, तिचा अभिनय आवडतो मला... ! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाडक्या 22/05/2015 - 20:17
अहो, त्या प्रसंगातला तिचा अभिनय पहा हो. त्या मल्लिका वगैरेस फुल्ल फुटेज दिलं तरी शष्प जमणार नै अस्सा (नैसर्गिक) अभिनय केलाय हो तिने.. ;)

In reply to by हाडक्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 22/05/2015 - 23:15
सईचा अभिनय आवडतो अतिशय नैसर्गिक असा अभिनय तिने केला आहे, '' साला तू तो भाग जायेगा, मेरा क्या'' अतिशय सहज बोलते पण भीड़णारं.... सई बद्दल उलट सुलट ऐकायला येतं पण माणूस जस जसा कारकिर्दीत मोठा होत जातो त्याच्याबद्दल अधिक उणे बोलाल्याच जातं.... मला सै आणि तिचा अभिनय आवडतो हे नम्रपणे नमूद करतो. -दिलीप बिरुटे (सै चा पंखा)

डॉ सुहास म्हात्रे 22/05/2015 - 18:28
=))