Skip to main content

माझी 'वाईट्ट' व्यसनं : गुलझार

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 26/06/2015 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
गविंनी लिहीलेला खूब-रुयोंसे यारियाँ न गयी.. हा लेख वाचला आणि राहवले नाही. दोन वर्षांपूर्वी अशीच एक लेखमाला लिहायला सुरूवात केली होती. पण नंतर ती अर्धवटच राहीली. त्यापैकी काही लेख 'मीमराठी' तसेच 'ऐसी अक्षरे' वर पोस्ट केले होते. मिपा संपादकांची परवानगी आहे असे गृहीत धरून त्यातील काही लेख इथे पुन्हा रिपोस्ट करतोय. मिपाच्या पॉलीसीत बसत नसल्यास कृपया उडवून टाकावेत. ********************************************************************************* १९९३ ची गोष्ट ! कॉलेजच्या द्वितीय वर्षात होतो. केतन मेहताची नवी फिल्म रिलीज झाली होती. 'माया मेमसाब' !

कृष्णबन- १

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 26/06/2015 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
. ब्लॅकफॉरेस्ट! नुसतं नावं घेतलं तरी डोळ्यासमोर येतो तो पांढर्‍याशुभ्र आयसिंगवर चॉकलेटचा चुरा आणि टप्पोरी चेरी लावलेला केक!

फैज अहमद फैज च्या एका कवितेचा अनुवाद

लेखक पथिक यांनी गुरुवार, 25/06/2015 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
गझलसम्राट सुरेश भटांनी ज्यांना आपलं दैवत म्हटलं आहे त्या फैज अहमद फैज यांची खासियत म्हणजे त्यांच्या शायरीतला अद्भुतरम्य (romantic) आणि क्रांतिकारी (revolutionary) आशयांचा अतिशय सुंदर मिलाफ. त्यांची एक कविता मराठीत अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे.

संध्याकाळ

लेखक सूड यांनी गुरुवार, 25/06/2015 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
ती आणि ही, दोघीही एकाच वयाच्या...जवळपास. तेच नेहमीचं पाहून न पाहणं, नजरेला नजर देऊनही अनोळखीपण जपणं. तिची नेहमीची लगबग, ही निवांत बसलेली. आजचा दिवस? जरा वेगळा, ती नेहमीपेक्षा थोडी टापटीप, हीच्या नजरेतून ते सुटलं नाहीच!! पुन्हा तेच नेहमीचं पाहून न पाहणं, नजरेला नजर देऊनही अनोळखीपण जपणं. ती आज थोडी जास्त लगबगीत ही मात्र नेहमीसारखीच निवांत, ढिम्म बसलेली. ती पुढे गेलेली मागे आली, कनवटीची दहाची नोट काढून हिच्या थाळीत टाकली... पुन्हा लगबगीत निघाली.. नातवाच्या वाढदिवसाला काय करावं, हा विचार तिच्या डोक्यात, ही तिने दिलेल्या दहात पोट कसं भरेल या विचारात गढून गेली दुसर्‍या दिवशी तेच नेहमीचं पाहून
काव्यरस

नसत्या उचापती -१ { तपासणी}

लेखक Sanjay Uwach यांनी गुरुवार, 25/06/2015 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळचे आठ वाजले असतील . आज सुट्टीचा दिवस , मी पण आगदी निवांत होतो . शांतपणे वर्तमान पत्र वाचत चहाचा आंनद घेत होतो .तो पर्यंत दारावर कोणी थाप मारली . मी दार उघडले ,पाहतो तर आमचे शामराव . मळका शर्ट, धोतर , डोक्याला लाल मुंडासे बांधलेले .शामराव हातात कांहीतरी घेऊन आत आले .

आंगणवाडी ते ....

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 25/06/2015 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमोच्या जपाने काँगी हरले, खेळ तोच हो, फक्त खेळाडू बदलले , पल्ला माझा हजार कोटींचा, घेवु द्या ना मोठी उडी, आताशी हडपलेत फक्त २०० कोटी, ही तर नव्हे जगबुडी, वही, पुस्तक,पाटी , पेन्सिल, बाळ गोपाळांच्यात मी रमले, कधी, कुठे, कशी, खायची चिक्की, आंगणवाडीनेच शिकवले, तुझा मोठा घोटाळा की माझा , हे ठरवेल जनता किंवा समिती, तु आधी मी आधी करत, भरुन टाकुया स्वीसची खाती , पापा होते तो कहते , बडा नाम करेगी बेटी मेरी, पण बाबा गेला दुर देशी न ये तो माघारी, जर खाते राहता रिकामे, होऊ कशी मी उतराई, पद उतार होण्याची , मला हो कसली घाई.

खूब-रुयोंसे यारियाँ न गयी..

लेखक गवि यांनी गुरुवार, 25/06/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
हसरत मोहानी.. मौलाना हसरत मोहानी हे भारतातले शायर. प्रेमाच्या शायरीसोबत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणार्‍यांपैकी एक ठळक मनुष्य. सर्वात आधी "संपूर्ण स्वराज्या"ची मागणी करणार्‍यांपैकी एक. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचा खास समर्थक. तुरुंगवास तर खूपच सोसलेला. तुरुंगातही बरंच काव्य केलेलं आहे. त्याच्या फ्रीडम फायटर या अंगापेक्षा आज आत्ता त्याची ही एक गझल इथे आठवण्याची इच्छा होतेय. सगळेच शेर नाही घेत इथे. थोडेसेच.. पण अगदी पुरेसे. यातली अर्थाची समजूत ही निव्वळ एक विशिष्ट एकट्याने ऐकताना झालेली समजूत आहे. शेर वेगवेगळ्या लोकांना खूप वेगळं काहीतरी सांगतात..

ती संध्याकाळ मंतरलेली…।

लेखक अपरिचित मी यांनी गुरुवार, 25/06/2015 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
घड्याळाने चारचे ठोके वाजवले. ती तिच्या शनिवारच्या कामात गुंग. अचानक शेजारच्या खिडकीतून लता दीदींच "मालवुन टाक दीप …" कानावर पडलं … अन … ती थबकली … थोडीशी बिथरली … झर झर लग्नाची नुकतीच पूर्ण झालेली पाच वर्ष डोळ्यांसमोरून गेली. गेल्या पाच वर्षात तिने हे गाणं ऐकलंच नव्हतं. लग्ना नंतरचे सुरुवातीचे दिवस आठवले. तो तर कामात इतका गुंग कि आठवणींना ही वेळ नाही. आजही सुट्टीचा दिवस. दुपारी उठल्या पासून मुलगा शेजारी खेळायला गेलेला. वास्तविक एकांत भरपूर. पण कुठेतरी कशाची तरी कमी होती. साडे तीन वाजे पासून T .V. समोर News Channels सुरु. बायको सोबत दुपारचं जेवण झालं. पण गप्पा नेहमीच्याच.