राजकारण
"सोसायटीचे सेक्रेटरी"
"होय"
"कॉर्पोरेशन निवडणुकीचा फ़ॉर्म भरलाय?"
"होय"!
"मी भीमराव बाजूची झोपडपट्टी माझ्या ताब्यात असती "
"बरं मग?"
"मागच्या टायमाला बायको कॉर्पोरेटर हुति !"
"माहीत आहे !"
"या टायमाला मी फ़ॉर्म भरलाय !"
"पुढं ?"
"या ब्यागेत पांच पेटी हायंत !"
"चालायला लागा !"
" जादा पायजेत?"
" लोकांनी उभं केलंय मला !मी उमेदवारी परत नाही घेणार!"
"हे बगा हे पांच ठिवा."
"५००मतं फीक्स आहेत, सोसायटीतली ,तुम्ही चालायला लागा "
"तुमच्या शेजारच्या सोसायटीतल्या पाटलानं बी फॉर्म भरलाय न्हवं?"
"अं ?
मिसळपाव
(चित्रः प्रतिमा खडके)
त्याच्यासाठी ते सगळंच नवीन होतं. ते लोक, ती जागा, तो माहोल आणि सगळंच. या नवीनतेची ओळख करून घ्यायला कुठपासून सुरुवात करू, या संभ्रमात तो तिथे बसला होता. संजय. कोकणातल्या एका छोट्याशा गावातला तो एक हुशार मुलगा होता.