Skip to main content

असेही मार्केटिंग

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 13/10/2015 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
परवा काहीतरी विकणारा एक पोरगा दारावर आला. म्हणाला आमच्याकडे एक स्कीम आहे. अमुक इतके पैसे भरायचे. तुम्हाला हा प्लॅस्टिक जार मिळेल. तो तुम्ही फ्रीजमधेही ठेवू शकता आणि मायक्रोवेव्ह ओव्हनमधेही ठेवू शकता. याचबरोबर पुढील २ वर्षे आमचा पेपरही मिळेल. त्याच्या रद्दीचेही पैसे तुम्हाला मिळतील. एकूण काय तुम्ही फायद्यात रहाल. सगळंच चक्रावून टाकणारं होतं... त्याला विचारलं नेमकी काय स्कीम आहे, काय विकतो आहेस. तेव्हा म्हणाला आम्ही एका दैनिकाचे प्रमोशन करतो आहे. मोठा प्रश्न पडला...

एकाकी

लेखक सुमित_सौन्देकर यांनी मंगळवार, 13/10/2015 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
तिथे थांबतोय जिथे थांबायचं न्हवत ठरवलं होत मागे वळून पहायचं न्हवत ती अंधार खोली पुन्हा उघडतोय मोडलेल्या फडताळात स्वताला शोधतोय सोफ्यावरली धूळ झटकून बसून क्षणभर डोळे मिटलेयत क्षणभरातच त्यांनीसुद्धा चुकांची चलचित्र पाहिलेयत जगाच्या वेगासोबत धावताना मागे खूप काही राहून गेलय कृत्रिम आनंदाच्या हट्टापाई निरागस हसण विसरून गेलोय चव यशाची मिळवायला आजवर फक्त स्पर्धा केलीय दिखाउपणाच्या गर्दीसाठी आपल्यांची आहुती दिलीय आशा आहे तिरीप येईल उजेडाची अंधारात खांद्यावरती हात ठेऊन कुणी दावील त्यातून वाट अजूनही त्या अंधारात एकाकी पडलोय राहायचं आत्ता पुन्हा तिथे जिथे मी घडलोय
काव्यरस

भुत असते(च) (एक्सटेंडेड भयशशक प्रयत्न)

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी सोमवार, 12/10/2015 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
आवरले एकदाचे, जरा लॉगिन करुया आता.. हम्म.... हॉटेलात आलेली माणसे, बॅटमॅन आहे ईए काका आहेत अरे वा जॅक हे आपले कॅप्टन जॅक स्पैरो आहेत... धागे कुठले बरं पेटले आहेत? 1 वर्षा नंतर...अर्र दादुमियां पेटले बहुदा! इकडे काय अहाहा मासे! सुरंगी तै न पोस्ट केलेली रेसिपी दिसते आहे... इथे आता कसले हिमालयात मासे!? असो!

टेडी-१ (भयकथा)

लेखक एकजटा अघोरी यांनी सोमवार, 12/10/2015 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
अवघ्या ४ वर्षांची दिया आणि तिची आई वीणा कोर्टातून बाहेर पडल्या. वीणा थोडी धुसफुस करत होती, दियाला जवळजवळ खेचतच चालत होती. दुरुन तिचे वडील दुस-याच कुठल्यातरी स्त्रीबरोबर जाताना दियाला दिसत होते. तिच्या बालबुद्धीला याचं काही आकलन होत नव्हतं. अलिकडे पप्पा मम्मी सारखे भांडताहेत याची तिला जाणीव झालेली होती. पण हे सगळं काय असतं याचं मात्र तिला कोडं पडलेलं होतं. तिच्या वडिलांनी तिच्या आईला हाताने तीनची खूण केली. दर तिस-या रविवारी तिचे वडील तिची भेट घेऊन तिच्याबरोबर वेळ घालवू शकणार होते, याची ती खूण होती. कोर्टानेच तसं निकालात नमूद केलेलं होतं. दियाच्या आईचा नुसता संताप संताप झाला ते बघून.

सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर व विजापूर - सहलिबाबत मार्गदर्शन

लेखक विक्रान्त कुलकर्णी यांनी सोमवार, 12/10/2015 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर व विजापूर असे दिवाळीनंतर पाच ते सहा दिवस फिरायचे ठरवीत आहे. मी ठाण्याला राहतो. सोलापूरला मुख्य मुक्काम ठेऊन आजूबाजूची ठिकाणे पाहणे सोयीस्कर ठरेल असे एकंदरीत वाटते. तर वाहतुकीच्या सोयी, राहण्याची व जेवणाची व्यवस्था तसेच वरील उल्लेखाव्यतीरिक्त आणखी कोणती पाहण्याची ठिकाणे आहेत का? याबाबत जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

आपण अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, नासिक, जळगाव जिल्ह्याचे आहात ? अहमदनगरयेथे 'विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६ आयोजन'चे आमंत्रण प्रस्तावासाठी अनुमोदन हवे आहे

लेखक माहितगार यांनी सोमवार, 12/10/2015 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिपीडियाचा लेखक आणि वाचक वर्ग संबंध महाराष्ट्रात तसेच महानगरांपलिकडे उर्वरीत भारतात पसरलेला आहे परंतु संघटनात्मक आयोजने सहसा केवळ महानगरांपुरती मर्यादीत रहातात. विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६साठी भारतातील शहरांकडून प्रस्ताव मागितले गेले आहेत आणि महानगरांची काँपीटीशन असेल परंतु विकिमिडीया चळवळीचा मुख्य हेतु सर्वत्र पोहोचण्याचा आहे या दृष्टीने अहमदनगर येथील अनुभवी विकिपीडियन्सना विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६साठी प्रयत्न करण्याचे आवाहनास त्यांनी प्रतिसाद दिला आहे. अहमदनगर महाराष्ट्रातील पुण्यासहीत औरंगाबाद, नासिक, जळगाव या शहरांपासून साडेतीन चार तासांच्या अंतरावर तसे मध्यवर्ती पडते.

माझे आकाश...

लेखक बन्या बापु यांनी सोमवार, 12/10/2015 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
(गुलझार यांच्या एका मुक्ताकावरून भारावून काहीबाही सुचलेले..) शाळेतून येताना चिंचोक्या सोबत लपवला होता आकाशाचा एक तुकडा.. निळा शुभ्र तुकडा एक.. ज्यात स्वप्नं लपवली होती माझी... लाल हिरव्या तांबड्या लोलंकात हरावयाचा तो कधी.. कधी चोरकप्यात लपून बसायचा.. अंधारात चांदण्याचा प्रकाश शोधून देत असे मला.. माझा आकाशाचा तुकडा.. निळा शुभ्र तुकडा एक.. ज्यात स्वप्नं लपवली होती माझी... सोबत जगत आलो आम्ही दोघे.. लोलकांच्या प्रकाशात ... सोबत स्वप्नं बघत आलो आम्ही... परीची.. तार्याची.. आकाशाची.. निळा शुभ्र तुकडा एक.. ज्यात स्वप्नं लपवली होती माझी... भरून यायचा आभाळ.. भिजायची पुस्तके माझी..
काव्यरस

लाडघर (तामसतीर्थ) आणि गुहागर विषयी माहिती हवी आहे....

लेखक अ.रा. यांनी सोमवार, 12/10/2015 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, दिवाळीच्या सुट्टीमध्ये कोकणात फिरायला जायचा विचार आहे. 4 दिवसांचा प्लान आहे. तसे लाडघर मनामध्ये निश्चित केलं आहे. कारण लाडघरला याआधी कधी जाणे झाले नाही. तरीही या परिसरात कुणी आधी जाऊन आलंय का? येथे जवळपास बघण्यासारखे काय काय आहे??? किंवा दापोली परिसरात काय काय बघण्यासारखे आहे? खाजगी वाहनाने प्रवास होणार आहे त्यामुळे हाताशी भरपूर वेळ असणार आहे. पुणे-ताम्हीनी घाट मार्गे-दापोली-लाडघर तिथून पुढे गुहागर आणि तसाच किंवा महाबळेश्वरमार्गे परतीचा मार्ग असणार आहे. समुद्रकिनारी हॉटेल्स वा तत्सम राहण्याची व्यवस्था कशी आहे ? कुठे राहावे? या विषयीचा एखादा जुना धागा असल्यास कळवावे.

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ५ अलकनंदेसोबत बद्रिनाथच्या दिशेने. .

लेखक मार्गी यांनी सोमवार, 12/10/2015 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

त्यानंतर असे झाले असेल तर...(प्रसंग १)

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 11/10/2015 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल गर्दीच्या ठिकाणी कशामुळे कुणाचा पारा चढेल याचा भरवसा देता येत नाही. माझ्यासोबत किंवा माझ्या समोर घडलेले काही प्रसंग मी सांगतो तुम्हाला. एक प्रसंग याच ऑक्टोबर महिन्यात घडलेला. पुण्यात विमान नगर मार्गे एयर पोर्ट रोडने कल्याणीनगरला कॅब मध्ये जातांना सिम्बियोसिस च्या थोडे पुढे एका चौकात अभूतपूर्व ट्राफिक जाम झाला होता. चालकाच्या समोर असलेल्या काचेतून समोर दिसलेल्या प्रसंगाचं मला जे आकलन झालं त्यानुसार मी हे लिहित आहे. कदाचीत त्या प्रसंगाला अजून दुसरी तिसरी बाजू असू शकेल ती मला माहिती नाही. असो. ...तर समोरच्या चौकात अभूतपूर्व ट्राफिक जाम झाला होता.