Skip to main content

प्रतिसाद, वाद वगैरे....

लेखक दमामि यांनी मंगळवार, 06/10/2015 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
साद आहे घातली, प्रतिसाद द्यावा नेमका नाही तर जा उडत तुम्ही , मीही आहे खम्मका… अतृप्त नाही , चिमण नाही, ना जयंत, अनाहिता मोजक्याच प्रतिक्रियांना मग करू मी ब्लेम का ? कट्ट्यास जाऊ, ग्रुप करू मार्ग साधा सरळसा ही रीत पाळायास आहे बोल तुजला टैम का ? नवीन दिसला आयडी की मांत्रिकाला आणुनी बकरा नवा कापायचा हा पुराणा गेम का? सोड वाद विवाद तू अन शांत चित्ते ऱ्हा इथे सेम या मिपावरी तुझे नि माझे प्रेम का? डिस्क्लेमर - या कवितेचा आणि मात्रा व्रुत्ताचा वगैरे काहीही संबंध नाही . खम्मका या शब्दात कसा ठसका ठासून भरला आहे.
काव्यरस

हाय फाय

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी मंगळवार, 06/10/2015 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवस अगोदर बनवायला टाकलेला चष्मा येण्याची वाट बघत कोथरुडातल्या ठरलेल्या दुकानात काल संध्याकाळी शिरलो तेव्हा आत अगोदरच एक जख्ख म्हातारी, तिचा तेवढाच जख्ख म्हातारा नवरा, त्यांची मुलगी, जावई, आणि शाळकरी नात कुठला चष्मा आणि फ्रेम निवडायची यावर तावातावाने चर्चा करताना दिसले. टिपीकल पुणेरी कोथरुडी अतीश्रीमंत हायफाय परिवार होता. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे. आपण हायफाय आहोत हे दाखवण्याची एकही संधी ते सोडत नव्हते.

मोकलाया दाही दिश्या ते भटकाया दाही दिश्या : एक प्रवास

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 06/10/2015 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
(ढेस्क्लेमर: या लेखातून माझा कुणालाही हिणवण्याचा अथवा दुखावण्याचा हेतू नाही. याउलट 'हसण्यासाठी जगणे आणि जगण्यासाठी हसणे' हा माझा हास्य'बाना' सर्वांपर्यंत पोचविण्याचा एक किंचीतसा प्रयत्न आहे! तरीही कुणाला माझ्या लेखातील/काव्यातील काही जागांना आक्षेप असल्यास कळवावे, दुरूस्ती किंवा तो भाग काढून टाकण्यासाठी संमंना सांगून प्रयत्न केला जाईल!) न्मसर्कार म्हणडलि! तर महाराजा, शीर्षक आणि पहिली ओळ वाचून पुढे काय वाचायला मिळणार आहे याचा एक अंदाज मिपाकरांना आलाच असेल! तुम्ही बरोबर विचार करताय, सदर लेख "त्याच" काव्यचमत्काराला वाहिलेली एक शब्दांजली आहे.

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालयाच्या पायथ्याशी

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 06/10/2015 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

कुमाऊं – नयनरम्य नैनिताल (अंतिम भाग)

लेखक के.के. यांनी मंगळवार, 06/10/2015 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
=============================== भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६ =============================== कुमाऊं – नयनरम्य नैनिताल नैनिताल, आमच्या प्रवासातला शेवटचा टप्पा आणि सुरुवातीलाच सांगायला हरकत नाही की मी आजवर भेट दिलेल्या हिल स्टेशनपैकी सर्वात छान व रोमॅ

---------एका प्रवासाचा क्रॉससेक्शन------------

लेखक अर्थहीन यांनी मंगळवार, 06/10/2015 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
---------एका प्रवासाचा क्रॉससेक्शन------------ गांधीबाबांची जयंती. सुट्टी. लॉन्ग वीकेंड. घरी जायचं म्हटलं की आजही तेवढाच आनंद. पुणे-सोलापूर सकाळी 9.30ची इंटरसिटी गाठायची आहे. जगताप-डेरीच्या नवीन BRTस्टॅंड वर कानात हेडफोन अडकवुन प्रसन्न मनानं बसची वाट पाहतो. गाणं चेंज करेस्तोर 5 मिनटातच -हादरा बसताना फ़क्त चुंयि-चुंयि असा आवाज करणारी वातानुकुलीत BRT येते. स्वयंचलित दरवाजातून प्रवेशतो. संपूर्ण भला मोठा अन व्यवस्थित लेन्स आखलेला गुळगुळीत प्लेन रोड. प्रवास म्हणजे सु:ख! आत बसल्यावर बस हालली तरी फ़क्त हत्तीच्या पाठीवर इकडून-तिकडे मऊ झुलल्यासारखं वाटावं इतका मऊपणा..

प्रेरणादायी प्रकाश!!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 06/10/2015 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्य उगवतो आणि मावळतो. दिवसा सूर्य प्रकाशमान असताना पृथ्वीवरील सगळेजण त्याचा फायदा घेतात. मावळताना एकटा सूर्य मावळतो. सगळे जग सूर्याबरोबर मावळत नाही. रात्री सूर्य नसतो म्हणून त्याला काहीजण दूषणे लावतात तर काहीजण दिवसभर प्रकाश दिल्याबद्दल रात्री सूर्याचे आभार मानून झोपी जातात. यश हे उगवत्या सूर्यासारखे तर अपयश हे मावळत्या सूर्यासारखे असते.... तुम्हाला मिळालेल्या यशात सगळे भागीदार होतात व श्रेय घेतात. तुमच्या अपयशाचे भागीदार कुणीच नसते. तुम्ही एकटेच तुमच्या अपयशाला जबाबदार ठरता.

पूर्वेच्या समुद्रात- ७

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 06/10/2015 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वेच्या समुद्रात- १ पूर्वेच्या समुद्रात- २ पूर्वेच्या समुद्रात-३ पूर्वेच्या समुद्रात-४ पूर्वेच्या समुद्रात ५ पूर्वेच्या समुद्रात ६ पूर्वेच्या समुद्रात- ७ विशाखापटणमला नव्या घरात स्थिरस्थावर होत होतो.माझे घर पाचव्या मजल्यावर होते घर अतिशय उत्तम होते परंतु बिल्डींग नवीन होती आणी फक्त ६-७ लोक राहायला आले होते.

जाहीराती पाहुन

लेखक नितीनचंद्र यांनी मंगळवार, 06/10/2015 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
जाहीराती मग त्या दुरदर्शच्या विवीध चॅनलवरच्या असोत की छापील विभागातल्या, मला सहसा भुरळ पडत नाही. काही वेळा ह्या जाहीराती त्या मुळ उत्पादकाचा उद्देश काय असावा किंवा ग्राहकांनी काय घ्यावा याबाबत अनेक पर्याय सुचवुन जातात. १) समजा तुमच्या कडे पिढीजात संपत्ती आहे किंवा आत्ताच मिळाली आहे अश्या वेळी माणसाची झोप उडते याचे कारण बँकेत ठेवलेल्या संपत्ती शिवाय घरात दागिने/रोख रकमा किंवा किमती मौल्यवान वस्तु माणुस ठेवतोच. अश्या वेळी चोरी होईल की काय किंवा दरोडा पडेल की काय अश्या कारणांमुळे झोप उडत असेल तर एक पर्याय आहे. दोन -चार जोड्या अमुल माचो च्या खरेदी करा आणि आरामात झोपा.

कुशीवर वळू नका, रात्र भुताची आहे!!!!!!!!!!!!!! (स्वैर अनुवाद)

लेखक अजिंक्य विश्वास यांनी सोमवार, 05/10/2015 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
हे मी खूप आधी अनुवाद केलेले आहेत. ते फेसबुकवर पोस्ट केले होते. आता इथे शेअर करत आहे. घाबरा किंवा हसा. .. पण एन्जॉय जरूर करा !!! कुशीवर वळू नका, रात्र भुताची आहे!!!!!!!!!!!!!! १. मी काचेवरच्या टकटकीमुळे जागा झालो. पहिल्यांदा मला वाटले, खिडकीचा आवाज येत आहे, पण मग कळले की आवाज माझ्या आरश्याच्या आतून येत आहे! २. शेवटचे मला आठवते, तेव्हा माझे घड्याळ रात्रीची १२:०७ वेळ दाखवत होते, त्या आधी तिची सडत चाललेली, नख्या वाढलेली बोटं माझी छाती कुरवाळत होती आणि दुसरा हात मला येणारी किंचाळी दाबून धरत होता. मी झटक्यात ताठ उठून बसलो, आणि माझ्या लक्षात आले की, हे फक्त एक स्वप्न होते.