Skip to main content

राजकारण

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी सोमवार, 19/10/2015 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
"सोसायटीचे सेक्रेटरी" "होय" "कॉर्पोरेशन निवडणुकीचा फ़ॉर्म भरलाय?" "होय"! "मी भीमराव बाजूची झोपडपट्टी माझ्या ताब्यात असती " "बरं मग?" "मागच्या टायमाला बायको कॉर्पोरेटर हुति !" "माहीत आहे !" "या टायमाला मी फ़ॉर्म भरलाय !" "पुढं ?" "या ब्यागेत पांच पेटी हायंत !" "चालायला लागा !" " जादा पायजेत?" " लोकांनी उभं केलंय मला !मी उमेदवारी परत नाही घेणार!" "हे बगा हे पांच ठिवा." "५००मतं फीक्‍स आहेत, सोसायटीतली ,तुम्ही चालायला लागा " "तुमच्या शेजारच्या सोसायटीतल्या पाटलानं बी फॉर्म भरलाय न्हवं?" "अं ? होय,जनता आघाडीचा उमेदवार आहे तो " "तुमी?" "अपक्ष!" "मग,हे ठिवा!" "मी उमेदवारी परत घेणार नाही" "तुमी नक्की नायि परत घेणार?" "नाही"! "नायि?" "नाही"! "नायि?" "नाही"! "हितं कोण रांडचा परत घ्या म्हणून सांगायला आलाय तुमास्नी!" "मग?" "चुकुन मागं बिगं घेशिला म्हुनं शान हे दिया आलोय ,समजलं?"
लेखनविषय:

वाचने 2067
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

=))

खासंच आहे हे लेखन.