छि _ _
छि _ ल,
पचकन थुंकल्यासारखी ती शिवी त्याने दिली,
एकदा... दोनदा... अनेकदा...
मन भरेपर्यंत.
तिथेच उभ्या असलेल्या मला ते ऐकून अंगावरून काहीतरी गिळगिळीत सरपटत गेल्यासारखं वाटत होतं.
श्रीगणेश चतुर्थीच्या आदला दिवस. रस्त्यांवर भरपूर ट्रॅफिक, गोंधळ. इतर पर्याय नसल्याने आणि
लांब जायचे असल्याने पीएमपीएमएलने प्रवास करावा लागणार होता.
मनपाला बसमध्ये चढले, खचाखच गर्दी. आम्ही ४-५ जणी बसच्या डावीकडील बाजूस लेडीजना उभे राहण्यासाठी
जागा असते तिथे थांबलो होतो, बस थोडी पुढे गेली असेल तोवर मागून तिघांचं एक टवाळ टोळकं धक्काबुक्की
करत पुढे आलं. हिंदी भाषा बोलण्याच्या पध्दतीवरून वरून युपी-बिहारी वाटत होते, त्यातील एकाने भरपूर घेतली
होती (सुवास पसरला होता), त्याला धड सरळ उभंही रहता येत नव्हतं, त्याचं विमान टेक-ऑफ करून ढगांपल्याड
पोचलेलं सहज कळत होतं.
हे लोक सरळ लेडिज जवळ येऊन रेलू लागले, अविर्भाव असा की बसच्या धक्क्यांमुळे चुकून तसं होतंय,
आम्ही अजून डावीकडे सरकत होतो पण आता सरकायला जागाच नव्ह्ती.
तिथल्या एका मुलीने गोडीत त्यांना पुरूषांच्या रांगेत उभे राहण्यास सांगितले, तेवढयापुरतं सरकल्यासारखं
करून पुन्हा त्यांनी तोच प्रकार चालू ठेवला, बळेच धक्के देण्याचा. तो पायलट यात आघाडीवर होता.
इतर लोक नेहमीप्रमाणे सोयिस्कररीत्या बघ्याची भूमिका घेऊन गंमत बघत होते. पुढचे एक आजोबा त्याला
समज देत होते तर तो त्यांनाच बुढ्ढा क्या बक रहा है इ. अचकट विचकट शेरे मारायला लागला.
अशावेळेस स्त्रिया जास्त बोलू शकत नाहीत कारण समोरचा चिडून काय करेल, बोलेल याचा नेम नसतो,
त्यामुळे मी दुर्लक्ष करत होते, त्यांच्याकडे पूर्ण पाठ करून मध्ये बॅग घेऊन उभी राहिले होते.
कुठे झाशीची राणी बनावं आणि कुठे शांत राहून दुर्लक्ष करावं हेही आपल्याला कळलं पाहिजे असं माझं
सरळमार्गी मत. त्या मुलीलाही मी समजावत होते की सांगून सुधारणार्यांपैकी ते लोक नाहीत,
उगीच नादी लागू नको, पण तीही हट्टाला पेटली होती. बोलता बोलताच तिने ओढणी पूर्ण चेहर्याला घट्ट बांधून
घेतली होती, माझाही स्कार्फ होताच.( साध्याशा स्कार्फ मुळेही काहीवेळेस किती आश्वासक, सुरक्षित वाटतं
ते अशा चेहर्यावर स्कार्फ, स्टोल इ. बांधणार्या मुलींना नावं ठेवणार्यांना कसं कळावं.)
तो अजून बरळतच होता, खुदको मिस इंडिया समझती है, ये कोई लडकी है क्या..
काहीही फुटकळ कमेंट्स चालू होते. तीही चिडून त्याला धडा शिकवायच्या इराद्याने काही-बाही सुनावत होती.
तेव्हाच कधीतरी डोकं सटकलेला तो शिवी देऊन मोकळा झाला..
छि _ ल, सा _ !!
................
................
त्यानंतरही अजून काही बोलण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी तो माझ्या हाताला स्पर्श करू पहात होता.
मी आपल्याच संयमाची परिक्षा पाहत त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता स्थितप्रज्ञ उभी..
त्यानंतर मात्र सगळ्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि कंडक्टरला त्या तिघांना खाली उतरवण्यास भाग पाडले,
एवढा वेळ मजा बघणार्या पब्लिकनेही आता त्यांना पुढे ढकलून उतरवले, एकदाची बस पुढे निघाली.
ती मुलगी शेजारील मुलीला तिने अशा किती लोकांना कसं सरळ केलं त्याचे किस्से सांगू लागली होती.
माझ्या कानात मात्र राहून राहून ती शिवी घुमत होती, अंगावर अॅसिड ओतल्यावर कसं वाटत असेल
तसं काहीसं ते शब्द कानावर पडल्यावर वाटलं होतं..
याआधी फक्त चित्रपट, पुस्तके, टिव्ही इ.वर ऐकलेलं एवढया जवळून प्रत्यक्ष ऐकण्याचा अनुभव पहिलाच.
इतकी वाईट शिवी देण्यामागे तसंच काही कारण असावं तर तेही नव्हतं..
कोणासाठी होती ती शिवी ?
त्याला विरोध करणार्या त्या मुलीसाठी, माझ्यासाठी, बसमधील इतर महिलांसाठी ?
पूर्ण स्त्रीजाती साठीच कदाचित..
काय नव्हतं त्या शिवीमध्ये ?
राग, तिरस्कार, विखार, वासना ?
सगळंच, त्याशिवायही अजून काही..
त्याच्यात आणि बाकी लोकांत असणार्या सामाजिक, आर्थिक, मानसिक, शैक्षणिक सर्वच बाबतीतील
विषमतेमुळे आलेले, वर्षानुवर्षे साठलेले कुठले कुठले गंड त्या एका शिवीतून बाहेर पडले होते.
त्या क्षणी मनात चमकून गेलं ते १६ डिसे, निर्भया प्रकरण. त्या घटनेनंतर, एक व्यक्ति दुसर्या व्यक्तिशी
इतकं निर्दयी, कॄर, भावनाशून्य रित्या कसं वागू शकते हा प्रश्न कायम पडायचा, त्याचं उत्तर थोडंफार
मिळाल्यासारखं वाटलं. दोन्ही घटनांमध्ये इतर काहीही समान नाही, फक्त एकच - मनोवृत्ती.
वर्षानुवर्षे ठाकून ठोकून डोक्यात फिट्ट बसवलेली तीच ती टिपीकल पुरूषी मनोवृत्ती जी अशा लोकांमधे स्त्रियांबद्दल पराकोटीचा तिरस्कार उत्पन्न करते. स्त्रीयांना कायम तुच्छ, कमी लेखणारी, त्यांनी विरोध केलेला जराही न खपणारी मानसिकता. त्यांनी कायम घराच्या चार भिंतींआड रहावं, सदा सर्वकाळ कामाला जुंपून घ्यावं, काहीही बोललेलं,
मारलेलंही चालवून घ्यावं, पुरूषांसमोर आवाज चढवू नये, बाहेर पडू नये, नौकरी करू नये, परपुरूषांशी बोलू नये,
जास्त शिकू नये, जास्त बोलू नये, जास्त विचार सुध्दा करू नये..
एक ना दोन हजार बंधन घालणारी मानसिकता.
अर्थात हे सरसकटीकरण नाही.
समाजातील काही ठराविक वर्गांतील ठराविक लोकांचीच अशी मनोवृत्ती असेल.
त्यावेळी मला अशा समाजात राहणार्या स्त्रियांसाठी वाईट वाटत होतं ज्यांच्यासाठी या आणि याहून वाईट
शिव्या ऐकणे रोजचेच असेल, नेहमीच्याच शिव्या आणि मारहाणीने ज्यांच्या संवेदना बधीर झाल्या असतील.
त्याचवेळी या विचाराने हायसं वाटत होतं की सुदैवाने आपला जन्म एका सुशिक्षित, सुसंस्कृत परिवारात झालाय,
आपण अशा समाजात वावरतो जिथे साधारणपणे अशी प्रवृत्ती लांबपर्यंत दिसून येत नाही,
जिथे आपल्याला हवे तसे जगण्याचे स्वातंत्र्य आहे.
जिथे आपल्याला बर्यापैकी सन्मान मिळतो, कमी लेखलं जात नाही,
जिथे पुरूष स्त्रियांबद्दल टोकाचे वाईट विचार करत नाहीत,
जिथे सामान्यतः नवरे-बायकांना, मित्र-मैत्रिणींना, भाऊ-बहिणींना, पुरूष स्त्रियांना रिस्पेक्ट देतात,शिव्या नाही.
म्हटलं तर ही एक किरकोळ घटना, पण डोक्यात खूप सारे विचार, त्रास, मनस्ताप देऊन गेली.
अर्थात हा काही एकमेव प्रसंग नाही, असे अनेक नकोसे अनुभव येतच असतात,
फक्त त्या एका शिवीमुळे हा अनुभव जास्त जिव्हारी लागला, एरवी चुकूनही कधी मनात येत नाही
तो एक स्त्री असल्याबद्दलचा पश्चात्ताप एका क्षणापुरतं का होईना, जाणवून गेला..
इतकंच..
याद्या
31365
प्रतिक्रिया
225
मिसळपाव
खर हाय का ? कपो कल्पीत.?
पुण्यात? शक्यच नाही.
In reply to खर हाय का ? कपो कल्पीत.? by जेपी
आणि हो, या घटनांमधील सर्व
In reply to पुण्यात? शक्यच नाही. by पिशी अबोली
अगदी अगदी. माणूस हा मराठी,
In reply to आणि हो, या घटनांमधील सर्व by पिशी अबोली
सत्य घटना,
अवघड आहे..
In reply to सत्य घटना, by नीलमोहर
त्यानंतरही अजून काही
In reply to सत्य घटना, by नीलमोहर
+१
In reply to त्यानंतरही अजून काही by उदय के'सागर
वैसेभी आवाज उठवला तर योग्य
In reply to +१ by बॅटमॅन
काही विदा यासाठी? तुझा
In reply to वैसेभी आवाज उठवला तर योग्य by पिशी अबोली
शिवाय "मारामारी" संदर्भात
In reply to काही विदा यासाठी? तुझा by बॅटमॅन
पर्सनल अनुभव थोडे आहेत
In reply to काही विदा यासाठी? तुझा by बॅटमॅन
अच्छा? मला वाटलं अशा
In reply to पर्सनल अनुभव थोडे आहेत by पिशी अबोली
तुमची चर्चा चालु देत.. एकच
In reply to अच्छा? मला वाटलं अशा by बॅटमॅन
म्हण्जे समजा उद्या मी कुणी
In reply to तुमची चर्चा चालु देत.. एकच by पिलीयन रायडर
अरे पण मुदलात स्वतः करावी
In reply to म्हण्जे समजा उद्या मी कुणी by बॅटमॅन
तसे नाही. करता येतच नाही हा
In reply to अरे पण मुदलात स्वतः करावी by पिलीयन रायडर
आता काळ्या ढगाला चंदेरी किनार
In reply to तसे नाही. करता येतच नाही हा by बॅटमॅन
आता काळ्या ढगाला चंदेरी किनार
In reply to आता काळ्या ढगाला चंदेरी किनार by पिलीयन रायडर
माहित नाय बा...
In reply to आता काळ्या ढगाला चंदेरी किनार by बॅटमॅन
अनाहिता विरुद्ध सतत काळ्या
In reply to माहित नाय बा... by पिलीयन रायडर
मुद्दा इतकाच आहे की १००%
In reply to आता काळ्या ढगाला चंदेरी किनार by बॅटमॅन
हा प्रतिसाद पहा. कोमल यांचे
In reply to मुद्दा इतकाच आहे की १००% by पिशी अबोली
याबाबत पिरा यांच्याशी सहमत.
In reply to आता काळ्या ढगाला चंदेरी किनार by पिलीयन रायडर
कशात काही नसताना उगा बोंब
In reply to याबाबत पिरा यांच्याशी सहमत. by प्यारे१
आवंयस!! लूक व्हू इज स्पीकिंग!
In reply to याबाबत पिरा यांच्याशी सहमत. by प्यारे१
बरोबर
In reply to तुमची चर्चा चालु देत.. एकच by पिलीयन रायडर
अबोली, माझे आहेत असे अनेक
In reply to वैसेभी आवाज उठवला तर योग्य by पिशी अबोली
नमस्कार कोमल, अनेक धन्यवाद
In reply to अबोली, माझे आहेत असे अनेक by कोमल
आईशप्पत.. इतकी फॉरमॅलीटी..
In reply to नमस्कार कोमल, अनेक धन्यवाद by बॅटमॅन
आणि
In reply to आईशप्पत.. इतकी फॉरमॅलीटी.. by कोमल
खी खी खी. पण दुसरी बाजू
In reply to आईशप्पत.. इतकी फॉरमॅलीटी.. by कोमल
प्रतिसादासाठी धन्यवाद,
In reply to अबोली, माझे आहेत असे अनेक by कोमल
पब्लिकबद्दल जे लिहीलं आहे ते
In reply to प्रतिसादासाठी धन्यवाद, by नीलमोहर
आधीच लोकांना मुद्दे स्पष्ट
In reply to पब्लिकबद्दल जे लिहीलं आहे ते by बॅटमॅन
पब्लिकच्या भरोशावर
In reply to आधीच लोकांना मुद्दे स्पष्ट by नीलमोहर
कायच्याकाय...
In reply to प्रतिसादासाठी धन्यवाद, by नीलमोहर
पब्लिक सगळीकडे सेम नसतं आणि त्यांची रिअॅक्शन ही बदलत असते. पब्लिक एवढं सक्रिय असतं तर सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना भोसकण्याचे, अॅसिड टाकून पळ काढण्याचे, गोळ्या घालण्याचे, जाळण्याचे प्रकार कधीच घडले नसते,अहो, हे सर्व प्रकार पुरुषाच्या बाबतीत पण घडतात की... यात कुठे स्त्री -पुरुष फ़रक पडतोय ?यु सेड इट,
In reply to कायच्याकाय... by ब़जरबट्टू
जनरलायझेशन होइल कदाचीत, पण
In reply to प्रतिसादासाठी धन्यवाद, by नीलमोहर
+१
In reply to जनरलायझेशन होइल कदाचीत, पण by कोमल
याचं समर्थन होऊ शकत नाही. चूक
In reply to +१ by बॅटमॅन
गल्ली चुकली काय?
In reply to याचं समर्थन होऊ शकत नाही. चूक by प्यारे१
बलात्कार ओळखीतले लोक करतात
In reply to गल्ली चुकली काय? by बॅटमॅन
म्हणजे नक्की काय?
In reply to बलात्कार ओळखीतले लोक करतात by प्यारे१
विदा बरोबर आहे पण मी तुझ्या
In reply to म्हणजे नक्की काय? by बॅटमॅन
हात्तेरेकी इतकंच होय. हे तर
In reply to विदा बरोबर आहे पण मी तुझ्या by प्यारे१
(y) ;)
In reply to हात्तेरेकी इतकंच होय. हे तर by बॅटमॅन
निर्भया ओळखीची होती का त्या
In reply to +१ by बॅटमॅन
एखाद्या उदाहरणावरून असा
In reply to निर्भया ओळखीची होती का त्या by मीता
तुमचं म्हणण असं आहे का कि
In reply to एखाद्या उदाहरणावरून असा by बॅटमॅन
मिपावर सांख्यिकीचा क्लास
In reply to तुमचं म्हणण असं आहे का कि by मीता
कायम काय? अवघे २ प्रतिसाद आहेत माझे .
In reply to मिपावर सांख्यिकीचा क्लास by बॅटमॅन
सोडला होता हा धागा. पण ठिकै..
In reply to तुमचं म्हणण असं आहे का कि by मीता
छे छे, अहो त्या २% केसेसच
In reply to सोडला होता हा धागा. पण ठिकै.. by तर्राट जोकर
निदान..
In reply to वैसेभी आवाज उठवला तर योग्य by पिशी अबोली
@ आधाशी उदय
In reply to त्यानंतरही अजून काही by उदय के'सागर
२. दुर्लक्ष करणे जेणेकरून तो
In reply to @ आधाशी उदय by नीलमोहर
अधाशी उदय
In reply to २. दुर्लक्ष करणे जेणेकरून तो by उदय के'सागर
मला एक कळत नाही पण, तुमच्या
In reply to अधाशी उदय by पिशी अबोली
माझ्या प्रतिसादात हा सूर कुठे
In reply to मला एक कळत नाही पण, तुमच्या by उदय के'सागर
ही घटना मी पण पाहिली आहे.
अशा वेळी मोबाईल काढून त्यांचं
In reply to ही घटना मी पण पाहिली आहे. by मांत्रिक
लेख म्हणून छान आहे पण तुम्ही
मला नाही वाटत असं. त्या
In reply to लेख म्हणून छान आहे पण तुम्ही by प्राची अश्विनी
लेख आवडला हे सांगायचं राहिलं
In reply to मला नाही वाटत असं. त्या by स्रुजा
__/\__ धन्यवाद
In reply to मला नाही वाटत असं. त्या by स्रुजा
अशी संधी कधीच सोडायची नाही.
कुत्रे ही शिवी फार सौम्य आहे.
In reply to अशी संधी कधीच सोडायची नाही. by तर्राट जोकर
बिहार, यूपी, हरियाणा, दिल्ली या बाजूला
बस सरऴ पोलीस ढाण्यात नेण्यास
छेड छाड झाल्यावर बस पोलिस
In reply to बस सरऴ पोलीस ढाण्यात नेण्यास by हेमंत लाटकर
शौर्य?
कधी बदलणार हे सारं? आपोआप?
In reply to शौर्य? by राही
अशावेळी शौर्य दाखवावेच
चीड आणणारे प्रसंग !!!!!!!!!
(No subject)
In reply to चीड आणणारे प्रसंग !!!!!!!!! by इन कम
थोड हिंस्त्र वाटेल पण..
जे पी साहेब
In reply to थोड हिंस्त्र वाटेल पण.. by जेपी
असा पुढाकार, पोलीस, लफडी अन
In reply to जे पी साहेब by सुबोध खरे
फक्त त्या एका शिवीमुळे हा
संतापजनक अनुभव आहे.
मला माहितीये कि आत्ता इथे
किळसवाणा अनुभव
नक्कीच!
In reply to किळसवाणा अनुभव by पैसा
अशा वेळी १०० नंबरला कॉल केला
In reply to किळसवाणा अनुभव by पैसा
अशा वेळी १०० नंबरला कॉल केला तर काही रिस्पॉन्स मिळू शकेल का?वाटत नाही काही उपयोग होईल असे..मी एकदा गरजेच्या वेळी सलग १० मिनिटं प्रयत्न करत होतो पण साधा कॉल उचलायची पण तसदी घेतली गेली नव्हती.लेख पटला.
तपशील असेल
In reply to लेख पटला. by पिशी अबोली
@ पिशी अबोली,
In reply to लेख पटला. by पिशी अबोली
- काही गरज नसतांना, संदर्भ
In reply to @ पिशी अबोली, by नीलमोहर
@ टका
In reply to - काही गरज नसतांना, संदर्भ by टवाळ कार्टा