Skip to main content

माझी भटकंती - प्रबळगड व कलावंतिणी दुर्ग ट्रेक

लेखक sagarshinde यांनी बुधवार, 17/02/2016 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रबळगड व कलावंतिणी दुर्ग ट्रेक kalavantini durg

वसईच्या किल्याच्या स्वारीवरून परत आल्यावर मी प्रबळगड कलावंतिणी दुर्ग एक रात्र एक दिवस या ट्रेक च आयोजन केल आणि तशी पोष्ट मी माझ्या ब्लॉग वर टाकली आणि तशी तय्यारी हि चालू केली. काही चौकशी साठी फोन हि आले. माझा ट्रेक हा १३ – १४ फेब्रुवारी ला होता त्यात १४ तारखेला व्हलेन्तिएन डे असल्यामुळे त्याचा हि परिणाम म ट्रेक वर झाला. शेवटी ७ लोक फिक्स झाले.

२५१ रुपयात मोबाईल !!

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी बुधवार, 17/02/2016 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
‘रिंगिंग बेल्स‘ या कंपनीनी ‘फ्रीडम 251‘ ह्या नावाने स्मार्टफोन आणण्याची घोषणा केली आहे. उद्या तारीख १८ फेब्रुवारी पासून सकाळी ६ पासून या मोबाईल चे registration सुरु होत आहे.. www.freedom251.com हि वेबसाईट चेक करा . फोन ची माहिती: चार इंचाचा डिसप्ले असलेल्या स्मार्टफोनमध्ये 1.3 गीगाहर्टझचे क्वाडकोर प्रोसेसर आहे. तसेच एक जीबी रॅम, आठ जीबी इंटर्नल मेमरी, 3.2 मेगापिक्सेल कॅमेरा. मी नेट वर वाचलेल्या काही रंजक प्रतिक्रिया. १) फक्त २५० हा हा हा आकाश ट्याब चे काय झाले ? २) छान.. आमचे भारतीय तिथे पण भाव कमी करतील..

लदाख सायकल ने : मटायन ते श्रीनगर (भाग १८)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी बुधवार, 17/02/2016 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
साडे सहा वाजता मटायन मध्ये पोहोचलो. छोटंसं गाव आहे. मुसलमान जास्त असल्या कारणाने मस्जिद पण आहेत. रस्त्याच्या कडेलाच दोन दुकाने दिसली. मुलांनी थांबवले. मला थांबायचेच होते. माहिती पडले कि, गावात कुठे राहण्याची व्यवस्था नाहीय. मी मुलांना गावात विचारायला पाठवले कि, शम्शा सारखेच राहण्याची व्यवस्था होईल का ते. पण सगळी कडून नकार आला. मग मी तंबू लावायचा निर्णय घेतला. मुलांच्या सांगण्या नुसार रस्त्याच्या एका बाजूला शेत मध्ये तंबू लावायचा निर्णय घेतला. तंबू लावायला मुलांनीच मदत केली. त्या नंतर मी त्यांचे फोटो काढले खूप खुश झाले.

(बाटा रुते कुणाला)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी बुधवार, 17/02/2016 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
बाटा रुते कुणाला, आक्रसतात ऍक्शन रीबॉक मज रुतावे हा दैवयोग आहे सांगू कसे कुणाला कळ फाटक्या बुटांची शिवून आठ जागी मी चालतोच आहे डिस्काउंट येतो, टाकून 'अर्थ' देतो माझी निवड बुटांची घाईत होत आहे अस्सल असेल की चीनी माल आकळेना ब्रांडेड मागवोनी ही त्रस्त त्रस्त आहे -- स्वामी संकेतानंद
काव्यरस

(महवांची गाळ फुले)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी मंगळवार, 16/02/2016 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
कवी वा. रा. कांत ह्यांची क्षमा मागूनच >> महवांची गाळ फुले अजुनि पिंपड्यात चोरपावली पळशी काय तू वनात? आले ते जोमात तीन शुंभ पोलिसाचे ओल्या रानात खुले दार गाळपाचे मनकवडा मग पळतो दूर डोंगरात ती जागा, ती भट्टी नारळिच्या खाली पूर्ण तोच लगबग मी मग करतो खाली रिमझिमते अमृत 'तो' विकल मंडईत हातांत लोहाचे बंध गुंफताना सगळ्यांना स्वच्छ कळे मिळुनि मोजताना कमलापरी मिटति दिवस उमलुनी सळ्यात तू गेलास सोडुनि तो माळ, सर्व अड्डे तडफडणे 'स्वामींचे' फक्त उरे खड्डे सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात ? -- स्वामी संकेतानंद
काव्यरस

मागील वर्षीची माझी सोलापुर , तुळजापुर , पंढरपुर , नळदुर्ग भटकंती.

लेखक शान्तिप्रिय यांनी मंगळवार, 16/02/2016 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो, २०१४ च्या दिवाळीत मी सोलापुर , तुळजापुर , पंढरपुर , नळदुर्ग भटकंती केली. त्याचा संक्षिप्त व्रुत्तांत देत आहे. सोलापुर एक निवांत शहर. महाराष्ट्र कर्नाट्क आणि आंध्र प्रदेशातील भारतीय येथे गुण्यागोविंदाने राहतात. मला सोलापूरातील अर्थातच आवड्लेले ठिकाण म्हणजे सिद्धेश्वर मन्दिर. विस्तीर्ण सरोवर आणि त्याच्या मध्यभागी वसलेले हे पवित्र शिवमंदिर अतिशय प्रेक्षणीय ठिकाण ! बाजूलाच सोलापूरचा भुईकोट किल्ला आहे. सोलापूर ला एक दिवस राहून मी तुळजापूरला महाराष्ट्राच्या कुलदेवतेचे तुळजाभवानी चे दर्शन घ्यायला गेलो. त्यानंतर निवांत नळदुर्ग पाहिला.

पुणेरी पगडी

लेखक Dinesh Satpute यांनी मंगळवार, 16/02/2016 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी नगरला असताना मित्र म्हणायचे कि तुला नगरमध्ये गाडी चालवता आली तर जगात तू कोठेही गाडी चालवू शकतोस.आम्हा नगरकरांचा हा समज किती खोटा आहे हे मला पुण्यनगरीत आल्यावर समजले.नगरमध्ये गाडी चालवताना सिग्नलला गाडी थांबल्यावर सिग्नल कळत नसल्याने गाडीवर मागे बसला आहे त्याला आम्ही 'सिग्नल आहे का?'असं विचारायचो.पुण्यात सिग्नलला थांबल्यावर 'पोलिस आहे का?'असं विचारतात. अगदी कालचीच घटना घ्या.पुण्यात हेल्मेट सक्ती करून वसुली सुरु झाली अन वादविवादांना अस तोंड फुटले कि पुणेकरांनी ऑफिसला जाण्याऐवजी ट्राफिक पोलिसाबरोबर वादविवाद करून पोलिसांनाच टोपी घातली.एकतर पुणेकरांना (दुस्र्यास )टोपी घालण्याची सवय.आज दुसरा कोण

पनिपत नंतर......

लेखक मनराव यांनी मंगळवार, 16/02/2016 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
पनिपतच्या पराभवानंतर मराठी युद्ध कैद्यांचे काय झाले यावर एक लेख काल लोकसत्ताला वाचला....... २२ हजार युद्ध कैद्यांनां अहमद शहा अब्दालीने आपल्या बरोबर अफगाणिस्तानात न नेता बलुचीसस्तान मधे कलातचा खानाच्या स्वाधीन केले... त्या कैद्यांचे पुढे काय झाले याबद्द्लचा हा लेख आहे. तोच लेख मिपा बांधवांसाठी डकवत आहे....

मोबाइलवर आता मराठी बंधनकारक

लेखक समीर शिन्दे यांनी मंगळवार, 16/02/2016 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात विकल्या जाणा-या मोबाइलमध्ये या पुढे इंग्रजीबरोबरच हिंदी आणि एका स्थानिक भाषेचा समावेश असणे बंधनकारक होणार आहे. दूरसंचार विभागातर्फे येत्या तीन महिन्यांंत याबाबत एक अधिनियम काढण्यात येणार आहे, अशी माहिती या विभागातील एका उच्च पदस्थ अधिका-याने ही माहिती दिली. देशात विकल्या जाणा-या काही मोबाइलमध्ये सध्या भारतीय भाषांचा समावेश आहे. मात्र, काही कंपन्यांचा याला अपवाद असल्याने सरकारने हे पाउल उचलले आहे. देशाच्या कानाकोप-यातील सर्वसामान्य मोबाइलधारकांना परस्परांशी सहज संपर्क करता यावा, यासाठी या पुढे प्रत्येक इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषा असणे अनिवार्य असेल.

शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं

लेखक गणेश उमाजी पाजवे यांनी मंगळवार, 16/02/2016 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया च्या अंतर्गत महाराष्ट्र रजनी हा कार्यक्रम सुरु असताना स्टेज ला आग लागली व खूप गोंधळ उडाला. त्यावरच प्रहारचे ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नर यांनी शेतकऱ्यांच्या वेदनेवर कविता मांडली आहे. श्याम सुंदरसोन्नर यांनी आपल्या कवितेतून सरकारवर आसूड ओढले आहेत, ही कविता सोशल मीडियावर प्रंचड लोकप्रिय होत आहे, फेसबुक तसेच व्हॉटसअॅपवर ही कविता व्हायरल होत आहे.