बेधुंद (भाग ३) - Revised !
(काल पोस्ट केलेला बेधुंद ३ हा धागा उडवला गेला आहे , जास्त वास्तवदर्शी लिहिण्याच्या नादात कदाचित जास्त ' भडक'झाला असावा …काय करणार वास्तव जास्त भडक असत ! , असो आज पुन्हा उजळणी करून पोस्ट करतोय , धन्यवाद ! )
मार्च २००६ :
नित्या ,अक्षा , सुऱ्या अन चंद्या होस्टेल च्या बाहेर आले , कधीकधी मनात खूप विचारांचं थैमान असलं कि बोलायला काही शब्द उरत नाहीत , मनाच्या तळात अंधाराशिवाय काहीच दिसत नाही ! होस्टेल च्या समोर असलेल्या 'डांबरी' रस्त्यावर ते पोहचले . कॉलेज च्या जीवनात संध्याकाळ सुद्धा अगदी सकाळ सारखीच असते , ताजीतवानी !
मिसळपाव
.
.
काळाचा आवाका महाप्रचंड आहे. पृथ्वी जन्माला आली साडेचार अब्ज वर्षांपूर्वी. या आवाक्याला दोन हातांच्या कवेत सामावून घ्यायचं झालं तर आपला दोन-पाच हजार वर्षांचा ज्ञात, लिखित इतिहास म्हणजे नखाच्या टोकाचा कण हे आपण पहिल्या लेखात पाहिलं. मग प्रश्न असा येतो की त्याआधी जे घडलं ते नक्की कधी घडलं हे कसं शोधून काढायचं? आपल्याला जर एखादा जुना जीवाश्म सापडला तर तो नक्की किती जुना हे कसं ओळखायचं?