Skip to main content

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग २)

लेखक Anand More यांनी सोमवार, 22/02/2016 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ------------------------ आजचा आपला भारत देश म्हणजे ब्रिटीशांच्या अखत्यारीतला संपूर्ण भूभाग नाही. ब्रिटीशांच्या अमलाखालील भारताची एकदा रद्द केलेली आणि तीनदा सर्वमान्य झालेली विभागणी / फाळणी झाली. १९०५ सालची बंगालची फाळणी ही पहिली फाळणी. ती लोकक्षोभामुळे ब्रिटीशांनी मागे घेतली. मग १९१९ साली दुसरी फाळणी झाली, ती जुन्या भारतीय संस्कृतीचा भाग असलेला सुदूर उत्तर-पश्चिमेच्या एक मोठ्या भागाने स्वतःला ब्रिटीश साम्राज्यापासून स्वतंत्र घोषित केल्याने. हा भाग होता प्राचीन भारतातला, ‘गांधार’. रामायणकालीन भरताने जिंकलेला गांधार. (भरताच्या तक्ष या पुत्रावरून तक्षशीला आणि पुष्कल या पुत्रावरून पुष्कलावती या शहरांची नावे पडली असे मानतात. प्रसिद्ध इतिहासतज्ञ दामोदर कोसंबींनी, तक्षक या नागाचे शहर म्हणून तक्षशीला अशीही व्युत्पत्ती सांगितली आहे.) बामियानच्या बुद्धमूर्तींची भूमी असलेला गांधार, मगधाधीपती धनानंदाकडून अपमानीत होऊन मगध सोडून विद्यार्जन आणि विद्यादान ही दोनही कामे आयुष्याच्या मोठ्या कालावधीसाठी आचार्य चाणक्यांनी जिथल्या विद्यापीठात पूर्ण केली त्या तक्षशिलेचा गांधार. म्हणजेच आजचा अफगाणिस्तान.

राष्ट्रीय आयोगाचा सोन्यासारखा निर्णय.....

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 22/02/2016 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यासारखे मोठे सण जवळ आले की फ्रीज, टी.व्ही. अशा किमती वस्तूंच्या खरेदीवर मोठी सूट, हप्त्याने खरेदीच्या योजना, किंवा मोठी भेटवस्तू इ. चा सुकाळ असतो. यामध्ये अलीकडे स्क्रॅच कार्ड योजनेची भर पडली आहे. या योजनेमध्ये खरेदीच्या वेळी बिलासोबत एक कार्ड दिले जाते. त्यावरील एक छोटेसे आवरण खरडले की खाली एका वस्तूचे नाव, चित्र किंवा क्वचित रोख रकमेचा आकडा लिहिलेला असतो. ग्राहकाला बक्षीस म्हणून मिळालेली ही वस्तू, किंवा रक्कम देण्याची मुख्य जबाबदारी योजना जाहीर करणाऱ्या उत्पादकाची आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून वस्तू विकणाऱ्या वितरकाची असते.

" झाडीपट्टी चंबल लागते" (झाडी बोली)-(मराठी भाषा दिन २०१६)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 22/02/2016 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
" झाडीपट्टी चंबल लागते" खेती करावले बी मन मोठा बख्खल लागते मिरगात बी तऱ्याच्या पारीले सब्बल लागते जंगल अना जरा नक्सलवादाची आली खबर बाहेरच्याइले झाडीपट्टी चंबल लागते लोकाइच्या मनाले फुटते पाझर येती असा मारा कुराड कोटी बी पानी भलभल लागते स्ययरात ते कईचेे गेले वापस आले नहीं! तुमची जमीन बाप्पा आमाले दलदल लागते आला घरी तई पोट्टा लडुलडु सांगे मायले झोपावले मले वो चिमन्याइचि कलकल लागते ------------ शब्दार्थ बख्खल = (शब्दशः) जाड़ेभरडे, मिरगात= मृग नक्षत्रात तऱ्याची पार= तळ्याचा बाँध सब्बल= पहार कईचे= कधीचे कोटी बी = कोठे पण भलभल= धो-धो वाहणारे लडुलडु= रडत रडत --- स्वामी संकेतानंद

तपकीर गल्लीतला चिंधीचोर (पुणेरी)- (मराठी भाषा दिन २०१६)

लेखक आदूबाळ यांनी सोमवार, 22/02/2016 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
. चित्र श्रेय- अभ्या.. --एक-- रेडियोच्या खरखरीने मला जाग आली. नेहेमीप्रमाणे. डोळे न उघडता मी शेजारी चाचपून बघितलं. अंथरूण गार होतं. आजी अर्थातच उठली होती. खाली सोप्यात जाऊन तिनेच रेडियो लावला असणार. "..तीनशेअठ्ठ्यातर अंश सात आठ मीटर्स, अर्थात सातशेब्याण्णव किलोहर्ट्झवरून आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आज बुधवार. भारतीय सौर दिनांक..." सकाळचे सहाही वाजले नसावेत. बाजूची मोठी खिडकी आजीने उठतानाच उघडली होती. बाहेरच्या महानगरपालिकेच्या दिव्याचा उजेड पडद्यातून गाळून आत येत होता.

शोध उत्तरांचा : आपण सारे गुलाम आहोत का?

लेखक सतिश गावडे यांनी सोमवार, 22/02/2016 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सारे गुलाम आहोत का? हा धागा वाचला आणि लक्षात आलं की यातील काही प्रश्न मलाही सतावत असतात. गेले काही वर्ष मी माझ्या परीने या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. ही उत्तरे शोधताना मी जमेल तितके वाचले. त्यावर विचार केला. आणि आपल्याला थोडं फार कळत आहे असं वाटू लागले. त्याआधारे मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे. जिथे माझे आकलन चुकीचे असेल तिथे नक्की सुधारणा सुचवा.
आपण सारे गुलाम आहोत का?
आपण या प्रश्नाला मुख्य प्रश्न समजू या. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय मानता यावर अवलंबून आहे.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग १)

लेखक Anand More यांनी रविवार, 21/02/2016 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
"विष्णू पुराण" म्हणते की, उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।। म्हणजे राजा भरताचे साम्राज्य आसेतुहिमाचल होते. पण या सम्राट भरताच्या पुढच्या पिढ्या जगात येईपर्यंत ते खंड खंड झालेले होते. महाभारत काळाततर कुठे जरासंधाच्या मगधासारखी साम्राज्यवादी राजेशाही नांदत होती, तर कुठे मथुरेसारखी छोटी छोटी गणराज्ये. म्हणजे भरताच्या वंशजांना "आम्ही चालवू हा पुढे वारसा" काही जमले नसावे.

पहाट / सकाळ!

लेखक अज्ञात यांनी रविवार, 21/02/2016 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट / सकाळ! - नको पहाटेच म्हाणुयात, किती भिन्न असतात ह्या! कधी कधी राग येतो जेव्हा झक्क मारत उठावच लागतं! आणि कधी कधी ती पहाट इतकी प्रिय असते की झोप लागत नाही! अश्या खुप पहाट आहेत लक्षात! जास्त करून दिवाळीच्या! तेव्हा त्या गोधडीतुन बाहेर पडायला अगदी इतकं नकोसं व्हायचं! पण एखादा फटाका फुटावा तसा झोपेचा फुगा फूटायचा गजर किव्वा आईची हाक ऐकल्यावर! - अजुन अश्या पहाटांपैकी पहाट म्हणजे गावी जायच्या वेळेची! बैग रेडी.. कपडे तयार....

"मोरेंचे डोके ठिकाणावर आहे काय?" किंवा, "मोरे तुम्ही स्वतःला काय समजता?" किंवा, "माझी नस्ती उठाठेव."

लेखक Anand More यांनी रविवार, 21/02/2016 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
आरोप: तुम्ही फार मानभावी आणि कृत्रिम होत चालला आहात. स्पष्ट शब्दात दिलेली समज:
  1. तुम्हाला कुणीही त्रास वगैरे दिलेला नाही, नियम वगैरे सांगितलेले नाहीत. माझे मत आहे असे त्यात स्पष्ट लिहिलेले आहे. साधं सोपं म्हणलं तर नवे लेखन यामध्ये वर्गीकरण स्पष्ट लिहिलेले आहे.
  2. फेसबुकावर आपण लिहिता आनंदच आहे. ब्लॉग पण असावा. पण तिथे जसे वातावरण असेल तसेच इथे नाही. रॅगिंग सर्वानाच झालेय.

आमची ‘पद्ये’ भाषा (मराठी भाषा दिन २०१६)

लेखक पिशी अबोली यांनी रविवार, 21/02/2016 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
आलतडीन जिरें पलतडीन जिरें, कां गो जिऱ्या रुजेना, रुजेना, मज गायी तुडीवतात, तुडीवतात, कां गो गायांनो तुडीवतात, तुडीवतात, आमांस राखणा राखेना, राखेना, कां रे राखण्या राखेना, राखेना, मज शेत पिकेना पिकेना, कां गो शेता पिकेना, पिकेना, मज पाऊस पडेना, पडेना, कां रे पावसा पडेना, पडेना, आमचे दिवस आलेच नाही... ‘अशें आमची आई आमां ल्हान असतना म्हणून निजोवीत हती, जाणे मगो?’ मज भाऊ सांगीत हते. भाऊ आपणच कितके जाणटे असणार. त्यांची आई त्यांस हें म्हणून दाखवे म्हणून त्यांस याद हाय हीच मोठी गोष्ट.

पात पिठलं /बेसन

लेखक पियुशा यांनी रविवार, 21/02/2016 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकर्स , नेहमीच्या पिठल्याला वेगळा ट्विस्ट देऊन हि पाक्रु केली न सगळ्याना आवडली पण, म्हणून शेअर करतेय बर्याच जनाना / जणीना माहिती ही असेल पण यु क्नोव बर्याच दिवसांनी पाकृ विभागात लुडबुड करायची संधी का सोडा म्ह्णून पिठलं आपल हे पाकृप्रपंच :) साहित्य : कांद्याची चिरलेली पात - १ वाटी. बेसन - अर्धा वाटी. मिरच्या - ५-६ (आवडीनुसार) लसुन - १० -१२ पाकळ्या. जीर - १ छोटा टीस्पून. मोहरी - १ छोटा टीस्पून. हिंग - १/२ छोटा टीस्पून. तेल - ३ चमचे ( हो जास्तय थोड पण चालतय कधी मधी ) ;) मीठ चवीनुसार. हळद - १/२ छोटा टीस्पून.