Skip to main content

आसावरीची पर्यटन भरारी

लेखक मधुरा देशपांडे यांनी शुक्रवार, 19/02/2016 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
LekhHeader body { background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/xqn2GqLx4B8/s200-Ic42/BhatkantiBgPatrn.png"); background-repeat: repeat; } .inwrap { border: 0.5em solid transparent; -webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/pkuBjbfWrnc/s512-Ic42/Border.png") 10 round; /* Safari 3.1-5 */ -o-border-image: url("https://lh3.googleuse

शृँगार ३

लेखक अनाहूत यांनी शुक्रवार, 19/02/2016 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
उठतो तर रोजच पण आज उठलो ते जरा लवकरच . एवढ्या सकाळी , सॉरी पहाटे उठायच म्हणजे थोडे श्रम पडलेच . नुसत गजर लावून चालत नाही , तो वाजल्यावर जाग यायलाही हवी आणि नुसती जाग येऊन भागत नाही तर नाईलाजाने का होईना अंथरूणातून बाहेर याव लागत . मोठ्या प्रयासाने या गोष्टी करून एकदाचा तयार झालो . आजपासून जिम सुरू करायची थोडी फिटणेस पाहिजे ना राव . स्वतःच आवरल्यावर बायकोपाशी गेलो . तिला कालच सांगितल होत जिमला सोबत येण्याबद्दल . तिनेही जिम केली तर लवकर फरक पडणार होता , म्हणून हा सगळा खटाटोप .तिला आवाज दिला आणि उठवण्याचा प्रयत्न केला . ती अशी काही वसकन अंगावर आली की मी घाबरून मागे सरकलो .

चंद्रगड ते आर्थर सीट, महाबळेश्वर

लेखक सुनिल साळी यांनी शुक्रवार, 19/02/2016 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
फार काही दिवस झाले नाही राजगड ते तोरणा हा रेंज ट्रेक करून.. पण मन काही स्वस्थ बसवेना सह्याद्रीच्या ओढीने. पुढील ट्रेक ची आखणी चालू आहे. चंद्रगड ते आर्थर सीट, महाबळेश्वर रेन्ज ट्रेक... एकूण 7-8 भटके आहेत. शक्यतो बाइक ने प्रस्थान. बाइक महाबळेश्वर ला लावणार. तेथून चंद्रगड पायथ्याला आपल्या लाल डब्याने. रात्री गावात मुक्काम. सकाळी 6 वाजता आर्थर सीट कडे प्रयाण. आपल्यातले काही मिपाकर मंडळी नेहेमी भटकंती करीत असतात. जर कोणी चंद्रगड ते आर्थर सीट हा ट्रेक केला असेल तर कृपया अधिक माहिती द्याल का? ह्या ट्रेक बदद्ल.

लदाख सायकल ने : श्रीनगर ते दिल्ली (भाग १९)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी शुक्रवार, 19/02/2016 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
खर म्हणजे मी खूप थकलो होतो. १०० किलोमीटर पेक्षा आज जास्त सायकल चालवली होती. त्याचे मी लगेच ऐकला आणि दुकानाच्या पायर्यावर बसलो. बाकीचे लोक म्हणायला लागले कि इथे नको बसू आत जाउन खुर्ची वर बस. मी नाही म्हंटला इथेच ठीक आहे. मग सगळे जवळ आले. खूप गप्पा मारल्या. दिल्ली वरून आलोय, मनाली वरून सुरु केलं होतं आणि आज इथे संपवतोय. ते खूप लक्ष्य देऊन ऐकत होते. त्यांनी त्यांच्या घरी यायचे निमंत्रण दिला. मी सरळ नाही म्हणून सांगितले. मला आशा नव्हती कि काश्मीर मध्ये एवडे प्रेम मिळेल ते. पण हे गाव होतं त्यामुळे असेल कदाचित. शहराची गोष्ट वेगळी आहे. अर्धा तास थांबल्यानंतर तेथून निघालो.

(अशी कबुतरे येती)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी गुरुवार, 18/02/2016 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
अशी कबुतरे येती; आणिक घाण ठेवुनी जाती दोन घरांची पुण्यकमाई दहा घरांच्या खाती कपोत आला, पहिला वहिला खिड़कीमागे उभा राहिला तया मागे, येई साजणी गूटर्गूच्या साथी... दुरून येती थवे देखिले मी ग्याल्रीचे दार लोटिले धड़क मारती तरी निरंतर गंधित झाल्या भिंती पंख दोन ते हळु फ़डफ़डले खोलीभर मायेने फिरले हॉलकिचनाच्या भिंतीमधुनि लागेना मज हाती 'पुण्यवान' तो येता गाठी शिव्या पाच मोहरल्या ओठी त्या तुटल्या दातांची गाथा क्रूर कबुतरे गाती -- स्वामी कपोतगावकर
काव्यरस

प्रसार माध्यमे आणि टिपिंग पॉईंट - एक रोचक संशोधन

लेखक विकास यांनी गुरुवार, 18/02/2016 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
दि न्यूयॉर्कर साप्ताहीकाचा पत्रकार माल्कम ग्लाडवेल, याने २००० मधे एक पुस्तक लिहीले होते - "The Tipping Point - How Little Things Can Make a Big Difference". कुठलिही गोष्ट अचानक मोठी होण्याआधी कशा घटना घडत असतात त्या एकमेकांना कशा लागलेल्या असतात, याचा अन्वयार्थ लावताना या पुस्तकात अनेक गोष्टींचा उहापोह केलेला आहे. असा टिपिंग पॉईंट हा रोगराई, युद्धे, गुन्हेवारी वाढ इथपासून ते राजकीय बदल या सर्वत्रच दिसू शकतो. उदा. "ऑस्ट्रीयाच्या राजपुत्राचा खून हे पहील्या महायुद्धाचे तात्कालीक कारण" समजले जाते.

संध्याछाया..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 18/02/2016 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xpf1/t31.0-8/fr/cp0/e15/q65/11700956_972982042788082_3452425137241717189_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9 संध्यासमयी देवालय हे आकाशाशी सरते.. एक अशी हि अबोल संध्या मनामधेही उरते. माहीत नाही तिचे नि माझे कुण्या जन्मीचे नाते ओळख नसता जन्मखुणा ती कुठल्या कसल्या देते!? दूर देशीचा वाटसरू मी आलो या संध्येशी नकळत नाते कसेच जुळले हिच्या मग्न छायेशी? हिशोब मी हि कशास बांधू?

मदत हवी आहे.

लेखक गौतमी यांनी गुरुवार, 18/02/2016 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. मि. पा. वर नवीन आहे आणि पहिलच लेखन मदत करण्याबाबत करते आहे. मुंबईहून महाबळेश्वर पिकनिक (विरंगुळा) काढायची आहे. तर तसा प्लान बनवायला मदत हवी आहे. तिथे बघण्यासारखी स्थळे काय आहेत.(२८ ला निघुन २ मार्चला परत यायचय) जेजुरी पहायचीही फार इच्छा आहे. कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे. (कसे जाणे जास्त सोईस्कर असेल? कुठे उतरावे? जवळपासची चांगली हॉटेल्स आणि चांगल जेवण.)

'भुकमय बडबड'

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 18/02/2016 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
२वर्ष सहन केलं... शेवयांचा उपमा आणि दूधी/पडवळ ह्यासारख्या पाइपसदृश भाज्या! २००५-०७च्या दरम्यान, ब्राम्हण वाडीत राहायचो तेव्हा एकांच्या कडे डबा लावलेला, लहानपणी भाजी आवडली नाही की घासाबरोबर गटागटा पाणी प्यायचो... पण हा डबा खाताना ते करायचं बाळबोध डेरिंग व्हायचं नाही. कधी कधी इतका राग यायचा, की डबा अक्खा आमच्या मागच्या खिडकीतून स्वाह: किंवा पिशवीतुन फलाटावरच्या गरजू लोकांना, तो खिडकीचा मूर्खपणा १-२दाच केलेला.. पण ठीके! राग येतोच, व्यक्त करायची पद्धत चुकली! असो... माझा डब्यात बहुदा ह्या पाइपयुक्त भाज्या ५०%असायच्या पण माझा रुमपार्टनर नीलमच्या बाबतीत ते पर्सेंटेज ८०इतकं होतं!

तू आणि मी

लेखक प्रसाद_कुलकर्णी यांनी गुरुवार, 18/02/2016 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, खूप दिवस झाले मनात काही तरी घोळत होते, पण सांगड बसत नव्हती... आणि अशातच 'व्हॅलेन्टाईन डे'ला कुठून तरी प्रेरणा मिळाली आणि गोष्टी आपोआप जुळत गेल्या...