Skip to main content

इंग्लिश विन्ग्लीश !

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 27/05/2016 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
मी इंग्रजी सिनेमे पाहण्याचे जवळजवळ थांबवल्यापासून माझ्याकडे तुच्छतेने पाहणाऱ्या नजरा वाढल्या आहेत. खरं म्हणजे माझ्या पाहण्या न पाहण्यामुळे या सिनेमांच्या लोकप्रियतेत किंवा अर्थकारणात काहीही फरक पडत नाही. फरक केंव्हा पडतो तर जेंव्हा चार लोकांत मी अमुक अमुक सिनेमा पहिला नाही असे कबूल करतो तेंव्हा. "नाही...मी नाही पहिला अवतार" "काय? तू अवतार नाही पाहिलास?", खुर्चीवरून उसळत माझा कलीग मला विचारतो. "नाही" "मूर्ख आहेस का तू ? तुला कळत नाहीये तू काय गमावलं आहेस!!!" हे प्रातिनिधिक संभाषण नेहमी,"तुझे पता हैं तुने किसका कॅच छोडा हैं?" या आवेशात सुरु होतं. आणि शेवटी "गाढवाला गुळाची चव काय" यावर संपतं.

ध्वनी अनुदिनी (Audio Blog) चौथे पुष्प - तक्रार मार्गदर्शन - भाग 2 - श्री. विवेक पत्की

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शुक्रवार, 27/05/2016 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
ध्वनी अनुदिनी पुष्प - 1 - मुंबई ग्राहक पंचायत - ओळख - श्री अशोक रावत ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था - श्री. कमलाकर पेंडसे ध्वनी अनुदिनी - पुष्प 3 - तक्रार मार्गदर्शन - श्री. विवेक पत्की सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार, आज आपल्या समोर सादर आहे या ध्वनी अनुदिनीचे (Audio Blog) चौथे पुष्प. या भागात आपण तक्रार मार्गदर्शनाची मागील भागात घेतलेल्या माहितीचा पुढचा भाग ऐकणार आहोत.

(या क्वार्टरवेळी)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 27/05/2016 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरती कातरवेळा अवतरल्या, प्रतिसादातून कोणीकोणी क्वाटरवेळाचाही उल्लेख केला, मग काय ईर्शाद... साक्षात गदिमांच्या कातरवेळी ला आम्हाला असं 'कातरावं' लागलं!
काव्यरस

एक्सेल एक्सेल - भाग ३ - उपयुक्त शॉर्टकट कीज

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 27/05/2016 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३ तिसरा भाग - होम मेनू ची ओळख, आणि नेहमी लागणा-या शॉर्टकट कीज 3

पेटती चूल

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 27/05/2016 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
ए.आय डी सी ला असताना अनेक युनिट्स इलेक्ट्रिसिटी चा "स्यान्क्शन लोड" आहे त्या पेक्षा जास्त मशीन कारखान्यात लावत असत.

आंब्याची भजी"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 27/05/2016 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या "नांदा सौख्य भरे" च्या एपिसोड मधे..नील व स्वानंदी घरी जेवायला येणार म्हणुन " आमरस व आंब्याची भजी" असा बे त आहे असे काकु सांगते... पुढे "आंब्याची भजी " हा ईंदुरी प्रकार आहे असे सांगते... "आंब्याची भजी " हा प्रकार मी व आप्ल्या पैकी ब-याच लोकानी प्रथमच ऐकला असेल... शेवटी रेसिपी मिळाली...बनवा व चापा ....

विस्तारभयास्तव

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 27/05/2016 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
विस्तारभयास्तव मी स्वप्नांची लांबीरुंदी कमी केली गजराची धारदार कात्री वापरून काटछाट केलेली ती स्वप्ने गळत असतात पापण्यांमधून विस्तारभयास्तव कंटाळवाणा प्रवास टाळत गेलो हा अधिकचा प्रवास दिला साठवून आता प्रवास शक्य होत नाही विस्ताराचे अजिबात भय नसून विस्तारभयास्तव कितीतरी विचारांना दिली जन्मठेप काही पॅरोलवर सुटले कैदेतून मी परत त्यांना कैदेत टाकतो सावधगिरीचा उपाय म्हणून विस्तारभयास्तव घराला भिंतीमध्ये बंद केले कहर केले त्याला छप्पर देऊन आता खिडकीतून पाहत बसतो वादळवारागारापाऊसऊन ----////-----------////------- Self-censored:- विस्तारभयास्तव कविता लिहताना मात्रा मोजल्या कादंबऱ्या लघुकथेत को

हरवले ते गवसले का ? व कसे ? भाग - 8 लक्षाधीशाचा भिक्षाधीश!

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 27/05/2016 00:13 या दिवशी प्रकाशित केले.

हजारो रूपये डोळ्यासमोरून धडाघडा जाताना पाहण्याचे भाग्य (?) कपाऴी आले!!!

मित्रांनो, खालील धागा वाचला आणि मला माझ्या विदेशातील प्रवासात बसलेला हिसका आठवला...! Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत.. आणि माझ्या जीवनातील हरवलेल्या गोष्टींत या कथानकाची भर पडली! आता काळ जखमाभरून काढणारे 'मलम' म्हणतात ते खरे आहे याची प्रचीती आली. पण आज 'पैसै परस्पर काढले गेले' हा धागा वाचला आणि त्या जखमेची खपली निघाली आणि आता ती कहानी सादर करायचे ठरवले असो.

पाणी अडवा पाणी जिरवा - एक सफल प्रयोग.

लेखक खटपट्या यांनी गुरुवार, 26/05/2016 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागे एकदा मी माझ्या कोकणातील गावाची काही चित्रे खफ वर डकवली होती. ही चित्रे गावातील पाणी टंचाई बाबत होती. पैसा ताइंनी मला याबद्द्ल लेख लीहीण्यास सुचवले म्हणून हा प्रपंच. आज काल आपण जलयुक्त शिवार आणि अशाच काही सरकारी योजनांबद्द्ल ऐकतो. नाद खूळा यांची तर लेख मालाच आली होती पाणी नियोजनाबद्दल. अशा योजनांमधे सरकार जीतकी शक्य होइल तेवढी मदत करतच असते. (निदान नवीन सरकार तरी सकारात्मक आहे) बर्याच वेळेला शासकीय यंत्रणा काही कारणास्तव प्रत्येक गावात पोहोचू शकत नाही. पण सरकार काही करत नाही म्हणून बसून रहाण्यापेक्षा आपण जर योजना फक्त समजावून जरी घेतली तरी बरेच फायदे होउ शकतात. आता ते कसे ते पहा.