Skip to main content

पार्टी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 31/05/2016 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
सायंकाळी मित्रा समवेत घरी पार्टी चा बेत ठरला होता.. बीअर मद्य आदी आणुन ठेवले्लेच होते.. मटण आणायचे होते.... दुपारच्या रणरणत्या उन्हात तो खाटकाच्या दुकानांत आला.. १ किलो मटण अशी ऑर्डर दिली.. अन त्याचे लक्ष बाजुला बांधलेल्या उन्हाच्या चटक्यात पाण्याविना तळमळ्णा-या बक-या कडे गेली.. व त्याचे मन हेलावले... पण तो क्षणांत भानावर आला अन विचार करु लागला.... मी संवेदना क्षम व्यक्ति आहे का दांंभिक????

धन्यवाद गानू…

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 31/05/2016 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
"संध्याकाळची वेळ... ७.१० झाले असतील... एक माणूस बॅंकेत आला... गार्ड म्हणाला बैंक बंद झाली आहे ७ वाजताच, आता उद्या या, तो माणूस काय ऐकायला तयार नाही. गार्ड आला माझ्याकडे म्हणाला एक माणूस आलाय, म्हणतोय अर्जन्ट आहे, पैसे काढायचेत... मी म्हणालो, ठीके पाठव आत.. शटर अर्धवट उघडून गार्डनी पाठवलं त्या माणसाला आत... मी विचारलं चेक आहे का उत्तर नाही, पासबुक आणले का उत्तर नाही... डिमांड ड्राफ्ट आहे पण त्यावरून कॅश देणे जमणार नाही... कैशियर नाही, दिवासभराचा लेखाजोखा सम्पलेला आहे, उद्या या... हे ऐकून तो माणूस भडक्ला... अहो परिस्थिती समजून घ्या, मला पैसे हवेत हॉस्पिटलसाठी, तुम्हाला कळत नाही का...

गोनिदा...................

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी मंगळवार, 31/05/2016 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या १ जुन.......गोनिदा जाउन अठरा वर्ष होतिलं. १ जुन १९९८ ला पुण्यात ते अख्ख्या महाराष्ट्राला पोरकं करुन मोठ्या प्रवासाला निघुन गेले...कायामचे! आज जर अप्पा ( गोनिदांना) असते, अर्थातच ते आजही आपल्यातच आहेत...आठवनींच्या रूपात, त्यांच्या लिखाणाच्या रूपात, पण जर हयात असले असते तर येत्या ८ जुलैला १०० वर्षांचे झाले असते..असो. आज सहजच त्यांची आठवण आली आणि लिहीता झालो.

ती विलासींनी मदालसा,

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 31/05/2016 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
ती विलासीने मदालसा,मिठीत कैद होती अनंग कथा ऐकण्यात, ति जरा गुंग झाली असावी चुंबीत अधर लाल,लागता हात उरोजास कोवळी लावण्य कळी ,ती जरा लाजली असावी घुसता आरपार तो मदन शर हृदयात रतीसम सुंदरी ,ती जरा घायाळ झाली असावी कुरवाळीता ,त्या मोकळ्या रेशीम कुंतलास त्या काम गंधाने, ती जरा बेभान झाली असावी मधाळ हसून,टाकता कटाक्ष त्या दर्पणात तो भंगला पाहून,ती जरा चकित झाली असावी अर्पीता कोवळी कोरी तनू, ह्या पौरुषाला ती कोमलांगी ,पौरुषा पुढे हरली असावी Avinash

एक संवाद

लेखक अनाहूत यांनी मंगळवार, 31/05/2016 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
" अरे भाई काय मग कस काय ? दिसला नाय दोन दिवस ? " " काय नाय रे ते जरा दोन दिवस जेलमध्ये होतो ." " का भाई ? तुमाला आणि जेलमध्ये ? अस काय केल तुम्ही ? " " अरे काय नाय रे जरा भुक लागली होती आणि दुधाच पातेल कट्ट्यावरच होत . मग काय घातल तोंड आणि पित होतो . आणि मी काय सगळं संपवणार नव्हतो काय त्याला ठेवणार होतो ना . पण नाय साला कायतरी फेकून मारल डायरेक्ट पेकाटातच बसल ना आणि पाठीमागून वार केला ना . हिंमत आहे तर समोरून करायचा ना वार मग सांगितलं असत अपुन काय चीज आहे ते . चांगल बोचकारल असत आणि चावलो पण असतो . मग फिरत बसला असता इंजक्शन शोधत .

माझी जंगलची सैर

लेखक दिनु गवळी यांनी मंगळवार, 31/05/2016 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
काल घरी काहीच काम नव्हत, म्हणुन म्हटल चला आज जंगलात फिरुन येऊ, सोबत माझा मित्र अमित पण होता. आम्ही बाईक वरुन जंगलात जायला निघालो तसा जंगलात जाणारा रस्ता हा काही एवढा खास नव्हता पण बैलगाड्यांच्या जाण्यायेण्याने बऱ्यापैकी गाढ रस्ता तयार झाला होता. बंधाऱ्याच्या पिचींग वरुन जातांना खाली बघतांना खुप मस्त वाटत होत. बंधाऱ्यात थोडसच पाणी होत . काही मुले त्यात मासे पकडत होते. काही पाण्यात पोहोण्याचा मनसोक्त आनंद लुटत होते., आमच्या गावाकडच्या जंगलात रानातील आंबे खायला खुप मजा येते.

भरतपूर : पक्षांचा स्वर्ग दरबार

लेखक हृषिकेश पांडकर यांनी मंगळवार, 31/05/2016 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
फार पहाटही नव्हती सकाळची साडे आठ पाऊणे नऊची वेळ.शेवटचा डबा प्लॅटफॉर्मला टेकला आणि गाडी स्तब्ध झाली.इतकावेळ दारात ठेवलेले सामान खाली ठेवले.उघडे अवयव गारठतील एवढी थंडी नक्कीच होती.धुक्यामुळे स्टेशनची पाटी धुसर दिसत होती.फलाटावर पाय ठेवला आणि गाडीने स्टेशन सोडले. राजस्थानात असलेले 'ब्रज' प्रदेशातील शहर 'भरतपूर'.स्टेशन मधून बाहेर येताना घोंगडी,स्वेटर इत्यादी वस्त्र लपेटून सोडायला किव्वा घ्यायला आलेली मंडळी,झोपलेले भिकारी,आमच्यासारखे उतरलेले किवा काही चढणारे प्रवासी,४/५ स्टेशन झाडणारे सफाई कर्मचारी,द्रोणामध्ये वडापाव विकणारे २/३ छोटे ठेलेवाले आणि प्रवाशांना इष्ट स्थळी पोहोचवण्यासाठी स्पर्धा करणार

चलती का नाम…पॉम पॉम

लेखक अश्विनी वैद्य यांनी मंगळवार, 31/05/2016 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
"चला रे लवकर…अकरा वाजून गेलेत…बारा पर्यंत पोहोचायचंय ना…त्यात traffic असणार…म्हणजे अजून वेळ लागणार…आवरा आता…" नवऱ्याची ही नेहमीची घाई माझ्या अंगवळणी पडलेली. "अरे जेवायलाच जायचंय ना xxx च्या घरी… पोहोचलो १०-१५ मिनिटं उशीरा तर एवढं काय…मुलांचं आवरून निघेपर्यंत इतके तर वाजणारच ना…त्यात आज रविवार….सकाळी उठण्यापासून सगळ्यांचं सगळंच निवांत…आणि त्यांना पण कुकायला जरा वेळ मिळू दे की…" खांद्याला मोठी bag लटकवून लेकाला कडेवर घेवून पायात शूज अडकवत माझा जरा चिडकाच स्वर लागला.

तलत महमूद- ‘आता है फिर ख्याल कि ऐसा कहीं नहीं...’

लेखक महामाया यांनी सोमवार, 30/05/2016 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
तलत महमूद ची आठवण.... ‘ये तो नहीं कि तुमसा जहां में हसीं नहीं, इस दिल का क्या करूं जो बहलता नहीं कहीं... कहता हूं इस दिल से और हसीं ढूंढिए कोई, आता है फिर ख्याल कि ऐसा कहीं नहीं...’ तलत महमूद नी म्हटलेली दाग ची ही गझल स्वत: तलतच्या बाबतीत देखील खरी ठरते. तलत एकमेवाद्वितीय होता. याचा प्रत्यय त्याची गीते असलेले चित्रपट बघतांना पुन्हां आला.