
श्रीगणेश लेखमाला २०१६ -आवाहन
नमस्कार मिपाकर हो !
आषाढ-श्रावणात पावसाने सूर जमवला की मराठी मनाला वेध लागतात श्रीगणेशोत्सवाचे. दहा अकरा दिवस गणेशाची विविध मनोहारी रूपे बघून डोळे निववुन घेण्याचे. आणि मिपाला वेध लागतो तो नित्य नूतन रंग लेवून मिपाकर रसिकांच्या रंजनाकरिता येऊ घातलेल्या श्रीगणेशलेखमालेचा.
शशक स्पर्धा, मराठी बोली सप्ताह, विडंबन स्पर्धा, पुस्तक दिन लेखमाला अशा लोकप्रिय उपक्रमांनंतर काही दिवसांचा ब्रेक घेऊन मिसळपाव प्रशासन पुन्हा आपल्यासाठी नवीन उपक्रम घेऊन येत आहे. सालाबादप्रमाणे यंदाही श्रीगणेश चतुर्थीला आपण श्रीगणेश लेखमाला, चित्रमाला आणि मिपाचा नववा वर्धापनदिन साजरा करत आहोत. गेल्या वर्षी श्रीगणेश लेखमालेत व्यवसाय/करिअर या विषयावरील लेखमालिकेला उदंड प्रतिसाद मिळाला.
यावर्षी आम्ही, व्यवसाय सांभाळून जोपासलेला छंद या हलक्या फुलक्या विषयावर लेखमालिका गुंफीत आहोत. यशस्वी व्यवसाय करून, ट्रेकिंग, इतिहास संशोधन, कला-कारागिरी असे आगळे वेगळे छंद जोपासणारे आणि त्यात कर्तृत्वशाली भरारी घेणारे अनेक गुणी लोक मिपावर आहेत. अशा मिपाकरांनी आपल्या छंदाविषयी आणि तो कसा विकसित झाला याविषयी माहिती देणारे लेख लिहून या लेखमालेसाठी द्यावेत अशी विनंती आहेत. यात साधारण खालील माहिती अपेक्षित आहे.
- आपला व्यवसाय कोणता आणि आपण कोणता छंद जोपासला आहे ? छंदाचे स्वरूप काय ?
- छंदाविषयी थोडक्यात माहिती
- हा छंद कधीपासून लागला आणि कसा ?
- व्यवसाय सांभाळून छंद कसा विकसित केला ?
- छंदाचा व्यवसायात कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपयोग होतो का ?
- व्यवसायाचा / व्यावसायिक शिक्षणाचा छंदात उपयोग होतो का ?
- छंदातून इतरांना कोणत्या प्रकारची मदत झाली आहे का अथवा प्रेरणा मिळाली आहे का ?
- छंदातून केलेली कामगिरी किंवा अचिव्हमेंट.
- छंदातून विकसित झालेला जनसंपर्क.
- तुमचा छंद छंदच राहिल्याची खंत वाटते का ? कुठे कमी पडल्यासारखं वाटतं का?
- छंद आणि व्यक्तिगत जीवन यात समन्वय कसा साधता ?
- छंदाची प्रेरणा मिळालेली असल्यास ती कुणाकडून मिळाली?
- आदर्श म्हणून कुणाकडे बघता?
- या तुमच्या छंदाबाबत काही निश्चित ध्येय डोळ्यासमोर आहे का?
- अनेकदा एखाद्या गोष्टीची सुरुवात खुप अंडर स्टेटेड असते. आपण आपल्याच इन्स्टिन्क्ट्स कडे दुर्लक्ष करतो. तुमचे असे कोणते इन्स्टिन्क्टस कदाचित तुमच्याही नकळत अग्रेसिव्ह झाले आणि आज त्याला हे स्वरुप आलं? आज मागे वळुन पाहताना एखादी अशी छोटी सुरुवात आठवते का ज्याने तुमच्या या छंदाला मूर्तस्वरुप आलं?
- आपल्या छंदात पालक / शिक्षक / सहकारी / आजुबाजुची परिस्थिती यांची काही मदत झाली का ?
- छंद हा निव्वळ आवड म्हणून जोपासता की त्यावरून काही मिळकत होणे हा त्यातल्या यशाचा एक मापदंड मानता ? किंवा त्याला दर्दी लोकांची दाद मिळणं हा " स्वान्तसुखाय" आणि महत्वाचा भाग आहे असं वाटतं का?
- छंदाविषयीचे फोटो इ.
तसेच, असा एखादा जबरदस्त छंद असणारी, पण मिपाकर नसणारी व्यक्ती आपल्या माहितीत असेल, तर त्यांची या विषयावर वरील मुद्द्यावर घेतलेली तपशीलवार मुलाखत लेखमालेसाठी दिली तरी चालेल.
कृपया आपले लेख दि. १५-८-२०१६ पर्यंत ‘साहित्य संपादक’ या आयडीला व्यनि करून
अथवा sahityasampadak.mipa@gmail.com या पत्त्यावर ईमेल करून पाठवा.
हाही उपक्रम श्रीगणेश कृपेने आणि मिपाकरांच्या सहकार्याने सुफळ संपूर्ण होवो अशी श्रीचरणी प्रार्थना !!
धन्यवाद.
साहित्य संपादक,
मिसळपाव प्रशासन.
टीप : श्रीगणेशलेखमालेत निवडक लेख प्रकाशित करून झाल्यानंतर जादाचे लेख काही कालावधीनंतर प्रशासनाकडून प्रकाशित केले जातील अथवा सदस्य स्वत: प्रकाशित करू शकतील.(छायाचित्र आंतरजालावरून साभार )
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्यवसाय सांभाळून जोपासलेला
अर्थात !
In reply to व्यवसाय सांभाळून जोपासलेला by स्पा
अनेकदा एखाद्या गोष्टीची
मिपा हाच छंद आहे!! इतर छंद
हायला बाप्पू भारीच. आमचा छंद
In reply to मिपा हाच छंद आहे!! इतर छंद by कैलासवासी सोन्याबापु
मी शेजारी
In reply to हायला बाप्पू भारीच. आमचा छंद by अभ्या..
मिपा हाच छंद आहे!!
In reply to मी शेजारी by नाखु
हॅ !!! नाखु काकांस खाली अंगठा
In reply to मी शेजारी by नाखु
उंचावरून बोका लोटतात म्हणजे?
In reply to हॅ !!! नाखु काकांस खाली अंगठा by कैलासवासी सोन्याबापु
हा मात्र माझा छंद आहे.
In reply to उंचावरून बोका लोटतात म्हणजे? by बोका-ए-आझम
सोलापूरला आल्यावर
In reply to हा मात्र माझा छंद आहे. by अभ्या..
अरे, तुम्हाला काय कंपौंडावर
In reply to सोलापूरला आल्यावर by बोका-ए-आझम
हे आवडलं !
In reply to अरे, तुम्हाला काय कंपौंडावर by अभ्या..
माह्यासाठी बी रुमाल टाकून
In reply to मिपा हाच छंद आहे!! इतर छंद by कैलासवासी सोन्याबापु
मिपाचा साक्षात ललित/विनोदी
In reply to माह्यासाठी बी रुमाल टाकून by चिनार
बापूसाहेब...तुमच्या शेजारची
In reply to मिपाचा साक्षात ललित/विनोदी by कैलासवासी सोन्याबापु
चिनार्या इथे थेट आलास
In reply to बापूसाहेब...तुमच्या शेजारची by चिनार
श्वाससॉस घ्यायला फुरसत नाही. आणि हो माईंना म्हणावं संमेलनाला "यांच्या" सोबतच या उगा नंतर चुकामुक नको.कसलं काय...लोणच्याची बरणी
In reply to चिनार्या इथे थेट आलास by नाखु
सिनेमा बघणे किंवा वाचन
+१००००००
मिपामिपा खेळणे हा पण छंद होवू शकतो का?
In reply to +१०००००० by अजया
गणेश लेखमालेस शुभेच्छा.
+१
In reply to गणेश लेखमालेस शुभेच्छा. by प्रचेतस
तुझ्याकडून लेख अपेक्षित आहे
In reply to +१ by स्वच्छंदी_मनोज
+१
In reply to तुझ्याकडून लेख अपेक्षित आहे by प्रचेतस
+२
In reply to +१ by स्वच्छंदी_मनोज
लेखन हा छंद आहे का?
माहिती नाही पण व्यंगचित्रकला
In reply to लेखन हा छंद आहे का? by ए ए वाघमारे
सध्या दोन छंद जोपासणं चालू
.
In reply to सध्या दोन छंद जोपासणं चालू by सूड
सूडराव म्हण्टात त्याच पण
व्यवसाय नसला तर चालेल का?
हो.
In reply to व्यवसाय नसला तर चालेल का? by जागु
लौकर लौकर!
पैसा ताई, आवडेल की लिहायला.
धन्यवाद!
In reply to पैसा ताई, आवडेल की लिहायला. by अभिजीत अवलिया
अरे वा !
In reply to पैसा ताई, आवडेल की लिहायला. by अभिजीत अवलिया