पळीचा सोडा
आज सकाळी उठुन अचानकच कुठे तरी फिरायला जाऊया विचार करायला लागलो.आमच्या रायगड जिल्ह्याचं एक बरं आहे एका दिवसात जाऊन परत येता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं आहेत. मग जवळच अलिबागला जाऊन येऊ ठरवलं.
पुणा हायवे आमच्या गावाच्या अंगणात तर गोवा हायवे परसात आहे.जातानाचा आमचा रसायनी ते आपटामार्गे खारपाडा रस्ता माझा अतिशय आवडता रस्ता आहे.दुतर्फा गर्द झाडी,डोंगर,बाजूने लांबून छान जवळून पूर्ण प्रदूषित नदी!
एकदा का पेणचा रस्ता सुरु झाला की सगळी हाडं खिळखिळी व्हायला सुरूवात होते ती थेट वडखळ जाईपर्यंत. वडखळला मिसळ वडा स्टाॅप घ्यावाच लागतो असा अलिखित नियम आहे!
मिसळपाव