अंड्याचा पुलाव
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. अरे पण ज्या दिवशी नॉन्व्हेज खातो तेव्हा काय ते नेहमी ऑम्लेट, बुरजी, उकडलेली अंडी खायची. खर तर डब्याला बुधवार, शुक्रवार बुरजी की ऑम्लेट न्यायच ही समस्या असते.
बरेच दिवस रेसिपी टाकली नाही म्हटल चला आज रेसिपी टाकून होईल आणि नविन प्रकारही डब्यात नेता येईल म्हणून हा पुलाव सुचला. करायला सोप्पा सोपा म्हणण्यापेक्षा झटपट सकाळच्या वेळेत वेळखाऊ नसलेला आहे.
साहित्यः
६ किंवा आवश्यकतेनुसार अंडी (उकडून, साले काढून आणि काट्याने मध्ये मध्ये अलगद टोचे मारुन)
दोन वाट्या तांदुळ
दोन कांदे चिरुन
अर्धा वाटी दही
२ चमचे आल-लसुण पेस्ट
१ मोठा चमचा मसाला किंवा १ लहान चमचा तिखट
फोडणीसाठी तेल
चविनुसार मिठ
कोरडा मसाला:
१ चमचा जिर
१ चमचा धणे
दालचिनी १ ते २ तुकडे
३ वेलच्या
४-५ लवंग
पाककृती :
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. अरे पण ज्या दिवशी नॉन्व्हेज खातो तेव्हा काय ते नेहमी ऑम्लेट, बुरजी, उकडलेली अंडी खायची. खर तर डब्याला बुधवार, शुक्रवार बुरजी की ऑम्लेट न्यायच ही समस्या असते.
बरेच दिवस रेसिपी टाकली नाही म्हटल चला आज रेसिपी टाकून होईल आणि नविन प्रकारही डब्यात नेता येईल म्हणून हा पुलाव सुचला. करायला सोप्पा सोपा म्हणण्यापेक्षा झटपट सकाळच्या वेळेत वेळखाऊ नसलेला आहे.
कोरड्या मसाल्याचे सामान तव्यावर थोडे भाजून मिक्सर मध्ये पुड करा. कुकर किंवा भांडे गॅसवर चांगले तापवून तेलावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतवा. नंतर त्यावर आल-लसुण पेस्ट व कोरडा मसाला टाकुन परतवा. (आहाहा मस्त घमघमाट सुटलेला ह्या मिश्रणाचा)
त्यावर दही व मसाला घालून परतवा. (कलर कॉम्बीनेशन छान दिसत आहे ना?)
आता मिश्रण ढवळून त्यात अंडी घालून हलकेच परतवा.
आता तांदुळ आणि मिठ घालून मन शांत ठेऊन, कोणाचाही राग ह्या मिश्रणावर न काढता हलक्या हाताने सगळे परतवा. हा उपदेश अंड्याची चिरफाड होऊ नये म्हणून .
आता तांदुळाच्या दुप्पट किंवा तुम्ही नेहमीच्या अंदाजाने पाणी घाला. (हा माझा नविन मसाला आहे. कसा रंग आहे?)
जर कुकर लावत असाल तर थोडे कमी घाला. पुन्हा थोडे ढवळून कुकर लावा किंवा टोपात शिजू द्या. कुकरच्या तिन शिट्यात पुलाव तयार होतो. पातेल्यात करत असताना मधूनच एक-दोनदा अलगद परतत रहा.
झाला आहे तयार अंड्याचा पुलाव.
थोडा अजुन जवळून
प्राजक्ता म्हात्रे
कृपया रेसिपी शेयर करताना नावासकट शेयर करावी.
अधिक टिपा:
घाबरू नका अंडी तुटली तरी आपल्याला खायचीच आहेत फक्त डेकोरेशन करता येणार नाही इतकच. त्यामुळे बिनधास्त.
हाच पुलाव मसाल्या ऐवजी आल-लसुण पेस्ट मध्ये मिरची घालूनही करता येतो.
रेसिपीखाली नाव मुद्दम टाकल आहे. कारण फेसबुकवर बहुतेक माशांच्या रेसिपीज नाव न टाकता चोरीला गेल्या आहेत. तसे हे नाव काढूनही चोरले जाऊ शकतात पण एक मानसीक समाधान स्वतःचेच. :हाहा:
याद्या
19995
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी..!!!!
तळलेली अंडी घातली तर अजून
वा वा! अब खाना ही पड़ेगा.
ते बैदा रोटी वाले भाऊ अन इकडे
+१११
In reply to ते बैदा रोटी वाले भाऊ अन इकडे by कैलासवासी सोन्याबापु
धन्यवाद.
माने. धनंजय माने. ;)
In reply to धन्यवाद. by जागु
सॉरी. माने.
In reply to माने. धनंजय माने. ;) by धनंजय माने
माने काय, मोने काय अन प्यारे
In reply to माने. धनंजय माने. ;) by धनंजय माने
अर्र पुलाव भारी आहे हे
In reply to माने काय, मोने काय अन प्यारे by संजय पाटिल
ब्रोब्र आहे.
In reply to अर्र पुलाव भारी आहे हे by संजय पाटिल
तोंपासु
लैच जब्रा...नुस्ता पुलाव येतो
जागु भौ जुग जुग जियो आप
माफ करा नावाचा अतिउत्साहात चुकीचा उल्लेख झाला
जागुतै मस्तच पुलाव.. झटपट
वाह , आवडीचा पदार्थ
काय रंग आहे!!! आहाहा!!
नाही
In reply to काय रंग आहे!!! आहाहा!! by पिलीयन रायडर
मस्त दिसतोय!
जबराट!
कातिल!
जबराट!!!
जागुताई, रेसीपी आणि फोटो
=)) =))
In reply to जागुताई, रेसीपी आणि फोटो by अभ्या..
अंडं असल्यामुळे माझा पास. ;)
In reply to जागुताई, रेसीपी आणि फोटो by अभ्या..
मग! तुम्हाला काय वाटलं?
In reply to अंडं असल्यामुळे माझा पास. ;) by बोका-ए-आझम
अभ्या अन शाकाहारी
In reply to अंडं असल्यामुळे माझा पास. ;) by बोका-ए-आझम
शंतनु च्या बायकोला सुधाला तर
In reply to अभ्या अन शाकाहारी by कैलासवासी सोन्याबापु
अधून मधून असल्या चाव्या
In reply to अभ्या अन शाकाहारी by कैलासवासी सोन्याबापु
मस्त!
स्ल्र्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प
जागुतै पुलाव मस्तच. कालच
धन्यवाद,
पाहिला? ब्वार्रर्र!
In reply to धन्यवाद, by नीलमोहर
हे कसंय,
In reply to पाहिला? ब्वार्रर्र! by धनंजय माने
जागुताई
सगळ्यांचे धन्यवाद.
जागु ताई
शिंगाळ्याची अंडी तुम्हाला
In reply to जागु ताई by कैलासवासी सोन्याबापु
आम्हांस जागु ताई लेखन प्रसन्न
In reply to शिंगाळ्याची अंडी तुम्हाला by शिद
मस्त पा.कृ.