Skip to main content

वास्तव

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 02/12/2016 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
पोचले कोणी तिथे स्पर्शून ते चंद्रास आले उंबऱ्याने बांधलेले शेकडोंनी 'चंद्र' येथे ... झुंजले काळासवे ते मृत्यूसही जिंकून गेले 'मी'पणाने जिंकलेले शेकडोंनी 'इंद्र' येथे ... जोखडाचे हार आम्ही माळलेले मस्तकावर कस्पटासम देह तरीही वाटते भीती जराशी आरश्याची मृगजळेही पाडती मोहात जिवा ना इथे पर्वा जगाची, झुंज माझी 'आतल्याशी' माणसा रे माणसा, जाणून घे नियती स्वतःची जात-धर्म, प्रांत-भाषा हीच परिमाणे जगाची माणसाची जात कोणा ओळखू ना ये कधीही मान टेकावी जिथे ती असे पोळी सुळाची विशाल...
काव्यरस

आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे ….. (भाग २)

लेखक अमर विश्वास यांनी गुरुवार, 01/12/2016 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे ….. (भाग २) सीडीज आवरणे .. एकदम सोपे काम... शात्रीय संगीत एका बाजूला , नाट्यसंगीत वेगळे . पुलं , वपु, शंकर पाटील यांच्या साठी एक वेगळा कोपरा हिंदी गाणी खालच्या कप्प्यात.. त्यातही रफीसाहेबांसाठी वेगळा कोपरा. गझलस वेगळ्या बाजूला ... डोक्यात सगळं पक्क होत.. पटापट आवरू . दोन अडीचशे सीडीज आवरायला कितीसा वेळ लागतो ... ----------------------------------------------------------------------------------------२ धडाक्यात कामाला सुरवात केली. काही पत्ता चुकलेल्या सीडीजना योग्य पत्त्यावर पोचवले ...

पुरुषांचाही विनयभंग होतो!!!!!?

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी गुरुवार, 01/12/2016 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
२०१२ साली दिल्लीत झालेल्या निर्भयाच्या अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर देश ढवळुण निघाला.स्त्री सुरक्षे विषयक कायदे कडक केले गेले.देशात स्त्रीयांना भोगायल्या लागणार्या छेडछाड ,विनयभंग ,बलात्कार इत्यादी प्रश्नावर मंथन झाले ,चालू आहे.स्त्री सुरक्षा आपली सर्वांची प्रार्थमिकता असायला हवी या बाबतीत दुमत नाहीच.पण पुरुषांच्याही काही लैंगिकतेच्या अनुषंगाने सामाजिक समस्या असु शकतात याविषयी मात्र ब्र देखिल उच्चारला गेला नाही.प्रत्येकवेळी पुरुषच शोषणकर्ता असतो असा एकांगी विचार मांडायला गेलो तर योग्य होणार नाही. बायकाही पुरुषांचे लैंगिक शोषण करतात /करु शकतात असे गृहीतक जर कुणी मांडले तर ते एकतर खोटे आहे अथ

देशभक्‍ताची व्याख्या!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/12/2016 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री आठ वाजता पंतप्रधानांनी देशाच्या नागरिकांना उददेशून केलेल्या भाषणात ‘1000 आणि 500 च्या नोटा आता कागदाचे तुकडे झाल्या’ची घोषणा केली. पण नागरिकांना आपल्याकडचे हे चलन बदलायला पन्नास दिवसांची मुदत दिल्याने सर्वत्र आनंद झाला. त्यांच्या या निर्णयाचे देशभर स्वागत झाले. निर्णयावर टीका केली तर आपण काळा पैसा बाळगणारे आहोत असा संदेश जाईल की काय या भीतीनेही बरेच लोक निर्णयाचे स्वागत करू लागले. आपण अर्थतज्ञ नाही. चलनवाढ, काळापैसा, स्मगलींग, नकली नोट यातले आपल्याला काही कळत नाही.

भूनंदनवन काश्मीर - भाग १

लेखक के.के. यांनी गुरुवार, 01/12/2016 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
==================================================== भूनंदनवन काश्मीर - भाग-१ भाग-२ भाग-३ भाग-४ ==================================================== भूनंदनवन काश्मीर – पूर्वतयारी यंदाच्या ऊन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कुठे ट्रीपला जायचे याचा विचार बरेच दिवस डोक्यात घोळत होता. २००८ साली काश्मीरला जायचे अगदी ठरलेच होते, पण काही कारणास्तव ऐनवेळी ती ट्रीप रद्द करावी लागली होती.

!! रात्र जिवलग सखी जाहली !!

लेखक कवि मानव यांनी गुरुवार, 01/12/2016 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
शांत गूढ रात्र उशाशी, नील व्याप्त गगन छताशी, नेत्र टिपत असे नक्षत्रे तेव्हा, झुळूक देत असे त्रास जराशी !! रातराणीचा स्वैर विहार, सुगंध दरवळे मज श्वासाशी, मोहक वारे बिलगून अंगी, खळी पडत असे मज गालाशी !! राहिले बरेच तसेच तिथेच, येऊन थांबले बहू ओठांशी, माझ्या मनातले अबोल गाणे, थेट भिडत असे उंच नभाशी !! रात्र जिवलग सखी जाहली, दडून बसली माझ्या उराशी, उजेड मारी सुरुंग प्रभाती, ------(सकाळचा प्रहार) पण त्यासही मिळे ना ती तळाशी !! ---- ( ती म्हणजे रात्र , मनाच्या तळाशी)
काव्यरस

एक पणती माझीही!!

लेखक बाजीप्रभू यांनी गुरुवार, 01/12/2016 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे सहाब क्यू इतना झंझट करवाते हो आप? कौन जायेगा बँक में घडी घडी लाईन लागाने को?. मेरा तो अकाउंट भी नही है बँक में, आप मेरे को कॅशहि दे दो." साधारण सहा महिन्यापूर्वीचं आमच्या नवीन बंगाली कामवाली बाईचं हे वाक्य. नवरा पुराणिक बिल्डर्सच्या कन्स्ट्रक्शन साईटवर मजूर, आणि हि त्याच कॉम्प्लेक्समधे धुणी-भांडी, जेवण बनवण्याचं काम करते. कॉलेजात शिकत असलेली दोन मुलं शिकण्यासाठी कोलकातामधे. नवऱ्याच्या पगारात दोघे भागवतात आणि तिचा सगळा पगार मुलांच्या शिक्षणासाठी पाठवते. मी :- आपका बँक अकाउंट नाही है? तो आप पैसा कैसे भेजती हो हर महिने? ती :- एक पहचान का आदमी है वो भेजता हैं.

मटार उसळीची लागलेली चटक कशी सोडवावी?????

लेखक निनाद यांनी गुरुवार, 01/12/2016 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी " दिसा माजी काहीतरी ते डोके खावे,प्रसंगी अखंडीत खातच जावे" असे टफीस्वामींनी सांगुन ठेवले आहे .या उक्तीमुळे रोज काहीतरी हितगुज आपल्याशी करावे असे वाटत राहाते. असो. तर आजचा विषय आहे मटार उसःळ. आपल्या सर्वांचा आवडीचा विषय. उ. त्क्रांतीवादानुसार माणुस हा मिसळ आहारी आहे .तो मिसळाहार आणि उसळाहार दोन्ही आवडीने करतो.त्याला मी कसा अपवाद असणार? जसे मला कळत आहे तेव्हापासुन मि मटार उसळीचा भोक्ता आहे. आम्ही सदस्य लहान असताना आठवड्यातून एकदा आमच्या डोक्यामध्ये मटार उसळ किंवा मिसळ शिजायची.

आजकाल...

लेखक अभिजित कुमावत यांनी बुधवार, 30/11/2016 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठल्यावर आवराआवर ही सगळ्यांची नित्याची सवय. मग office, collage, शाळा, काम, इत्यादी गोष्टींसाठी धावणे सुरु होते. ह्या सगळ्या व्यापात दिवस कसा जातो हे काळतच नाही. थकुन भागुन घरी आल्यावर घरची कामे, कर्त्तव्य हयात वेळ जातो. मग तोपर्यंत रात्रीच्या जेवाणाची वेळ होते. उरला सुरला वेळ हा tv पाहण्यात जातो. मग तोपर्यंत उद्याची तयारी bag अवरुन ठेवणे, कपड़े इस्त्री करून ठेवणे, इत्यादि... तोपर्यंत झोपायाचि वेळ येतेच् मग काय झोपा. सकाळ झाली की परत तेच चालू... असे दिवसा मागे दिवस निघुन जातात. ह्या सगळ्यात आपण स्वतःसाठी जगायाच विसरुनच जातो. आजकाल स्वतःसाठी जगण सगळे विसरलेत बहुतेक.