घर
एक घर असतं. अगदी नेहमीच्या घरांसारखं. खिडक्या, भिंती, कुंपण असणारं.
बाहेरून जरी बाकीच्या घरांसारखं दिसत असलं तरी आतून मात्र अगदी वेगळं. कोणतीही वस्तु नाही किंवा सामान नाही. आणि घरात कोणी माणसंही नाहीत. फक्त खूप खोल्या. काहींमध्ये भीती निर्माण करणारा अंधार तर काहींमध्ये डोळे दिपवणारा उजेड आणि काहींमध्ये आल्हाददायक मिणमिणता प्रकाश. घराच्या खिडकीतून फुलांचे काटे दिसतात तर कधी घनदाट झाडांमध्ये अदृश्य होणारी वहिवाट. ह्याला समजुतीची बाजू घेणारा गार वारा आणि घणाघाती घाव घालणाऱ्या कटू विजांची साथ.
घरातलं वातावरणही काहीसं तसंच. प्रत्येक खोली मधून एक विशिष्ठ सूर असलेलं.
मिपा फिटनेस विकांत
नमस्कार,
एसरावांनी सुचवल्याप्रमाणे १० आणि ११ डिसेंबर हा मिपा फिटनेस वीकांत म्हणून जाहीर करत आहोत.
यासाठी एकच करायचे. आपण आपल्याला शक्य असलेले सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, सूर्यनमस्कार अशा कोणत्याही व्यायामप्रकारापैकी कोणत्याही व्यायामप्रकाराचे एक लक्ष्य ठरवायचे आणि १० व ११ डिसेंबरला ते पार करण्याचा प्रयत्न करूया.
चला तर मग..
गोंधळ
दार उघड बये दार उघड
तुझा गोंधळ मांडिला
दार उघड
नाशिबाचा फेरा कोणा चुकला
कर्माची फळं जीवाच्या पदरा
तुझ्या कृपाळु नजरेचा भुकेला
दार उघड बये दार उघड
तुझा गोंधळ मांडिला
दार उघड
पैशाचा भुकेला मनुष्य जाहला
नात्याच्या भुकेला शोष पडला
वेळेअभावि एकटा पडला
दार उघड बये दार उघड
तुझा गोंधळ मांडिला
दार उघड
तुझ्या दारी कोणी वेगळा नाही
चरणी तुझ्या जीव धन्यच होई
बये घे पदरी...
काव्यरस
ड.. ड... डेलीसोप चा!
अमेरिकेतून भारतात परत आल्याला आता ४ वर्ष पूर्ण झाली आहेत. इथे येतानाच मनाशी काही गोष्टी ठरवल्या होत्या. ज्या गोष्टी करून फक्त मराठी मंडळातून कौतुक होत होतं .. त्या गोष्टी प्रत्यक्ष मराठी भूमीत राहून करायच्या होत्या. ते म्हणजे लेखन.
नावावर १ पुस्तक, २ ओडिओ अल्बम इतकच काय ते होतं! जेव्हा प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली तेव्हा.. पटकथा लेखन कशाशी खातात हेही माहिती नव्हतं. अर्थात आत्ताही पूर्ण माहिती आहे असा दावा मी करत नाहीच. पण हळू हळू काम करत असताना , एक लक्षात आलं कथेचा गाभा प्रचंड भरीव असणं गरजेच आहे. आणि कथा बीज जर कमकुवत असेल तर पटकथा अतिशय बांधीव असणं फार महत्वाच असतं.
लाईन कथा : स्वामी तिन्ही जगांचा, आटा बिना उपाशी
(गेल्या काही दिवसांपासून कमरेचे जुणे दुखणे वाढल्यामुळे, टंकन करणे संभव होत नव्हते, पण आज सकाळी राहवले नाही, एवढे सर्व समोर घडत असताना डोक्यात सुपीक विचार येणारच).
सध्या सौ. बाहेर गावी अर्थात महाराष्ट्रात सॉरी विदर्भात गेलेली आहे. डोक्यावरचे केस पांढरे झाले असले तरीही या वयात मजबूरी में पुन्हा एकदा लाईनीत उभे राहण्याची वेळ आली. शांतपणे बँकेच्या लाईनीत उभा झालो. बँकेच्या लाईनीत उभे असलेले अनेक तरुण जीव अधीर आणि तणावग्रस्त दिसले. बहुतेक त्यांची रांगेत उभे राहण्याची पहलीच वेळ असेल. बालपणाचे राशनच्या लाईनीतले किस्से सांगून त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करू लागलो.
न्यूयॉर्क शहरातील ‘ थॅंक्स गिव्हींग डे परेड ‘
न्यूयॉर्क शहरातील ‘ थॅंक्स गिव्हींग डे परेड ‘
अमेरिकेच्या २०१३ च्या पहिल्या भेटीत ४ जुलैच्या ' अमेरिकन स्वातंत्र्य दिनानिमित्त " MACY “ या अमेरिकन डिपार्ट्मेंटल स्टोअर्स कंपनीतर्फे सादर केला जाणारा, हडसन नदीच्या कांठावर, न्यूयॉर्क शहरातून ' FIRE WORKS '
( आकाशात केली जाणारी शोभेच्या-दारुची आतिषबाजी ) पहाण्याचा योग आला होता.
अमेरिकेच्या दुसर्या भेटीत, त्याच कंपनीतर्फे २४ नोव्हेंबर २०१६ रोजी न्यूयॉर्क शहरात मोठ्या दिमाखात " थॅंक्स गिव्हींग डे परेड " समक्ष पहाण्याची संधी चालून आली होती.
मिसळपाव
