Skip to main content

अपरान्त (कोकण) - प्रकाशचित्रे

लेखक अमित M यांनी बुधवार, 14/12/2016 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण ३ महिन्यांपूर्वी केदार ने अधिकृत रित्या पुणे-गोवा सायकल सफर जाहीर केली. नेहमेचे अधिक ओळखीतले मिळून ८ जण तयार झाले. केदार ने लगेच प्रॅक्टिस rides च एक वेळापत्रक सगळ्यांना पाठवलं आणि जमेल तास सगळ्यांनी ह्या rides ना हजार राहून तयारी सुरु केली. यथावकाश सुट्ट्या, आमच्यासाठी परत यायचं ट्रेन च तिकीट आणि सायकल साठी टेम्पो तसच राहण्याची सोय ह्या सगळ्याची चोख व्ययवस्था झाली. सफारीला १-२ आठवडे राहिले होते आणि अचानक आमच्यातले २ लोक ऐनवेळी उपटलेल्या महत्वाच्या कामामुळे कटाप झाले. इजा बीजा नंतर माझा तीजा झाला, तब्बेत बिघडली आणि मीपण आऊट झालो. पण कोकण साद घालत होत !

नग्नता आणि मुक्ती

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 14/12/2016 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
इथल्या जैनीजमवर आलेल्या एका तद्दन पोस्टवर बरीच सांगोपांग चर्चा झाली. त्यात अनेक सदस्यांनी नग्नता आणि मुक्तीच्या संबंधाविषयी कुतुहल प्रकट केलं होतं. त्या निमित्तानं ही पोस्ट. प्रथम महावीराचा अध्यात्मिक विचार समजून घेऊ. महावीराच्या दृष्टीनं आपलं शरीराशी झालेलं तादात्म्य हा स्वरुपोलब्धितला एकमेव अडसर आहे. त्यामुळे त्याची सर्व साधना, शरीराशी झालेलं तादात्म्य संपवण्यावर केंद्रित आहे. तदनुसार, केश विमोचनादी अत्यंत क्लेशदायी साधना दिगंबर पंथात आल्या आहेत.

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाणी - अर्थात Virtual Water & Water Footprints

लेखक डिस्कोपोन्या यांनी बुधवार, 14/12/2016 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो , या वर्षी (किंवा सलग गेले 3 वर्ष) १९७२ च्या दुष्काळा पेक्षाही भयानक असा दुष्काळ उभ्या महाराष्ट्राने अनुभवलेला आहे. उपलब्ध असलेल्या पाण्यासाठी प्रादेशिक पातळीवर राजकारण चालू आहे. दुष्काळ निवारणासाठी वेगवेगेळे packages जाहीर केले गेले.. काही ठिकाणी अक्षरशः अशी परिस्थिती होती कि घरी आलेल्या पाहुण्यांना खायला जे पाहिजे ते देतो मात्र पाणी मागू नका अशी विनंती करावी लागल्याच्या बातम्या वृत्तपत्रात येऊन गेल्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात तर महिन्याकाठी रु.३०००/- पेक्षा जास्त फक्त पाण्यासाठी खर्च करावे लागत होते.

मुळांनी धरू नये अबोला

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 14/12/2016 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
मुळांनी जमिनिशी अबोला धरून पानाफुलांना अडचणीत आणू नये त्या बिचाऱ्यांच्या वाऱ्याशी बहराच्या गप्पा रंगलेल्या असतात आपले अधाशी कोंब घेऊन वाट फुटेल तिकडे फुटू नये जुन्या खंबीर इमारतीही मग भेगाळून ढासळू लागतात घनघोर तूफान येतं चालून तेव्हा आपली जागा सोडू नये मुळांवर विसंबूनच तर फांद्या तूफानाशी लढू शकतात जावं खोल खोल रूजून, मातीवर उघडं पडू नये वर कोरड्या उफाड्यात खाली झुळझुळ झरे असतात इमान राखावं जमिनीशी, आभाळाकडे व्यर्थ पाहू नये उन्मळून वर आलेल्या सांगा, मुळांना काय अर्थ आहे? - संदीप चांदणे

भूनंदनवन काश्मीर – भाग ४ (पहलगाम)

लेखक के.के. यांनी बुधवार, 14/12/2016 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
==================================== भाग-१ भाग-२ भाग-३ ==================================== भूनंदनवन काश्मीर – भाग ४ (पहलगाम) आज पहलगामला जायचे होते. श्रीनगरपासून साधारण ३-४ तास लागतील असे सोहैलने सांगीतले होते म्हणुन सकाळी लवकरच निघालो. पहिले दोन दिवस श्रीनगरच्या एकाच दिशेला आमचा प्रवास झाला होता पण आज जरा वेगळ्या दिशेला जात असल्याने श्रीनगरचा दुसरा भाग पहायला मिळाला.

हरत कोणी नाही!

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 14/12/2016 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
play तसा कुठल्याच खेळात मी जास्त 'जोरात' नाही! क्रिकेट असो फुटबॉल साधे पत्ते पण… ते आपलं सात-आठ, पाच-तीन-दोन पर्यंतच मजल… सगळच अगदी 'बेसिक लेव्हल' असलेलं पण खेळ हा ज्या त्या परिस्थिती वर खेळला जात असतो! गोलंदाजी, क्षेत्ररक्षण करायचं नसेल तर बाद झालच नाही पाहिजे… हे झालं रोजच्या खेळण्या बद्दल! पण जर सामना प्रतीश्ठेचा असेल तर स्वतःला बाद करवून, जास्त 'लायकीच्या' सहकार्यास सामना जिंकण्यास मदत करणे… ते करायलाही जिगर लागते!

नोटा रद्द -बदल . काही विरोधाभासी विधाने :)

लेखक सुज्ञ यांनी बुधवार, 14/12/2016 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
नोटबंदी चे काय होणार , त्याचे परिणाम वगैरे सर्व चर्चांचा आता अतिरेक होऊ लागला आहे. पण या निमित्ताने मात्र अनेक चर्चांमधून , नेत्यांकडून अथवा पक्षांनी मांडलेल्या भूमिकेतून, मीडिया मधून बाहेर आलेली व जाणवलेली ही मजेशीर विरोधाभासी विधाने. काही विधाने वेगवेगळ्या वेळेस केली गेली ती सलग वाचता यावीत म्हणून त्याचे भाग पाडले आहेत . ( अ , ब वगैरे ) तर . एन्जॉय .. १. ज्यांच्या पैसा पांढरा आहे तेच रांगेत उभे आहेत . काळ्या पैशेवाले मजेत घरात बसून आहेत . पैसे बदलायला बँकेत नाही आले . :)))) २. घरात अडीअडचणी साठी साठवून ठेवलेल्या नोटा बदलण्यासाठी गरीब लोक रांगेत उभे आहेत .

विदाऊट अ ट्रेस - ३ - अँड्र्यू आयर्विन

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 14/12/2016 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
Without A Trace 3 - Andrew Irvine भारतीय उपखंड आणि तिबेटचं पठार यांच्या मधोमध उभी ठाकलेली प्रचंड मोठी पर्वतरांग म्हणजे नगाधिराज हिमालय! भारतीय टॅक्टॉनिक प्लेट आणि युरेशियन प्लेट एकमेकांवर आदळल्यावर निर्माण झालेला हिमालय पर्वत वायव्य - ईशान्य असा पसरलेला आहे. हिमालयाची मुख्य रांग ही वायव्येला पाकिस्तानपासून भारत, तिबेट, नेपाळ ते ईशान्येला भूतानपर्यंत पसरलेली असली तरी या मुख्य रांगेव्यतिरिक्त वायव्येच्या काराकोरम, हिंदकुश आणि पामिर, पूर्वेच्या हेन्गवान, उत्तरेच्या इत्यादी, दक्षिणेच्या शिवालिक इत्यादी पर्वतरांगांचाही हिमालयाच्या घराण्यात समावेश केला जातो.

(आम्हां न कळे नज़्म)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी मंगळवार, 13/12/2016 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हां नकळे नज़्म, नकळेच शेर। गझली बहर, नकळे आम्हां।। काफिया की आधी, रदिफ म्हणावा। मतला जुळावा नकळे आम्हां।। कधी म्हणे सूट, कधी अपवाद। शायरांचे वाद नकळे आम्हां।। वज्न,रुक्न, जुज; लाम, गाफ आणि। नकळेची वाणी गझलेची।। स्वाम्या म्हणे माज मोकार करावा। रतीब घालावा गझलांचा।। - स्वामी संकेतानंद
काव्यरस