अश्रू अनावर झाले..
पिंपरी अशी उंच टेकडीवर उभी राहून पुण्याला साद घालत होती. दुपार टळटळत होती. गिधाडे उडत होती.
पुणं आपलं आभाळाला देणगी देत निवांतपणे पहुडलं होतं. यावेळी कोथरुड जरी दारात आलं असतं तरी पुण्यानं त्याला हुंगलं नसतं. मुळा मुठा नावाच्या समुद्राला भरती आली होती. पाखरे उडत होती.
दूरवरची साद ऐकल्यावर पुण्यानं कूस बदलली. च्यायला काय कटकट आहे. मागं एकदा भोसरी अशीच साद घालायची. त्यावेळीसुद्धा पुणं असंच वैतागलं होतं. मग त्यानं भोसरीची वाटच लावून टाकली.
पण पिंपरीची कथा थोडी वेगळी होती. दम दमा दम रापून निघालेलं ते एक अवखळ सौदर्य होतं. तिचा नाद करायला कुणी एकजण आला होता.
पुरोगामी - प्रतिगामी
पुरोगामी - प्रतिगामी
मराठीतील एका वृत्तपत्राने आपल्या अग्रलेखातून एकंदरीत पुरोगाम्यांवर दुगाण्या झाडल्या. त्यामुळे खरंतर मी हे लिखाण केले.
पुरोगामी म्हणजे वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोक. सर्वसाधारणपणे पुरोगामी हे प्रगतिवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, गतीवादी, सर्वसमावेशक विचार करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, पुढे बघून चालणारे, सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असतात. साहजिकच पुरोगामी विचारांचे लोक दैववादी नसतात, मनुवादी नसतात, धर्मवादी नसतात, कर्मविपाकसिद्धांतवादी नसतात, शब्दप्रामाण्यवादी नसतात, कट्टर धार्मिक नसतात.
सय संद्याकाय
झाली सय संद्याकाय
दिवे लाव्याचा वखतं
वाट पायता राघुची
तोंड चाललं सोकतं
डोये फाळूनं फाळूनं
काय वाटी नं पायतं
धंदा पळला घरात
जीव काहाले जायतं?
चिळ्या रायल्या भऱ्याच्या
झाला किती वारखोळं
राघू साठी मैना तूहं
कुठी अळलं व घोळं?
अशी तिसऱ्या पायरी
बस्तं धरूनं ऊंबठा
तोही झिंजते घासूनं
तूह्या पायाचा आंगठा
नंदा ईचारती तव्हा
होटं उलतच नाई
आता काहाले दाठ्ठ्यातं
ऊभी रायतं व बाई?
सय संद्याकाय
झाली सय संद्याकाय
दिवे लाव्याचा वखतं
वाट पायता राघुची
तोंड चाललं सोकतं
डोये फाळूनं फाळूनं
काय वाटी नं पायतं
धंदा पळला घरात
जीव काहाले जायतं?
चिळ्या रायल्या भऱ्याच्या
झाला किती वारखोळं
राघू साठी मैना तूहं
कुठी अळलं व घोळं?
अशी तिसऱ्या पायरी
बस्तं धरूनं ऊंबठा
तोही झिंजते घासूनं
तूह्या पायाचा आंगठा
माणूस मूलतः Vegetarian की Non Vegetarian?
शाकाहार मांसाहार असे म्हटले कि लगेच माणूस मूलतः Vegetarian की Non Vegetarian? हा प्रश्न लोक विचारू लागतात. आणि त्यावर आपापली मतही अभिनिवेशाने मांडू लागतात. आता Non Vegetarian चं भाषांतर अ-शाकाहारी असे काहीतरी होईल, मांसाहारी नाही म्हणून मुद्दाम वरच्या प्रश्नात तसे लिहिलेले आहे.आम्ही पूर्ण पणे Vegetarian आहोत असे म्हटले तर मग दुध, तूप, लोणी, मध असे प्राणीजन्य पदार्थ खाण टाळावे लागेल. आश्चर्य म्हणजे आपल्या धर्मात ह्या गोष्टी उपासाला देखील चालतात. (मला कधी कधी कळतच नाही आपल्या धर्माचं, म्हणजे एकादशी,चतुर्थीला भाज्या पण चालत नाहीत पण हे उपरोल्लेखित प्राणीजन्य पदार्थ चालतात.
(कोरडी भाकर)
मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता,
त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा
फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर
जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर
मी किती दडवून ठेवले या ढेरीला
कुत्सित नजरा घाव घालती.. या..!
नेत्रसुखद - मनोरंजक - उत्कंठावर्धक.... (भाग १) - नांदी
मित्रहो, कधी सुंदर, मनमोहक -- "मृदु मंजुळ कोमळ" तर कधी " भव्य अद्भुत विशाळ" अश्या, विविध रसांचा अविष्कार करणाऱ्या प्रतिमा बघण्यासाठी हा धागा आहे. . यात वाचण्यासारखे फारसे काही असेल- नसेल, पण बघण्यातून आनंद मिळेल, मनोरंजन होईल, थोडीशी माहितीत भर पडेल अशी आशा आहे. वाचकांनीही विषयानुरूप आपापली भर इथे टाकली, तर सोन्याहून पिवळे.
तर आगामी भागांतून इथे काय काय बघायला मिळेल, याची एक झलक या 'नांदी' मधून देतो आहे.
१.
कोरडा स्वर
व्यर्थ धावाधाव झाली, पण खरोखर
जीवना नाराज मी नाही तुझ्यावर
मी किती कोठे दडू पाहुन तुम्हाला
आठवांनो घाव घाला.. या..! मनावर
फेरफटका मारण्याचे टाळते मी
आठवांची वाट झाली खूप खडतर
तू नको घालूस फुंकर , ऐक वाऱ्या
या निखाऱ्याला पुन्हा येईल गहिवर
आपले नाते सुगंधी राहिले ना
पण तरी सजवू फुलांनी आपुले घर
मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने
वेदना पुरवेल डोहाळे परस्पर
फक्त डोळ्यांनीच केले बोलणे अन्
मौन समजावून गेले कोरडा स्वर
शोधसी ‘प्राजू’ खुणांतूनी कुणाला
सांग निर्माल्यात का भेटेल ईश्वर?
- प्राजू
काव्यरस
Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ४
या फोन नंतर मी माझ्या नवऱ्याशी बोलली काय वाटतंय तुला. तर तो बोलला कि Mr. परेश फक्त आणि फक्त पैसे आणा एवढच बोलत होता. त्याने मला समजेल असं काहीही सांगितलं नाही आहे. त्याला पैशाची घाई लागलीय. मला पटायला लागलं होत. या वर तुझ्या मित्र राजकारणात आहे त्याला Mr. परेशी माहिती काढायला सांग असं सुचवलं. मी त्याला सांगितलं कि तो लोढा ग्रुप मध्ये civil engineer आहे , आणि तो आपल्या गल्लीतच्या जवळच राहतो. यावर नवऱ्याने शांत राहणे पसंत केलं ;)
काही काही ऑफिस मध्ये सॅलरी स्लिप देत नाहीत त्या काही ऑफिस मधल माझं ऑफिस आहे.
मिसळपाव