Skip to main content

निळावन्ती

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 11/01/2017 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
मग निळ्या दरीतुन हाक येताच काफिला उठला नक्षत्रजडित रात्रीला हु॑दका अनावर फुटला त्या निळ्या दरीच्या गर्भी घननीळ गूढसे काही नि:शब्द काफिला भोगी ती पिठुर रानभुल देही काफिल्यात विरघळताना गारूड निळेसे पडले की स्वप्न निळावन्तीचे मी माझ्यावर पा॑घरले
काव्यरस

बोलू नकोस काही

लेखक किरण कुमार यांनी बुधवार, 11/01/2017 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
बोलू नकोस काही मज कळतात भावना त्या नको आठवू पुन्हा मज स्मरतात यातना त्या तू शब्द होवूनी यावे मजसंगे बोलायाला मी स्तब्ध उभा केव्हाचा तूजसंगे चालायाला तू गीत होवूनी यावे त्या माझ्या वाटेवरती मी आतूर उभा केव्हाचा अन काटे अवतीभवती मी झिजलो आहे येथे भिजण्याच्या त्या आशेने मी रडलो आहे येथे विरहाच्या त्या भाषेने येणा-या झुळकेपाठी मी असाच का मग फसतो पाहूनी माझी प्रतिमा मज भास तूझा हा असतो आता उगाच क्षणभर मी डोळे मीटूनी बसतो ह्रदय खोलूनी माझे मी तूला भेटूनी हसतो

हवा हवाई कुसकूस- किनवा टिक्की

लेखक लीना कनाटा यांनी बुधवार, 11/01/2017 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
उपकरण : एयर फ्रायर कृती : कुसकूस (गरम पाण्यात भिजवून), किनवा (शिजवून), मॅश्ड पोटॅटो, हिरवे वाटणे, मक्याचे दाणे, धने - जिरे पूड, लाल तिखट, मीठ स्वादानुसार, कोथंबीर एकत्र मळून घ्यावे. त्यात चवी प्रमाणे थाई रेड चिली सॉस आणि किसलेले चीज टाकावे. आता या मिश्रणाच्या टिक्क्या कराव्यात. त्या ब्रेड क्रम्प्स मध्ये घोळवून घ्याव्यात. तेलात तळण्या ऐवजी हवेवर एका बाजूने १५ मिनिटे तर दुसऱ्या बाजूने साधारणतः १२ मिनिटे तांबूस सोनेरी होई पर्यंत तळाव्यात. बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट हवा हवाई कुसकूस- किनवा टिक्कीज तयार. मोबल्याने एक, दोन फटू खेचावेत आणि टिक्क्यांचा गिल्ट फ्री फन्ना उडवावा.

दक्षिण घळ: भाग २

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 11/01/2017 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण घळ : भाग १ "म्हणजे नक्की काय बघणार आहेस तू आप्पा?" दाजींनी त्याला विचारल. "दाजी आपली दक्षिण वेसेकडची घळ आहे ना तिथल्या दरीत मी एक लहानसं खोपट केलं आहे. तसंही गावकरी त्याबाजूला जात नाहीत. उगाच तिथे भुताचा वावर आहे अस कधीतरी कोणीतरी पिकवून दिल आहे. त्याचा फायदा घेऊन मी तिथली जागा निवडली आहे. काल कोण कोण आलेत मला माहित नाही. कारण त्याची वर्दी मला नव्हती. पण तुम्ही काळजी करू नका. आपल्या गावात कोणालाही माझ्या या कामाची खबर नाही.

महाराष्ट्राचे दुर्गसंवर्धन आणि आपण

लेखक कर्रोफर नमुरा यांनी बुधवार, 11/01/2017 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र सारखा ज्वलंत इतिहास आणि ऐतिहासिक वारसा क्वचितच कुठल्या राज्याला लाभला असेल. क्षेत्रफळाचा विचार करता एकट्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण एवढे किल्ले जरी मोजले तरी त्याच्या अर्धे किल्लेही दुसऱ्या राज्यात नसतील. पण, कर्नाटक, गोवा, राजस्थान, तामीळनाडू व इतर राज्यात जशी जोपासना किल्ल्यांची आणि इतर ऐतिहासिक वारशांची झाली तशी ती महाराष्ट्रात होत नाही. हा आपला कर्मदरिद्रीपणाच म्हणावा लागेल. समाज आणि प्रशासन दोन्ही आघाड्यांवर आपण अपयशी ठरलोय. राज्य सरकारने तर मुंबई उच्च न्यायालयात एका जनहीत याचिकेच्या सुनावणी वेळी, ऊन-पाऊस-वाऱ्यामुळे किल्ल्यांची वाताहात झाली असे प्रतिज्ञापत्र दाखल केले.

एक शून्य तीन ..... नक्की पहावे असे रहस्य....

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 10/01/2017 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
नाटकाचा सफाईदार प्रयोग म्हणजे काय हे जर अनुभवायचे असेल तर सुदीप मोडक लिखीत " एक शून्य तीन " हे मराठी नाटक आवर्जून पहावे. सदानंद केळकर हे आंबोली गावातील एक वयस्कर उद्योजक. त्यांच्या वाढदिवशी दर वर्षी येणारे ते एक पत्र या वर्षी का आले नाही म्हणून चिंतेत आहेत अनिता या त्यांच्या पुतणीचा अपहरणकर्ता हे पत्र पाठवत असावा आणि त्यातून पुतणी अजून जिवंत आहे हा संदेश तो देत असावा असे त्याना वाटतय .

I Miss My King!!

लेखक बाजीप्रभू यांनी मंगळवार, 10/01/2017 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
खाs वोरा पुथा चाओ, आव मनो लय सिरा क्रान, नोप फ्रा फुमि बान बुन्यडीरेक. "थाई रॉयल अँथम" च्या ह्या सुरवातीच्या ओळी. या ओळींचा अर्थ असा होतो कि "हे महान राजा आम्ही तुझे नोकर/सेवक आहोत, आम्ही झुकून, मनापासून आदरपूर्वक तुला आणि तुझ्यातल्या अमर्याद गुणवत्तेला नमन करतो". अँथममधे पुढे बरंच काही चक्री साम्राज्याच्या स्तुतीपर लिहिलं गेलेले आहे.

बुद्धीमत्ता, सर्जनशीलता,latent inhibition आणि मानसिक रोग!!!

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी मंगळवार, 10/01/2017 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाने केलेली प्रगती ही त्याच्या बुद्धीमत्तेमुळे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पण माणुस ही खुप मोठी टर्म आहे.माणसांचे अनेक प्रकार पडतात,कॉकेशीअन (युरोपियन्स), मंगोलॉईड (पौरात्य),ऑस्ट्रेलॉईड्स (भारतीय), निगरॉईड्स (आफ्रिकन) व इतर अनेक.यांच्यात जसे वर्णादी भेद आहेत , तसेच बुद्धीमत्तेतही भेद आहेत. बुद्धीमत्ता म्हणण्याऐवजी सर्जनशीलतेत (creativity) खूप फरक आहे.जगाच्या बुद्ध्यांकावर जर नजर टाकली तर पौरात्य लोकांचा बुद्ध्यांक सर्वात जास्त आहे व त्यांचा मेंदू सर्वात मोठा आहे.त्या खालोखाल युरोपियनांचा बुद्ध्यांक व मेंदू व बाकीचे नंतर.

लकुंडी-हंपी-ताडपत्री-बेलमच्या गुहा-यागंती-गंडीकोट-ऐहोळे-पट्टडकालू-बदामी ....भाग -२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 10/01/2017 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
लकुंडी-हंपी-ताडपत्री-बेलमच्या गुहा-यागंती-गंडीकोट-ऐहोळे-पट्टडकालू-बदामी ....भाग -२ Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire पहिले लाकुंडीचे आहे.

सावरकरांचे मनोगत

लेखक कवि मानव यांनी मंगळवार, 10/01/2017 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकरांचे मनोगत मांडण्याचा प्रयत्न केला आहे - ते मातृभूमी ला उद्देशून हे सांगत आहेत शतदा नकार मज राजमुकुट सोन्याचा, मी तृप्त पाहुनी काळ हा स्वातंत्र्याचा, घेऊन हजारो जन्म तुझ्या उदरातून, मी सदैव राहीन, दास तुझ्या चरणांचा !! प्राणांची देऊन आहुती या यज्ञाला, मी किंचित केले भार कमी खांद्याला, नसता हे जीवन व्यर्थ मानले असते, तुझं कारण आले अर्थ नवे मारण्याला !!
काव्यरस