Skip to main content

कोड मंत्र - अत्यंत प्रभावी सादरीकरण

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 10/01/2017 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
लष्कराचे सैनिकांसाठी अत्यंत कठोर प्रशिक्षण सुरू आहे. मराठा रेजिमेंटच्या सैनिकांची एक मोठी तुकडी अत्यंत कठोर प्रशिक्षणाची वेगवेगळी प्रात्यक्षिके करून दाखवित आहे. परंतु या तुकडीतल्या रवी शेलार नावाच्या प्रशिक्षणार्थीला हे कठोर प्रशिक्षण झेपत नाहीय्ये. इतरांच्या तुलनेत तो मागे पडतो. त्यांच्या अधिकार्‍याला, कर्नल प्रतापराव निंबाळकरांना त्याचे मागे पडणे अजिबात सहन होत नाही.ते स्वतः अत्यंत कर्तव्यकठोर आहेत. नक्षलवाद्यांशी समोरासमोर लढताना स्वतःला गोळ्या लागलेल्या असताना सुद्धा त्यांनी नक्षलवाद्यांचा बीमोड केलेला आहे.

नीलकांत आणि प्रशांत, मनःपूर्वक अभिनंदन !

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 10/01/2017 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
नवी थीम मोबाईल आणि कंप्युटर दोन्हीवर उत्तम चालते आहे. नवा फाँटसुद्धा वाचायला छान आहे. मिपासारखी सुरेख सुविधा नुसती पुरवण्याबद्दलच नव्हे तर ती वेळोवेळी अपग्रेड करण्याच्या तुमच्या मेहेनतीचं विषेश कौतुक ! नीलकांतनी काढलेल्या चर्चेच्या धाग्यावर प्रतिसाद न देता हा धागा मुद्दाम यासाठी काढला की मोठ्या चर्चेत असे प्रतिसाद हरवून जातात. इथे लिहायला आता पूर्वीपेक्षा जास्त मजा येईल हे नक्की. सध्या मिसळपाव हे मराठीतलं अत्यंत देखणं आणि मोस्ट यूजर फ्रेंडली संकेतस्थळ झालं आहे. सो थँक्स अ लॉट अँड ऑल द बेस्ट !

हरभऱ्याचे सीक कबाब

लेखक केडी यांनी मंगळवार, 10/01/2017 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
सदर पाककृती काही कारणास्तव उडालेली, ती पुनः प्रकाशित करीत आहे

गैरसमज

लेखक रातराणी यांनी मंगळवार, 10/01/2017 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
गैरसमज होतात. कधीकधी खूप बोललो की आणि कधी खूप कमी बोललो म्हणून. आजकाल माझ्या स्वप्नातपण गैरसमज येतात. म्हणजे मी कुणाला काहीतरी बोलतो. मग समोरचा माणूस स्त्री असेल तर ढसाढसा रडायला लागते आणि पुरुष असेल तर करकचून भांडायला. मग काही वेळानी मी दिसतो. समजूत काढताना. मला तसं म्हणायचं नव्हतं, तुझी ऐकण्यात चूक झालीये, असं काही माझ्या मनात नव्हतं इत्यादी इत्यादी. कधी कधी उलटही होतं, म्हणजे स्त्री भांडायला लागते आणि पुरुष रडायला. पण प्रत्येक वेळेला समजूत मात्र मीच काढतो. कधी चुकूनही असं होत नाही की मी भांडतोय, रडतोय आणि समोरची पार्टी समजूत काढतेय. च्यायला आता पडू दे परत स्वप्न. नाहीच काढणार समजूत.

चित्रपटव्यवसायाचं अर्थकारण

लेखक आदूबाळ यांनी मंगळवार, 10/01/2017 06:25 या दिवशी प्रकाशित केले.
*/

चित्रपट 'भारतीय' होऊनही आता शंभरावर वर्षं झाली आहेत. सुरुवातीपासूनच 'कलेची सेवा' वगैरे आदर्शवादी गोष्टींपेक्षा भारतीय चित्रपट हा स्वच्छपणे 'व्यवसाय' हे रूप घेऊन आला. (आदर्शवादी कथानकं असलेले सिनेमे आले, पण ते चित्रपटही फायद्या-तोट्याच्या गणितातून सुटले नाहीत!) ...आणि ते नैसर्गिकही आहे. सुरुवातीपासूनच 'चित्रपट बनवणं' हे महागडं, भांडवलकेंद्री (capital intensive) काम आहे.

विंगेत गलबला - प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रभाकर भावे

लेखक सूड यांनी मंगळवार, 10/01/2017 05:17 या दिवशी प्रकाशित केले.
*/

नाटक, सिनेमा, पडद्यावर किंवा रंगमंचावर प्रस्तुत होणारी कोणतीही कलाकृती असो - त्यातले कलाकार, त्यांचा अभिनय महत्त्वाचा असतोच, पण त्यासोबतच महत्त्वाचं असतं आपल्या डोळ्यांना काय दिसतंय. कलाकार कितीही सुंदर देखणे असले, तरी तत्कालीन प्रकाशयोजना, प्रसंग याचा विचार करून केलेली रंगभूषा ते देखणेपण वाढवतं. त्यासाठी काम करत असतात पडद्यामागे असलेले रंगभूषेत पारंगत असलेले लोक.

बर्फाळलेले आईसलँड - भाग २ - एस्या गिरीभ्रमण आणि मध्यरात्रीचा सूर्यास्त

लेखक विहंग३००७ यांनी मंगळवार, 10/01/2017 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - तोंडओळख जाग आली तेव्हा पावणेदहा वाजले होते. कालच्या विमानप्रवासाचा शीण जाणवत होता. होस्टेलच्या खोलीतल्या जाड काळ्या पडद्यांमुळे बाहेरच्या वातावरणाचा अंदाज येत नव्हता. मुळात सूर्यप्रकाश आणि घड्याळातली वेळ यांचा काही ताळमेळच नसल्याने हवी तेव्हा शांत झोप काढता यावी म्हणून अशा पडद्यांची सोय केली असावी. मी आवरून खाली आलो. आजचा दिवस रिकयाविक शहर पाहण्यासाठी ठरवला होता. हॉस्टेल शहराच्या मध्यवर्ती भागातच होतं. रिकयाविक मधली मुख्य मार्गिका ‘लाउगावेगुर’ म्हणून ओळखली जाते. शहरातली मुख्य खरेदीची केंद्रे, उपहारगृहे, वगैरे याच भागात आहेत. तशी युरोपातल्या प्रत्येक शहरात अशी एक शॉपिंग स्ट्रीट असते. शहराच्या सामाजिक जीवनाचा तो केंद्रबिंदू असतो. एकंदरीतच तिथलं दैनंदिन आयुष्य किती ‘हॅपनिंग’ आहे याचा अंदाज तिथल्या वातावरणावरून बांधता येतो. लाउगावेगुर तशी काही फार मोठी नव्हती. त्यात गुरुवारची सकाळ असल्याने तिथे फारशी गर्दी नव्हती. तसं हे शहर राजधानीचं शहर वाटतच नव्हतं. युरोपातल्या एखाद्या मध्यम आकाराच्या शहरासारखा रिकयाविकचा तोंडवळा होता. पर्यटनाच्या हंगामाची नुकतीच सुरुवात असल्याने पर्यटकांची गर्दीही फार दिसत नव्हती. आपण निवडलेली वेळ योग्य असल्याचे जाणवताच जरा हायसं वाटलं. एका छानशा कॅफे मध्ये शिरलो, एक गरमागरम कॉफी मागवली, आणि शहराचा आस्वाद घेत विसावलो. आज नक्की करायचं काय हेही ठरवायचं होतंच. योगायोगाने त्या कॅफेच्या रिसेप्शनवर आसपासच्या ठिकाणांची माहिती देणारी काही पत्रकं होती. ती उचलली आणि कॉफीचे घुटके घेत चाळत बसलो.

दक्षिण घळ - भाग १

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 09/01/2017 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ भाग १ गाव सोडून गेल्यापासून यशवंताला तीच ती स्वप्न सारखी पडत होती. परंतु जोवर फक्त स्वप्न होती तोवर ठीक होत. अलीकडे मात्र त्याच्या स्वप्नात त्याचा परागंदा झालेला मोठा भाऊ आप्पा सारखा येत होता. त्यामुळे यशवंता खूपच अस्वस्थ झाला होता. रोजच आयुष्य जगण त्याला अवघड झाल होत. म्हणूनच पडणाऱ्या स्वप्नाचा सोक्ष-मोक्ष लावण्यासाठी यशवंता गावाकडे परतला होता. गावात आल्यानंतर तो त्याच्या पूर्वीच्या मित्राकडे, कृष्णाकडे, गेला होता आणि कसतरी त्याने कृष्णाचं मन वळवल होत वेतोबाच्या देवळापर्यंत जायला. लोकांची नजर चुकवून ते दोघे तिथे गेले होते. "यस्वन्ता मी न्हाई येत तुझ्या संगती यापुढ.

माझ्याही कर्वेनगरात ...

लेखक मन यांनी सोमवार, 09/01/2017 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
"दाह" चा धागा वाचला "कर्वेनगरात" नावाचा. जॉबच्या सुरुवातीच्या काळातलं बरच काही आठवलं. आठवतच गेलं. हा ज्या काळात तिथे होता* जवळपास त्याच काळात मीही त्याच भागात होतो. २००९ च्या शेवटाचा तो काळ. पण तिकडे नंतर येउ. मुळात मी तिथवर कसा पोचलो ते सांगतो. २००६ जुलै. डिग्रीचा निकाल हाती लागला आणि दोनच दिवसात , ऑगस्ट २००६ मध्ये आय टी कंपनीत रुजु झालो. कॅम्पसमध्येच निवडलो गेलो होतो. तिसर्‍या वर्षाच्या शेवटी ज्या उन्हाळी सुट्ट्या असतात; तेव्हा निवडलो गेलो. इंजिनिअरिंगचं चौथं वर्ष त्यामुळे जॉबच्या बाबत निश्चिंत होतो. उरलेले सर्व सेमिस्टर व्यवस्थित पास होणं इतकच उद्दीष्ट होतं.

यंका - २

लेखक गवि यांनी सोमवार, 09/01/2017 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
यंका स्वप्नात आला होता की खरोखर जागेपणीच्या जगात हे मला स्वप्नातच असताना कसं कळणार ? ते तळघर आता अस्तित्वातच नाही. त्यामुळे मी उठून तिथे गेलोच तर ध्यानात असतानाच शक्य आहे. यंकाही मीच बनवलेलं काल्पनिक पात्र आहे. तो उठून खऱ्या आयुष्यात येणं शक्य नाही. आणि आत्ता मी ध्यानात नाही. म्हणजे स्वप्नच असणार.. असा अर्थ मी काढला. स्वप्नाशिवाय दुसरा कोणताही अर्थ मला झेपणारा नव्हता. तर.. यंका समोर पाटावर बसला होता तो उठून उभा राहिला आणि थेट मला म्हणाला "अशक्या. बास्टर्ड .. मोकळं कर मला." माझाच आवाज ..माझाच तुलपा.. तो माझा तुलपा की मी त्याचा ? मी भीतीने थरथरलो. मोकळं कर म्हणजे काय?