Skip to main content

पर्दाफाश

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 12/01/2017 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
*/

मिसळपाव यूट्यूब चॅनलवर ‘पर्दाफाश’ ही माझी चित्रफीत आहे. त्यासोबतची माझी ही वैयक्तिक अनुभवांची काही टिपणे आहेत. इंग्लिश व्यावसायिक रंगभूमीवर स्टेजसमोरचा पडदा आजकाल क्वचितच उघडतो, पडतो.

दक्षिण घळ भाग ३

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 11/01/2017 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण घळ भाग १ दक्षिण घळ भाग २ दक्षिण घळ भाग ३ आता उगवतीकडे आकाशाचा रंग बदलायला लागला होता. आप्पाला उशीर होत होता. पण विजयाला एकटे टाकून जाणे शक्य नव्हते. मग मात्र त्याने निर्णय घेतला आणि तो तिच्याजवळच थांबला. बाहेर उजाडत असताना विजया थोडीशी कण्हली आणि तिच्या त्या क्षीणशा कण्हण्याने देखील आप्पाच्या जीवात जीव आला. त्याने तिला बसती केली आणि हळू हळू करून थोड पाणी पाजल. तिने डोळे उघडले आणि आप्पाकडे बघितल. "मी आज मऊ भात आणला होता. पण तो आता गार झाला असेल.

पहाट धुके २

लेखक Pradip kale यांनी बुधवार, 11/01/2017 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. हि माझी दुसरी कविता. माझ्या पहिल्या कवितेचे नाव देखील पहाट धुके हेच होतं. दोन्ही कवितां मधे काहीही फरक नाही. फक्त शब्दरचनेत बदल आहे. फरकच नाही तर मग हि कविता लिहली कशासाठी असेहि वाटु शकते. तर निसर्गाचे अनेक अवतार आहेत, कधी शांत वाटनारा निसर्ग अचानक रौद्र रूप घेतो तर कधी इतका रम्य वाटतो की आपण याच्या प्रेमात पडतो. आणि अशा रम्य क्षणांच कितीही वर्णन केले तरी कमीच आहे. पहाटेची वेळ ही अशाच क्षणाच उदाहरण. शांत वारा, बोचरी थंडी आणि धुक्याची चादर खुपच सुंदर दृश्य, त्याच कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे.

फुल्ल प्रुफ पिलानः एक हसीन सपना

लेखक संदीप डांगे यांनी बुधवार, 11/01/2017 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
म्येंरें प्यारँ द्येषवाषियों, जनता की खास मांगपर, सतत की डीमांडपर, एटीएमकी रांगपर फुल्लपुरुफ प्ल्यान लाया हूं. बोलो जाहीर करुं के नं करुं.... बोलो करुं के नं करुं.... करुं के नं करुं.... लो कर दिया..... -------------------------------------- नोटाबंदीच करायची असती तर कशी करता आली असती तर ही एक आयडीया. मनोरंजन आहे, फिक्शन म्हणून वाचा. पण आता पर्यंतचे नोटाबंदीबद्दलचे सर्व वाचलेले विसरून वाचावे लागेल. लर्न टू अनलर्न! (पण हे अनलर्न लर्नलेले कसे अनलर्नलायचे??)

मुख्य व एकमेव उद्देशः नोटाबंदीने फक्त काळा पैसा 'नष्ट' करायचा आहे.

थेट नष्ट करायचा.

छत्रपती शिवराय आणि आपण

लेखक कर्रोफर नमुरा यांनी बुधवार, 11/01/2017 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
चला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला पुन्हा आठवले! छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावामध्ये महाराज जोडून ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात येणार आहे. छत्रपतींचा यथोचित मान राखणे चांगले आहे. पण मुळात, ज्या क्षेत्राचा छत्रपती शिवाजी महाराजांशी काही संबंधच नाही, त्याला त्या राजर्षीचे नाव देण्यात रम्यत्व काय?

तो राजहंस एक !

लेखक चिनार यांनी बुधवार, 11/01/2017 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
२००४-०५ चा तो काळ. भारतीय क्रिकेट संघ बऱ्यापैकी स्थिरावलेला. आता या संघात नवीन कुणी नको असं वाटायचं. आणि तो आला ! बलाढ्य शरीर, पिंजारलेले लांब सोनेरी केस, डोळ्याला गॉगल,आणि विकेटकीपरचे हेल्मेट ह्या अवतरामुळे त्याचा चेहरा कधी नीट दिसताच नव्हता. तो म्हणे भारताचा नवीन विकेटकीपर होता. नाव -महेंद्रसिंग धोनी! भारतीय क्रिकेटला विकेटकीपरची समृद्ध आणि लांबलचक अशी परंपरा लाभली आहे. दर दोन-तीन महिन्याला नवीन कोणीतरी यायचा. त्याच कारण म्हणजे भारतात विकेटकीपर हे नेहमीच एक स्वतंत्र संस्थान असायचं. त्यांचा काम म्हणजे चेंडू थोपवणं एवढंच! ह्या संस्थानिकांच्या हाती एकदा जरी बॅट दिली की संस्थाने खालसा व्हायची.