ईच्छा
लेखनविषय:
काव्यरस
चांदण्यात एकदा न्हायचंय मला
ताऱ्यांच्या गावाला जायचंय मला
वेळूच्या बनात दूर किर्र रानात
गातो जे गीत वारा, गायचंय मला
रात्रीच्या काळोखात नदीच्या पात्रात
सोडलेल्या दिव्यासंगे वाहायचंय मला
अंधारात सुगंधाचा मागोवा घेत घेत
स्वप्नांच्या गावाला जायचंय मला
माझ्यात जो खोल खोल बसलाय दडून
त्याचा रूप एकदा पहायचंय मला
वाचने
2068
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
छान आहे
खूप मस्त.
सुंदर कविता.
In reply to सुंदर कविता. by आनंद
वाह आनन्द जी - खूप सुन्दर सान्गितले तुम्ही. जब्बर्दस्त.अगदी सहमत
In reply to सुंदर कविता. by आनंद
मंगेश पाडगावकर ही कविता ऐकवत
धन्यवाद आनन्द, निनाव !
सुंदर...!!! खूपच छान!!!
In reply to सुंदर...!!! खूपच छान!!! by प्रभास
शीर्षक थोडंसं चुकलं असं
In reply to शीर्षक थोडंसं चुकलं असं by प्रभास
शीर्षकाबाबत थोडेसे दक्ष रहा :
In reply to शीर्षकाबाबत थोडेसे दक्ष रहा : by प्रभास
धन्यवाद.
In reply to सुंदर...!!! खूपच छान!!! by प्रभास
थोडेसे स्वयंशोधनाकडे वळलात की