सर्वसाधारण कोणा एका मित्राने, ओळखीच्याने तो आधीच कार्यरत असलेल्या एखाद्या मराठी संस्थळाची माहिती दिली आणी आपणही त्यात सामील व्हावे अशी गळ घातली की "त्या" लाही वाटते की बघुया तरी की ही आभासी दुनिया आहे तरी कशी ?
हो नाही करता करता "तो" सगळे सोपस्कार पार पाडुन या लोंढ्यात एकदाचा सामील होतो. रंगीबेरंगी असणारी ही दुनिया त्याच्या मनाला, मनात येणार्या लेख्/कविता/विचारांना कधी एकदा जालावर ओसंडुन वाहु ह्याच्या कळा द्यायला सुरुवात करते.
जर आधीच कोणी सखा/मित्र/पाठीराखा असेल तर हा प्रवेश सुकर ठरतो. "त्या"च्या आलेल्या नव्या लेख/कविता/विचारांवर प्रोत्साहन मिळते मग "त्या"चा वारु चौफेर दौडु लागतो (वारं प्यायल्यागत). बाकीच्या नवलेखकांना येणारी हलकी फुलकी किंवा आंतर्जालावरुन डेब्यु मॅचमधेच रिटायर्मेंट देणारी रॅगिंग "त्या"च्या वाट्याला येत नाही.
खरंतर ही मिळणारी ट्रीटमेंट म्हणजे (जो पर्यंत "तो" विहीरीत पडत नाही तोपर्यंत "त्या"ला विश्वास होत नाही की तो विहीरीच्या काठावर बसलेला आहे) एक सुरुवात असते, आभासी जगाला वास्तव मानुन त्यात होणार्या प्रसंगांना स्वताच्या जीवनात आणुन मनस्ताप करुन घेणार्या मालिकेची.
मनुष्याचा स्वभावच आहे, ( इन जनरल) आपल्या परिघातुन बाहेर पडला की तो शोधतो आपला समविचारी.
जसा मराठी दुसर्या राज्यात गेला तर आधी मराठी शोधणार, मग त्यात आपला समाजवाला मग आपला जातवाला.
इथेही त्याचे तसेच होते. आधी कोणत्या आयडीशी आपले जुळते याची चाचपणी (काही वेळेस आधीच ठरलेले असते मी ह्या गृपमधेच, कारण ईथे आणणारा गॉडफादर) मग हळु हळु विचार, कार्य, गाव भाषा वगैरे वगैरे.
सुरुवातीला सगळं कस आलबेल असत, आधीच असलेल्या गृपचा पाठिबा यामुळे सगळ फुलपाखरी असतं, कुठे कट्टे, ट्रेक, चर्चा, खाणे पिणे यांना अगदी उधाण येते. गृपने ज्याला टारगेट केलेय त्याला सुरुवातीला नॉर्मल टाँटिंग मग हळु हळु खतरनाकरित्या विरोध, लायकी काढणे, पर्सनल होणे, आंतर्जालीय हेवेदावे, उणे दुणे सुरु होते. अशातच असणार्या गृपमधे काही विचारी मतभेद व्हायला सुरुवात होते. (अति परिचयाने अवज्ञा).
मग सुरु होते "शीतयुद्ध".
काही कारणाने गृप सोडता येत नाही आणी खुलेपणाने बोलुही शकत नाही. (तोंड दाबुन बुक्क्याचा मार). मग वास्तविक स्वभाव किंवा खुमखुमी उमाळुन येते. मग वापरले जातात शब्द जे दुधारी तलवारीचे काम करतात. आतापर्यंत चांगले मित्र असं चित्र दिसणारे जालावर एकमेकांचे वाभाडे काढायला सुरुवात करतात. काही त्याही परिस्थितीत टिकुन राहुन निकराने किल्ला लढवतात बाकीचे किल्लाच सोडुन पळतात, मधे मधे येतात ट्रेक केल्यासारख, पण त्यात पुर्वीचे प्रेम, जिव्हाळा आत्मीयता नसते.
मी सगळ्यात पुढे किंवा माझे तेच खरं किंवा मला सगळचं माहित आहे असं मानुन चालणार्यां "त्या"च्या फाजील आत्मविश्वासाला तडा जातो. आणी मग सुरु होतो असलेले/नसलेले ज्ञान, किंवा स्वतःविषयीचा तो अहं टिकवण्याचा अट्टाहास.
ज्यांना कधी पाहिले नाही किंवा ज्यांच्या येण्या जाण्याने आपल्या खाजगी जीवनात काडीमात्र फरक पडणार नाही अश्यांसाठी आपला झेंडा फडकवत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात काय हशील ?
लेख तितकासा व्यवस्थितपणे मांडलेला नाहीये किंवा मला मांडता आला नाही त्याबद्दल क्षमा !
वाचने
7245
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही लोकांच्याबाबत होतं तसं
मला एकदा संक्षि आणि
In reply to काही लोकांच्याबाबत होतं तसं by पैसा
छान गप्पा होतील
In reply to मला एकदा संक्षि आणि by टवाळ कार्टा
मी वेगळा आणि संक्षि वेगळे
In reply to छान गप्पा होतील by पैसा
म्हणून काय झाल!
In reply to मी वेगळा आणि संक्षि वेगळे by टवाळ कार्टा
ज्यांचे आपल्याशी अप्रत्यक्ष
In reply to म्हणून काय झाल! by पैसा
ज्यांचे आपल्याशी अप्रत्यक्ष
In reply to म्हणून काय झाल! by पैसा
शत्रुत्व घेणे, ते शत्रुत्व
In reply to म्हणून काय झाल! by पैसा
+१ आणि खिक्क
In reply to शत्रुत्व घेणे, ते शत्रुत्व by स्रुजा
लेख आवडला
In reply to म्हणून काय झाल! by पैसा
तसेही एका ठिकाणचे भांडण
In reply to लेख आवडला by गॅरी ट्रुमन
तुम्हाला पण बर्याच जणी
In reply to छान गप्पा होतील by पैसा
टकाश्रींचा अनाहितांबरोबरचा फोटो मीच काढला होता.
In reply to तुम्हाला पण बर्याच जणी by पिलीयन रायडर
मग तेच तर म्हणतोय ना आम्ही!!!
In reply to टकाश्रींचा अनाहितांबरोबरचा फोटो मीच काढला होता. by बोका-ए-आझम
मिपावर आपलं पटत नाही म्हणुन
In reply to तुम्हाला पण बर्याच जणी by पिलीयन रायडर
तुम्हाला "प्रत्यक्षात तर
In reply to मिपावर आपलं पटत नाही म्हणुन by बोका-ए-आझम
ओ मला अचानक आठवलं! मी
In reply to तुम्हाला "प्रत्यक्षात तर by पिलीयन रायडर
मस्तच लिहिलेय!
लेख आवडला.....
ज्यांना दोन्ही जगे वेगळे ठेवणे जमत नाही
हो
हम्म
In reply to हो by इरसाल
काही जिवाभावाचे सवंगडी......
In reply to हो by इरसाल
आपल्या आजूबाजूला पण असेच असते
In reply to काही जिवाभावाचे सवंगडी...... by मुक्त विहारि
+1
In reply to काही जिवाभावाचे सवंगडी...... by मुक्त विहारि
हा अनुभव तर आपल्याला कुठेही
+१ अतिपरिचयात अवज्ञा. बाकी
In reply to हा अनुभव तर आपल्याला कुठेही by ज्योति अळवणी
गेट अ लाईफ !
प्रस्थापितांना काहीजण टक्कर
मस्त लिहिलंय. लेखाशी आणी पैसा
ब्येष्ट !
जोरदार वास्तव !