देवाधिदेव महादेव स्मशानात बसलेले असतात...
त्यांचे गण बेभान होऊन ॐ नम: शिवाय म्हणत नाचतं असतात..
शिवरात्र असते...महादेव आपल्या भक्ता समवेत,,शिवरात्रीचा आनंद लुटत असतात..अनेक भक्त महादेवाच्या भेटीस येत असतात..
त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घेत असतात..
असाच एक बुद्धिवादी भक्त महादेवाच्या भेटीला आला...
उघडे नागडे भस्म चर्चित अनेक गण बेभान होऊन नाचत होते..
ते पहाताच तो महादेवास म्हणाला स्वामी आपण ब्रह्मांड निर्मिते..सा-या तंत्र विद्ये चे आपण जनक.. अन अश्या उघड्या नागड्या गांजेशस गणात आपण कसे रमता? ॐ नम: शिवाय चा अर्थ तरी याना माहीत असेल का?
यावर महारुद्राने स्मित हास्य केले व त्या भक्तास म्हणाले..
जमिनीवर पान पडले आहे ते उचल...
भक्ताने ते पान उचलले ..पाहिले तर त्यावर एक सूक्ष्म आळी वळवळत होती..
त्यावर देवाधिदेव अंबरीश,म्हणाले...आता त्या अळी कडे बघ अन ॐ नम: शिवाय हा मंत्र म्हण..
भक्ताने तसे केले अन आळी क्षणार्धात मरुन खाली पडली..अन भक्त चकित झाला..
त्याच वेळी एक फुल पाखरांचा थवा गुंजारव करत होता..
भगवान योगेश्वर, त्या थव्या कडे बघत भक्तास म्हणाले आता त्या थव्याकडे बघ अन ॐ नम: शिवाय हा मंत्र म्हण..
भक्ताने त्या थव्याकडे पाहिले अन ॐ नम: शिवाय हा मंत्र म्हणाला..
सारी फुलपाखरे मारून जमिनीवर पडली..भक्त आता मात्र भय चकित झाला.
एक हरणाचा जथ्था बागडत जात होता ..
भगवान विषकंठ, त्या जथ्या कडे बघत भक्तास म्हणाले आता त्या जथ्या कडे बघ अन ॐ नम: शिवाय हा मंत्र म्हण..
भक्त घाबरलेला होता ..पण भगवान कालभैरव, चा आदेश होता..
भक्ताने त्या जथ्या कडे पाहिले अन ॐ नम: शिवाय हा मंत्र म्हणाला.
अन तो हरणांच जथ्था मरुन जमिनीवर पडला
भक्त हैराण झाला होता..
त्याच सुमारास एक स्त्री आपल्या नवजात अर्भकास भगवान नंदिकेश्वरा चा आशीर्वाद घेण्यासाठी आलेली होति..
त्या नवजात अर्भकाकडे बघत भगवान त्रिचक्षु भक्तास म्हणाले...
हे भक्ता आता या अर्भका कडे बघ अन अन ॐ नम: शिवाय हा मंत्र म्हण..
हे ऐकताच त्या भक्ताची भीतीने गाळण उडाली ..व तो भगवान प्रलयंकरास म्हणाला स्वामी माझ्याच्यान हे होणार नाही..क्षमा असावी..
हे ऐकताच ते नवजात अर्भक भक्तास म्हणाले "अरे मूढ..भगवान शंभो सांगतात त्या प्रमाणे कर..आळी पासून फुलपाखरू त्या पासून हरण अश्या ८४ लाख योन्या पार करत मला हा जन्म मिळाला आहे... ॐ नम: शिवाय हा मंत्र म्हण..अन मला या जन्म मृत्यू च्या फे-या पासून मुक्ती दे..."
तो भक्त मनोमन उमगला.......
ॐ नम: शिवाय हा मंत्र हा जन्म मृत्यू च्या फे-या पासून मुक्ती देणारा मंत्र आहे...
ॐ नम: शिवाय भगवान पिंगलाक्ष तुला नमन...
ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय
( सदगुरु जग्गी वासुदेव यांच्या पोस्ट्चा भावानुवाद)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3656
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
सत्गती प्राप्त झालेली आहे....
व्हिडियो ??
हाच आहे मिपामुक्तीचा मार्ग.
जिल्ब्याधिदेव अकुदेव मिपासनात
जितके पुराणे घर सहाशे के होते
In reply to जिल्ब्याधिदेव अकुदेव मिपासनात by अत्रुप्त आत्मा
>>सदगुरु जग्गी वासुदेव
हा विष्णू व नारदाचा संवाद आहे