Skip to main content

काखेत कळसा ... सह्याद्रीला छोटासा वळसा

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी बुधवार, 03/05/2017 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
काखेत कळसा .. सह्याद्रीला छोटासा वळसा .. ०१ मे .. सुटी .. काल दिवसभर कौटुंबिक स्नेह सन्मेलन व संध्याकाळी cfu करांचे स्नेहमिलन .. अनलिमिटेड गप्पा .. रात्री घरी यायला उशीर आज सुटी असूनही धड कोणती राईड करावी या बद्दल अनिश्चितता.. . उशीरा आलेली जाग .. उन्हाळ्यात योग्य असा सायकलिंग चा मुहुर्त टळलेला ... मग पुर्वी जेथे सायकल ने गेलोय त्याच मार्गावर .. स्कुटर ने केलेली अचानक भ्रमंती .. खंडोबा .. म्हसा .. देवळोलीची विहीर .. एका दमात पाहून दुपारी घरी आलो .. एक मन खातंय .. सतत .. सुटी असून सॅडल पॅडल चा विरह .. अख्या महाराष्ट्रातील सायकलिस्ट कुठे कुठे जाऊन आले आणि तू घरी बसलाहेस ... छा ..

युरोपच्या डोंगरवाटा २: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) उर्वरित भाग

लेखक निशाचर यांनी बुधवार, 03/05/2017 03:34 या दिवशी प्रकाशित केले.
युरोपच्या डोंगरवाटा १: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) भाग १ अप्पर लेक्सचा निरोप घ्यावासा वाटत नव्हता, पण जाणं भाग होतं. Lower Lakes were calling...

ये कश्मीर है - दिवस तिसरा - ११ मे

लेखक एक_वात्रट यांनी मंगळवार, 02/05/2017 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज आम्ही उठलो ते नेमके सूर्योदयाच्या वेळी. आणि तो पहायला बोटीच्या छतापेक्षा आणखी चांगली जागा ती कोणती? तेव्हा आम्ही तडक बोटीच्या छतावर गेलो. सूर्यदेव आपल्या कामावर रुजू होत होते. नगीन सरोवराच्या दुस-या टोकाला नांगरलेल्या हाउसबोटी दिसत होत्या. शिका-यांची लगबग अजून सुरु झाली नव्हती. पक्षी मात्र इकडून तिकडे उडत होते. दूरवर 'हरी पर्वत' आणि त्यावरचा राजवाडा दिसत होता.(हा राजवाडा काल आम्हाला श्रीनगर शहर पाहतानाही दिसला होता, मात्र पर्यटकांना तो पाहण्याची परवानगी नाही अशी माहिती सज्जादने दिली.) आम्ही सूर्योदयाचे काही फोटो काढले आणि नगीन तलावात चालू असलेल्या घडामोडी पाहत थोडा वेळ घालवला.

जीवाशी खेळ

लेखक परशुराम सोंडगे यांनी मंगळवार, 02/05/2017 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा . . . . . . . जीवाशी खेळ पहाटं पहाटं नगर गाठलं.जिपडं हास्पीटलच्या दारातचं उभं केलं. शिव्या खाली उतरला .मागं गेला .पल्लीला उचल्लं.तशी ती मोठयांन विव्हळली. तो तिला घेऊन पाय-यावर आला.तिथचं टेकवली .टेकल्याबरूबर ती लगेच कलांडली.तिचा पार आकडा झाला होता.पारचं गळाटून गेली होती.त्याची सासू सारं बोचक घेऊन माग आली. पल्लीच्या त्वांडावर हात फिरवला .तशी पल्ली विव्हाळली,"आयो मेले गं..!!" ड्रायव्हर विलाश्यानं पुढी काढली.ते काय करील दुसऱ...? तसचं धाबाड उचाकलं नि त्यात सोडली अन् पायरीवर टेकला . बसलं पचापचा थुकतं. कचाकचा पाय-यावर चढून तो पार वर आला दुस-या मजल्यावर आला.

युरोपच्या डोंगरवाटा १: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) भाग १

लेखक निशाचर यांनी मंगळवार, 02/05/2017 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
युरोपातील पर्वतराजींत केलेल्या भटकंतीबद्दल, आवडलेल्या काही जागा आणि ट्रेक्सबद्दल लिहायचं बर्‍याच दिवसांपासून मनात होतं. मला ट्रेकिंगचा विशेष अनुभव नाही, तांत्रिक कौशल्य लागणारे ट्रेक्स करत नाही. पण पायी भटकायची आवड आहे. त्यात युरोप म्हटलं कि आल्प्स, डोलोमाईट्स, पिरेनीज या लोकप्रिय पर्वतरांगा पर्यटकांना खुणावत असतात. पायी भटकण्यासाठी असलेल्या सोयीसुविधा, नकाशे, इतर माहिती यांच्या उपलब्धतेमुळे आपल्या क्षमतांनुसार स्वतंत्र फिरता येऊ शकतं.

.

अगदी अर्ध्याएक तासाच्या बाबागाडी नेता येईल अशा रूट्पासून ते एकदोन आठवडे चालणारे hut to hut hikes असे अनेक पर्याय आपल्याला निवडता येतात. अर्थात सार्वजनिक वाहतूक सगळीकडेच चांगली किंवा सोयीची असेल असं नाही. पण ऑस्ट्रियासारख्या देशात उन्हाळ्यात त्यासाठीही विशेष व्यवस्था केली जाते. नमनाला एवढं तेल पुरे. जमेल आणि वेळ मिळेल तसं लिहायचं ठरवलंय. वाचकांच्या सूचनांचे स्वागत आहे!

ग्रीष्माच्या कविता....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 02/05/2017 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रीष्माच्या कविता... तपता अंबर, तपती धरती, तपता रे जगती का कण-कण! त्रस्त विरल सूखे खेतों पर बरस रही है ज्वाला भारी, चक्रवात, लू गरम-गरम से झुलस रही है क्यारी-क्यारी, चमक रहा सविता के फैले प्रकाश से व्योम-अवनि-आँगन! डॉ. महेंद्र भटनागर... या जगातील आद्य कवि असे नक्की कुणाला म्हणता येईल देवच जाणे. पण ज्याने कोणी पहिली कविता लिहीली असेल त्याचे खरोखर प्रचंड उपकार मानले पाहिजेत. प्रसंग, घटना कितीही त्रासदायक असो तिचा दाह कमी करण्याची ताकद कवितेत आहे, असते. वरील कविताच पाहा ना. सरळ सरळ जर तापलेल्या रणरणत्या उन्हाने धरा तप्त झालेली आहे. शेते सुकून चालली आहेत.

स्काईपवर डायव्होर्स....एका बातमीवर विचारतरंग

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 02/05/2017 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
आज लोकसत्ता मध्ये हि बातमी वाचली.आयटी इंजीनियर्स असलेल्या नवराबायको बद्दल. अगदी न राहवून विषय काढला सगळं काही forced moves असल्याप्रमाणे एका अपरिहार्य शेवटाकडे (कि नव्या सुरवातीकडे) त्यांचे (वैवाहीक) जिवन गेले. न तुम बेवफा हो, न हम बेवफा है, मगर क्या करे अपनी राहे जुदा है... करीयर मधील संधींचं आकाश खुणाऊ लागताच लग्न हे एक लोढणं वाटायला लागतं.आणि जर नवरा त्याला मिळणा-या करीयरसंधीस्थानस्थलांतर सहजपणे करत असला तर आपण का आपल्या स्वप्नावर पाणी सोडावे असे बायकोला वाटण्यात काय गैर. हल्ली संधीस्थानं आंतरराष्ट्रीय असतात, मग ओढाताण,भावनांची आंदोलने,इगो ची टक्कर(अभिमान पार्ट-3), शेवटी तुटणे. ( आयटी वाल

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ६)

लेखक Anand More यांनी मंगळवार, 02/05/2017 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
आगमन निर्गमन आणि पुनरागमन ह्या तीन संकल्पना आपण कुठल्याही समाजाला किंवा असामान्य आणि सामान्य व्यक्तींच्या आयुष्याला लावून पाहू शकतो. जेव्हा समाज किंवा व्यक्ती आगमन, निर्गमन किंवा पुनरागमानापैकी कुठल्याही एका वादळात सापडतात तेव्हा त्या वादळाला त्यांनी ज्या प्रकारे तोंड दिले त्यावरून त्यांचा भविष्यकाळ ठरतो. आगमन म्हणजे आक्रमण नव्हे. आक्रमण ही एक लष्करी चाल आहे. याउलट आगमन म्हणजे प्रस्थापित मोठ्या लोकसमूहात आलेले नवीन विचार. हे नवीन विचार समूहांतर्गत घटकांकडून येऊ शकतात किंवा समूहबाह्य व्यक्तींकडूनदेखील येऊ शकतात.

मेंदू, भावना व वर्तणूक (१)

लेखक मंजूताई यांनी मंगळवार, 02/05/2017 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
सेतू – A Conscious Parents’ Forum ह्या पालकांच्या सपोर्ट ग्रुप च्या वतीने नागपुरात दर महिन्यात पालकांसाठी एका चर्चा सत्राचे आयोजन केले जाते. मुलांच्या वाढीच्या वयात शाळा- अभ्यास तर महत्त्वाचे असतातच पण मुलांचा नुसताच बौद्धिक विकास झाला तर तो विकास एकांगी होईल. मुलांसंदर्भात पालक म्हणून आपल्याला इतरही अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्यक असते. मुलांची शारीरिक - मानसिक - बौद्धिक वाढ, क्तिमत्त्वातील वेगवेगळ्या पैलूंचा विकास, विविध शास्त्रे, समाजजीवन, मूल्य – नैतिकता, कला – संस्कृती, सौदर्यदृष्टी ह्या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

तोड पिंजरा, उड पाखरा

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 02/05/2017 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
गेला एक तास या आडरस्त्यावर त्यांची गाडी चालली होती. "साहेब पत्ता बरोबर आहे ना ?" ड्रायव्हर हरिहरने विचारलं. "हो रे, हाच रस्ता सांगितलाय." आदित्य म्हणाला खरा पण मनातून त्यालाही खात्री नव्हती. आपल्या अक्ख्या आयुष्याचाच रस्ता चुकलाय असं त्याला वाटून गेलं आणि तेवढ्यातच समोर सायोची स्कूटी रस्त्याच्या कडेला त्याला दिसली. आता पुढे रस्ता संपलाच होता. फक्त पायवाट होती. आदित्य आणि हरिहर पायवाटेवरून चालू लागले. पाच दहा मिनीटांत ते एका मोठ्ठया बैठ्या घरासमोर आले. ते ओसरीपर्यंत पोहोचतात तोच आतून एक  वयस्कर गृहस्थ बाहेर आले. "आम्ही सायो मॅडमना भेटायला आलोय" आदित्यने सांगितलं.