टार्गेट्स आणि स्ट्रेस!
"आजचा सेशन ऐकून एक गोष्ट तर नक्कीच कळली यार.", सतीश हातातल्या कॉफीचा घोट पीत म्हणाला
"कोणती गोष्ट रे? “, अमितने विचारलं.
"माणसाचं पोट भरलेलं असलं ना की या गोष्टी बोलायला सुचतात यांना."
"कोणत्या गोष्टी? आता तू नको पकवू यार."
"ह्याच रे...बी पॉझिटीव्ह, डोन्ट वरी बी हॅपी वगैरे वगैरे.", सतीशचा आवाज थोडा वाढला.
"नेमकं काय म्हणायचंय तुला? थोडा थोडा अंदाज येतोय मला."
"अरे हे बघ..हे स्ट्रेस रीलिव्हिंग सेशन कोणी अरेंज केलं? आपल्या एचआरवाल्यांनी...बरोबर?. आणला कोणीतरी पकडून भाषण ठोकायला.
मिसळपाव