आज एक मस्त आणि झटपट होणारा प्रकार केलाय.सगळ्यांनाच आवडलाय खूप. मग तो इथे द्यायलाच हवा ना? तर घ्या आता ;)
वाढणी-३-४ व्यक्तींसाठी
साहित्यः
१ वाटी अख्खे मसूर, १ कांदा, १ टोमॅटो, १ चमचा आलं-लसूण पेस्ट, १/४ वाटी सुके खोबरे किसून, १ टीस्पून तीळ, १ टीस्पून गोडा मसाला, १/२ टीस्पून धने-जिरे पावडर , १/२ टीस्पून गरम मसाला, १.५ टीस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ, सजावटीकरिता बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी, फोडणीकरिता तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद.
कृती:
अख्खे मसूर ५-६ वेळा स्वच्छ धुवून कुकरमधून ४ शिट्ट्या काढून मउ शिजवून घ्यावेत.