प्रिय श्री स्वधर्म
प्रिय श्री. स्वधर्म
श्री. स्वधर्म, असे पहा, त्या काळी वर्ण ही संकल्पना समाजात रूढ झालेली होती. स्मृति त्यात बदल करण्यासाठी लिहलेल्या नाहीत. राजा असावा का नसावा, त्या ऐवजी लोकशाही असावी का ? हा स्मृतींचा विषयच नाही. राजा व म्हणून प्रजा आहेच, विवाहसंस्था आहे म्हणून पति व पत्नी आहेतच तसेच वर्ण आहेतच. तर यां संस्थांमधील घटकांचे एकमेकाशी संबंध कसे असावेत हे "नियम" सांगणे हे स्मृतींचे काम. आजच्या भाषेत बोलावयाचे तर स्मृति म्हणजे "घटना".
अतींद्रिय अनुभव - 1
एक मुस्लिम मुलगा अचानक वडिलांच्या बदलीमुळे एका १००% हिंदू गावांत पोचतो. तिथे त्याला भयानक स्वप्ने पडू लागतात. पुढे काय होते ?
लठ्ठपणा आणि आपली जीभ !
लठ्ठपणा ही ही सध्या जगभर भेडसावणारी समस्या आहे. त्याची कारणे आणि त्यावरील उपाय यावर सतत संशोधन होत असते. अलीकडे एक मजेदार संशोधन वाचले. काही स्थूल व्यक्तींना अति गोड खाण्याची सवय असते. त्याची काही कारणे आहेत त्यात अजून एकाची आता भर पडली आहे.
आपल्या जिभेवर निरनिराळ्या चवींचे ज्ञान देणाऱ्या ‘चव-कलिका’ (taste buds) असतात. काही स्थूल व्यक्तींच्या बाबतीत या कलिका ‘मंद (dull)’ झालेल्या असतात. जेव्हा आपण गोड पदार्थ खातो तेव्हा आपल्याला तृप्ती आणि आनंदाची भावना होते. पण जर त्या कलिका मंद असतील तर ती भावना लवकर होतच नाही. त्यामुळे अशी व्यक्ती ही प्रमाणाबाहेर गोड खाऊ लागते.
अस्वस्थ बरसात
अस्वस्थ बरसात
अशीच अवचित आली
सर ती पावसाची,
सोबत दाटून आली
सय तुझ्या आठवणींची
तो पाऊस बेफाम
तो वारा मदहोश,
ती चिंब बरसात
असलेली तुझी साथ
ते गारठलेले हात
ते उष्ण श्वास,
होणारे ते स्पर्श
हवेहवेसे सारे क्षण
आली होतीत मिठीत
जेव्हा कडाडली होती वीज,
होते मानले किती आभार
मी तिचे मनातल्या मनात
त्या न संपणार्या गप्पा तुझ्या
ते न विरणारे हास्य तुझे,
आता छळते ही बरसात सदा
जेव्हा आठवतात ते क्षण पुन्हा
भिजतोय आजही मी तसाच
साजणे चिंब तुझ्या आठवणीत,
बरसणार्या या जलधारात
वाहणारे ते स्वप्न इंद्रधनुषी पाहत
- रवि बदलापूरेकर
काव्यरस
पावसाळी भटकंती: तुंग, कठीणगड( Tung, Kathingad)
लोणावळ्याच्या दक्षिणेला पवना नदीच्या काठी दुतर्फा उंच उंच डोंगररागा पसरलेल्या आहेत. त्यात प्राचीन काळापासून मानवाच्या वावराची खूण सांगणारी बेडसे, भाजे लेणी आहेतच शिवाय लोहगड विसापुरसारखे बलदंड किल्लेही आहेत. या शिवाय तुलनेने दुय्यम असलेले तिकोना, मोरगिरी असेही काही किल्ले आहेत. असाच एक सुळका आकाशात झेपावलाय. त्यावर तटबंदीचे पागोटे चढवलय आणि नाव दिलय "तुंग".तुंग म्हणजे उत्तुंग किंवा उंच. शिवाजी महाराजांनी त्याचे चढण्याचे कठीणपण ध्यानात घेउन नाव दिले "कठीणगड".पवन मावळाचा आणखी एक रक्षक.
मला भेटलेले रुग्ण - ४
http://www.misalpav.com/node/40426
सीन न. १
तुमच्या मुलाला दमा आहे , असं म्हणायचा अवकाश आईच्या डोळ्यात पाणी आणि काळजीत पडलेला बाप विचारतो " कोणत्या टेस्टस् लागतील अजून ?"
"कितीही खर्च आला तरी सांगा आम्ही करायला तयार आहोत !!"
"कोणतीही टेस्ट सांगा आम्ही तयार आहोत , काही बाकी ठेवू नका ...."
मी म्हणतो "अहो गरज होती तेवढ्या झाल्यासगळ्या आता काही करायची गरज नाही , तुम्ही काळजी करू नका ; १००% फरक पडेल ... तेवढे inhalers चालू ठेवा नियमीत "
सीन नं.
मिसळपाव