मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला भेटलेले रुग्ण - ४

डॉ श्रीहास · · जनातलं, मनातलं
http://www.misalpav.com/node/40426 सीन न. १ तुमच्या मुलाला दमा आहे , असं म्हणायचा अवकाश आईच्या डोळ्यात पाणी आणि काळजीत पडलेला बाप विचारतो " कोणत्या टेस्टस् लागतील अजून ?" "कितीही खर्च आला तरी सांगा आम्ही करायला तयार आहोत !!" "कोणतीही टेस्ट सांगा आम्ही तयार आहोत , काही बाकी ठेवू नका ...." मी म्हणतो "अहो गरज होती तेवढ्या झाल्यासगळ्या आता काही करायची गरज नाही , तुम्ही काळजी करू नका ; १००% फरक पडेल ... तेवढे inhalers चालू ठेवा नियमीत " सीन नं. २ म्हातारे वडील आणि मुलगा , "तुमच्या वडीलांना दमा आहे आणि ह्या काही तपासण्या व इन्हेलर्स लागणार आहेत त्यांना" असं मी सांगितल्यावर मुलगा त्रासिक चेहेऱ्यानी वडीलांकडे बघत म्हणतो " सध्या १५-२० दिवसांचं औषध गोळ्या द्या , नंतर येऊन करू सगळं" वडीलांच्या चेहेऱ्याकडे पाहण्याची हिम्मत माझ्यात नसते ; मी कागदावर १५ दिवसांची ट्रिटमेंट लिहातांना विचार करत असतो कि ह्यातील सर्वात स्वत औषध घेतलं जाईल आणि पेशंट बहूदा परत येणार नाही......... मी उसनं अवसान आणून इंटरकॉम वर पुढचा पेशंट पाठवायला सांगतो _________________________________

वाचने 17724 वाचनखूण प्रतिक्रिया 22

धडपड्या 04/08/2017 - 09:39
चांगलं चालू आहे... कितीही त्रयस्थ भूमिका घ्यायचं ठरवलं, तरी अश्या काही घटणा चरा उमटवूनच जातात काळजावर.... थोडे मोठे भाग लिहीलेत, जरा गॅप घेऊन, तरी चालेल...

प्रीत-मोहर 04/08/2017 - 12:04
:(

कपिलमुनी 04/08/2017 - 12:19
अजून मोठे भाग असतील तत् वाचायला मजा येईल
खरे आहे. बहुतेकदा लोकांचा दृष्टिकोन अशा स्वरूपाचा असतो. बादवे डॉक, हे इनहेलर वगैरे फार महाग का असतात? किमान दोन ते तीन प्रकारचे इनहेलर असतात. प्रत्येक औषधाच्या प्रत्येक ब्रँडचे वेगळे इनहेलर. एका जेनेरिक किंवा कॉमन इनहेलरने काम भागवत का नाहीत औषधकंपन्या?

ज्याक ऑफ ऑल 04/08/2017 - 12:41
जे का भांजली खांजणी तुका साक्ष उरला दोन्ही !! आपण फक्त पाहणे या व्यतिरिक्त काहीही करू शकत नाही. खरं तर ही बोच टोचत राहते .. पण शेवटी "गती" ... कोणाला चुकली नाही !!

डॉ सुहास म्हात्रे 04/08/2017 - 13:02
केवळ अशा अनुभवांमुळेच, "डॉक्टरमध्ये रुग्णांबद्दल अनुकंपा (sympathy) असणे जितके जरूर आहे, तितकेच त्याने सहअनुभूती (empathy) टाळण्यास शिकणे जरूर आहे." असे म्हणतात.

ज्योति अळवणी 04/08/2017 - 13:06
Ohhhh

sagarpdy 04/08/2017 - 14:35
मस्त लिहिताय. आधी म्हणलं कि मोठे भाग टाका. पण असे २-३ पण संबंधित किस्सेच मस्त वाटताहेत.

अत्रन्गि पाउस 04/08/2017 - 14:49
काळजाला पीळ पाडणारे !!

परिंदा 04/08/2017 - 17:06
दमा म्हटले की कधीच बरा न होणारा रोग किंवा खोकून खोकून माणसाला पोखरवणारा रोग असा समज आहे. हे कितपत खरे आहे?

डॉ श्रीहास 05/08/2017 - 00:53
एस दादा व परिंदा भाऊ यांची उत्तर एका मोठ्ठा लेख किंवा लेखमाला फक्त दमा आणि समज गैरसमज अशी देऊ ईच्छीतो.... थोडा वेळ घेऊन परत येईन....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 06/08/2017 - 16:36
चांगलं लिहिताय. वाचतोय. येऊ द्या अजून. -दिलीप बिरुटे