भाग मिल्खा भाग!!
टेक-१,
वर्ष १९६०. रोम ऑलिम्पिक्सचे दृश्य. पिळदार शरीरयष्टीचा मिल्खा सिंग "द फ्लाईंग सिख" एखादया बाणासारखा सुटतो. पण फिनिशिंग लाईनजवळ आल्यावर, रेस ट्रॅकवर त्याला फाळणीच्या वेळी दिसणारी पळापळ दिसते. 'भाग मिल्खा भाग' च्या आरोळ्या मिल्खाला विचलित करतात. जुने काही तरी आठवते आणि शर्यतीतील लक्ष उडते. मिल्खा जिंकता जिंकता मागे पडतो, हरतो. देशभरात नैराश्य, संतापाची लाट येते. मिल्खा नुसता हरत नाही तर मनाने देखील खचतो. संपूर्ण देशामधे मिल्खाच्या हरण्याची चर्चा होते.
"मिल्खा लॉस्ट" अशी "भाग मिल्खा भाग" चित्रपटाची रोमांचक सुरुवात सगळ्यांना आठवत असेल.
मुंबई सायकल कट्टा आणि "फूड सायकल by प्रशांत ननावरे"
रामराम...
मिपावर तुमचे सायकल-पराक्रम वाचतो. माझ्या एका मित्राच्या सायकल उपक्रमांविषयी तुम्हाला सांगावंसं वाटतं.
माझा मित्र प्रशांत ननावरे हा लोकसत्तामध्ये काम करतो. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई आवृत्तीमध्ये दर शनिवारी 'खाऊखुशाल' हे खादाडीविषयी सदरही लिहितो. तसंच तो सायकलप्रेमीही आहे.
असा नूलकर काकांचा व्यनी आला. "आवडीनिवडी एक सारख्या आहेत तर एकदा भेटून गप्पा मारूया आणि खादाडी करूया.." असा प्लॅनही नूलकर काकांनी कळवला.
मिसळपाव