Skip to main content

जनरेशन गॅप आणि निळाई

लेखक झपाटलेला फिलॉसॉफर यांनी बुधवार, 02/08/2017 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
CD प्लेयर मध्ये बिप्या बघताना अचानक light जाऊन CD आतमध्ये अडकण्याची जी भीती आहे.....त्याची जाणीव आजच्या generation ला नाही. वरचा मेसेज कायप्पा वर भिरभिरत आला आणि डोळ्यासमोर अनेक निळ्या पिवळ्या आठवणी रुंजी घालु लागल्या (त्या यथावकाश डोक्यात विसावल्या). त्यांना शब्दरुप देउन जोवर प्रसारित करत नाहित तोवर त्या तिथेच ठाण मांडुन बसणार याची खात्री पटल्याने लगोलग जिल्बी टंकायला घेतली. तरी टंचनिका हाताशी नसल्याने (आणी विषय इतका स्फोटक असताना ती हाताशी वगैरे नसणेच जास्त श्रेयस्कर असल्याने) अंमळ जास्त वेळ लागला टंकायला.

श्री महेश गिरी आणि श्री विनय सहस्त्रबुद्धे ह्यांचे अभिनंदन.

लेखक साहना यांनी मंगळवार, 01/08/2017 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
वर्षां पासून "शिक्षणाचा अधिकार कायदा" रद्दबातल करावा आणि ९३वी घटनादुरस्ती रद्दबातल करावी ह्यावर आमचे बरेच काम चालू आहे. ह्या संसदीय सत्रांत ह्या दृष्टीने बरीच प्रगती झाली (थोडी का असेना पण प्रगती आहे). भाजपचे श्री महेश गिरी ह्यांनी खाजगी बिल आणून ९३वी घटनादुरुस्ती रद्दबातल करण्याची मागणी केली.

Mt रशमोर वरील लेख

लेखक निरंजन._. यांनी मंगळवार, 01/08/2017 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपूर्वी मिपा वर ( कदाचित माबोवर असेल) एक माऊंट रशमोर वरील लेख वाचला होता... आज एका मित्राबरोबर बोलताना मी त्याला खुप कौतुकाने त्याबद्दल सांगितल.. आता त्याला तो लेख वाचायचा आहे (आणि मलाही परत वाचायचा आहे) . खुप प्रयत्न केले पण तो सापडत नाही.. मी त्यावेळी इथं नवीन असल्यामुळे निवडक १० मधे देखील टाकला नव्हता.. कोणी त्याची link देऊ शकेल का?? लेखिका आपल्या कुटुंबाबरोबर तिथे गेली होती आणि Airbnb मधून राहण्याचं booking केलं होतं ... इतकं आठवतंय.

हंटे लंटिहिलेलं तंटुम्ही वंटाचू शंटकता कंटा?

लेखक सचिन काळे यांनी मंगळवार, 01/08/2017 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
हा! हा!! हा!!! मला माहितेय! वरील शीर्षक वाचून तुम्ही गोंधळून गेला असाल. तुम्हाला वाटलं असेल, काय लिहिलंय हे!!? आफ्रिकेच्या जंगलातील कोण्या आदिवासी लोकांची भाषा दिसतेय ही. वाचताना असं वाटतं की, सर्व आदिवासींनी मिळून एक मोठी शिकार केलीय. मैदानात उघडेबंब, अंगावर चट्टेपट्टे ओढलेले आणि हातात भाले वगैरे घेतलेले लहानथोर सर्व आदिवासी जमलेत. मधोमध मोठ्या शेकोटीवर शिकार भाजायला लावलीय. आणि त्याभोवती सर्व फेर धरून नाचतायत आणि गातायत. "झिंगालाला! होsss!! टुंबक्टू! टुंबक्टू!! टुंबक्टू!!!" हा! हा!! हा!!! अहो असं काही नाहीए. ही उटपटांग भाषा कोणतीए, सांगतो! सांगतो!

थोर लेखक

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/08/2017 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (पुण्याच्या ‘अंतर्नाद’ ऑगष्ट 2017 च्या नियतकालिकात ‘थोर लेखक’ नावाची ही कथा प्रकाशित.) ...ज्युनियर लेखकाने सिनियर लेखकाची कादंबरी वाचली आणि कादंबरी आवडल्याचं सिनियर लेखकाला पत्राने कळवलं. सिनियर लेखकाने पत्रोत्तरात ज्युनियर लेखकाला कादंबरीवर समीक्षा लिहायचा आग्रह केला. उत्साहाच्या भरात ज्युनियरने सिनियरला होकार कळवला. सोबत आपल्या पाच-सहा कविता सिनियर लेखकाकडे अभिप्रायासाठी पाठवून दिल्या आणि समीक्षा लिहिण्यासाठी कादंबरी पुन्हा एकदा वाचू लागला.

भरवू नकात आता...

लेखक सत्यजित... यांनी मंगळवार, 01/08/2017 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
भरवू नकात आता बाजार आरश्यांचा येथे कुणी न उरला खरिदार आरश्यांचा! अाजन्म राहिलो मी वस्तीत आंधळ्यांच्या केला कसा न जाणे,व्यापार आरश्यांचा!
काव्यरस

काचेपलिकडचं वास्तव!

लेखक हृषीकेश पतकी यांनी मंगळवार, 01/08/2017 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं । मोहाच्या हट्टापुढे गरजांचं हसं होतं ।। आतमध्ये शिरताच माझ्या साधेपणाचे पाश तुटतात । साऱ्या सुप्त इच्छांना मग शक्यतेचे पंख फुटतात ।। दिपून जातात डोळे, काही दिसेनासं होतं । मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं...... ।।१।। चोहीकडे दिसतात मला जेव्हा वैभवाचे सडे । आणि लखलखणारी सुखं रोखून बघतात माझ्याकडे ।। कसं सामोरं जावं त्यांना मला खरंच कळत नाही । माझं आणि पाकीटाचं, मत काही केल्या जुळत नाही ।। भर पावसात कोरडं राहावं, माझं अगदी तसं होतं । मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं......
काव्यरस

#मिपाफिटनेस - ऑगस्ट २०१७ - पळण्यासाठी जन्म आपुला !!

लेखक माझीही शॅम्पेन यांनी मंगळवार, 01/08/2017 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही आपल्या समोर एक मिपाकर आपली व्यायामगाथा सांगणार आहेत. ह्या महिन्याचे मानकरी आहेत "माझीही शँपेन"! शँपेनराव पळतात. भरपूर पळतात आणि मॅरेथॉनसंबंधी अनेक वेगवेगळ्या गोष्टी आनंदाने शेअर करतात. आपल्यालाही आपले अनुभव मांडायचे असतील तर आम्हाला जरुर व्यनि करा. टीम #मिपाफिटनेस - मोदक, प्रशांत, डॉ श्रीहास. **************************** "I always loved running...it was something you could do by yourself, and under your own power.

तू अशी

लेखक संदीप-लेले यांनी मंगळवार, 01/08/2017 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
मौन माझे तुला एवढे सांगते तू किती बोलते तू किती बोलते मैत्रिणी मैत्रिणी रोज जे बोलती फोनची कंपनी त्यावरी चालते वाजले चार रे, दे मला तू चहा मी नव्हे, तू मला, रोज हे सांगते उंट तंबू मधे, आणि उघडयात मी या कपाटात तू, वल्कले कोंबते सांगतो दुःख मी, अश्रू तू गाळते ते न माझ्यावरी, तू टिव्ही पाहते शस्त्र नाही करी, हार नाही तरी येतसे लोचनी, चक्क ब्रम्हास्त्र ते वाढले वय तसे, समज ही वाढली रात्र समजून तू, दिवसभर झोपते राग मानू नको, स्वप्न होते तुझे दिवस संपेल हा, का तरी लोळते