Cool देवी
मंगेश पंचाक्षरी, नासिक.
दै सकाळ मध्ये 6 ऑगस्ट ला प्रसिद्ध झालेला माझा लेख.
गुगल, जी पी एस यासारखी साधने वापरून जगात कुठेही काहीही शोधून काढणाऱ्या पुरुषाना त्यांची बायको 'तिखटमीठाचा' डबा आणा हो आतून" असं जेव्हा सांगते तेव्हा मात्र तो नेहमीच कावरा बावरा होतो. तिखटमीठाचा डबा आणि पोळ्यांचा डबा सारखाच दिसत असल्याने तो हमखास चुकीचा डबा आणतो. एकदा अंगाला 'हळद' लागली की पुरुषांना तेल- मसाल्याचे भाव समजायला सुरुवात होते. पण स्वयंपाकघर ही मात्र खास बायकांची मक्तेदारी. तिथे त्यांचं राज्य असतं. अर्थात यास काही अपवाद ही असतीलच म्हणा. पण एकूणच डाळी, पीठ, साखर, पोहे ,रवा यांचे डबे तिला बरोबर सापडत असतात.
मिसळपाव