ही रंगीबेरंगी, नाजूक दिसणारी डिश डोळ्यांना सुखावतेच. शिवाय, पाहुणे येणार असतील तर मेनूमध्ये छोले किंवा इतर चमचमीत भाजीबरोबर 'बॅलन्स' करायलाही छान आहे.

साहित्यः
१५-२० रंगीत (लाल, केशरी, पिवळ्या) मिनी पेपर्स,
२०० ग्रॅम पनीर,
१ टोमॅटो,
१ टी.स्पून लाल तिखट,
१/२ टी.स्पून गरम मसाला,
१/२ टी.स्पून जीरे पूड,
१/२ टी.स्पून धनेपूड,
२ टी.स्पून साखर,
तेल,
मीठ,
कोथिंबीर बारीक चिरुन
१/२ टी.स्पून खसखस,
१ टी.स्पून तीळ,
८-१० काजू बिया,
५ लवंगा,
३ वेलदोडे,
१ इंच दालचिनी,
४-५ काळे मिरे,
१ तमालपत्र
कृती:
१. लवंगा, वेलची, दालचिनी, मिरे, तमालपत्र एका कढईत मंद आचेवर ५-६ मिनिटे भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पूड करुन घ्या. भाजीसाठी १/२ टी.स्पून घेऊन बाकी हवाबंद डबीत भरुन ठेवा (पंजाबी भाज्या, पुलाव इ. मध्ये वापरु शकता).
२. खसखस, तीळ, काजूबिया कढईत मंद आचेवर भाजून घ्या. मिक्सरमधून बारीक करुन घ्या.
३. टोमॅटोची मिक्सरमधून पेस्ट करुन घ्या.
४. १ टे.स्पून पनीर किसून वेगळे काढून ठेवा. बाकीचे भाजीसाठी बारीक करुन घ्या.
५. एका कढईत तेल गरम करुन त्यात गरम मसाला, तिखट, टोमॅटो पेस्ट, पनीर, जीरे पूड, धने पूड, साखर घाला. त्यात (१) मध्ये बनवलेला मसाला १ टी. स्पून घाला, (२) मध्ये बनवलेली पूड घाला. चवीप्रमाणे मीठ घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर ७-८ मिनिटे शिजवा. हे सारण मिनी पेपर्स मध्ये भरायचे आहे, त्यामुळे ते फार पातळ असू नये. (आवडीप्रमाणे साखर आणि इतर मसाले कमी-जास्त करा).
६. सारण गार होईपर्यंत मिनी पेपर्स धुवून घ्या, आणि प्रत्येकीला एक उभी चीर द्या, म्हणजे त्यात सारण भरता येईल.
७. प्रत्येक मिरचीत सारण भरुन घ्या. (सारण उरले तरी चालेल.)
८. एका पसरट, मोठ्या पॅनमध्ये १-२ टी.स्पून तेल गरम करा. त्यात एक एक करुन भरलेल्या पेपर्स सारण बाहेर येणार नाही अश्या ठेवा. झाकण ठेऊन शिजू द्या (या मिरच्या शिजायला वेळ लागतो). सर्व बाजूंनी नीट शिजण्यासाठी हळूवार थोड्या थोड्या फिरवून पुन्हा आचेवर ठेवा. मिरच्या शिजत आल्या की सारण उरले असेल ते वरुन भुरभुरा. पुन्हा २-३ मिनिटे आचेवर ठेवा.
९. एका डीशमध्ये सर्व मिनी-पेपर्स काढून घ्या. वरुन कोथिंबीर आणि किसलेले पनीर घालून सजवा. पोळी/ पराठ्याबरोबर खायला द्या.
मिसळपाव
प्रतिक्रिया
कातिल फोटो
कोणीतरी बनवून आणून दिल्यास ताव मारण्यात येईल!
सही दिसतय हे प्रकरण. मोठ्या
सही दिसतय हे प्रकरण. मोठ्या ढबु मिरच्या पण वापरू शकतो ना? इथे मिनी मिळत नाय:(
हो.. किंवा सूड म्हणत आहेत
In reply to सही दिसतय हे प्रकरण. मोठ्या by प्रीत-मोहर
हो.. किंवा सूड म्हणत आहेत तश्या मिरच्या मिळाल्या तर बघ.
फोटू Sssssssss
फोटू Sssssssss
छोट्या छोट्या ढोबळ्या मिरच्या
छोट्या छोट्या ढोबळ्या मिरच्या आहेत. त्यात करून बघते.
एक शंका - शिजायला वेळ लागतो म्हणतेयस तर तेल लावून कुकरमध्ये एक शिट्टी देऊन वाफावल्या तर ?
चालेल बहुतेक. माझा कूकर कधी
In reply to छोट्या छोट्या ढोबळ्या मिरच्या by मितान
चालेल बहुतेक. माझा कूकर कधी कधी दगा देतो.
या पेपर्स थोड्या क्रंची असल्या तर छान लागतात. पॅनमध्ये एक-एक करुन ठेवता येतात आणि झाकण काढून बघता येते, म्हणून मी अशी बनवते.
ओके.
In reply to चालेल बहुतेक. माझा कूकर कधी by रुपी
ओके.
सध्या काही पथ्यामुळे अर्धकच्चे काहीच चालत नाही.
पण फोटो बघून राहवेना :)) कुकरात का होईना करून बघतेच !
ठयांक यु :)
हा प्रकार बार्बेक्यु मध्ये
हा प्रकार बार्बेक्यु मध्ये अत्यंत हिट्ट होतो. नक्कीच करणारे. तेव्हा फोटो टाकेन.
मी बार्बेक्युमध्ये
In reply to हा प्रकार बार्बेक्यु मध्ये by पिलीयन रायडर
मी बार्बेक्युमध्ये स्क्युअर्सना वेगवेगळ्या रंगाच्या पेपर्स, पनीरचे क्युब्स लावून खाल्लंय. ही डीश एकदा हॉटेलात मोठ्या तव्यावर बनवत असलेली पाहिली होती.
पण माझं बार्बेक्युमधलं ज्ञान तुटपुंजं आहे. तू केलेस की नक्की फोटो टाक.. आणि बाकी (निरामिष) पदार्थांचेही टाक :)
हे मागच्या वर्षीचं!
In reply to मी बार्बेक्युमध्ये by रुपी
He tu kelyas pira? Nustach
In reply to हे मागच्या वर्षीचं! by पिलीयन रायडर
He tu kelyas pira? Nustach photo kay dete mag.. kruti tak ki
अगं नाही.. ७-८ जणींनी मिळुन
In reply to He tu kelyas pira? Nustach by सही रे सई
अगं नाही.. ७-८ जणींनी मिळुन आम्ही बार्बेक्यु केला होता. तर मी बटाट्याच्या टिक्क्या केल्या. रुपीने सांगितलेल्या स्ट्फड मिरच्या एकीने केल्या होत्या. पनीर - फ्लॉवर - मशरुम्स - ढोबळी मिरची (२-३ रंगाच्या) ह्यांचे तुकडे मसाला आणि दह्यात मॅरिनेट करुन मग ते स्क्युअर्सला लावुन घेतले. बाकी कणिस, रताळे इ गोष्टी होत्याच. ह्यत पाकृ वगैरे काही नाहीचे!
बऱ .. पण दिसतंय खतरा.. तों पा
In reply to अगं नाही.. ७-८ जणींनी मिळुन by पिलीयन रायडर
बऱ .. पण दिसतंय खतरा.. तों पा सु
रुपिच्या स्टफ मिरच्या पण भारीच. त्या वेगवेगळ्या रंगाच्या घेतल्यामुळे आणखीनच छान दिसतायत.
फार भारी!!
In reply to हे मागच्या वर्षीचं! by पिलीयन रायडर
फार भारी!!
वा.. मस्तच.. तोंपासु :)
In reply to हे मागच्या वर्षीचं! by पिलीयन रायडर
वा.. मस्तच.. तोंपासु :)
फोटो जितका भारी आलाय तितकाच
फोटो जितका भारी आलाय तितकाच चवीलाही हा प्रकार भारी असणार यात शंकाच नाही.
मस्त !
शाही प्रकार वाटतोय ! एकदम ईस्टमनकलर !
आहा....सहीच!!
आहा....सहीच!!
रंगीन रेसिपी!
रंगीन रेसिपी!
इथे कधी या छोट्या मिरच्या नाही बघितल्या पण मोठ्या वापरून पण छान लागेल त्या मसाल्यात.
मला वाटतं, भरुन करायला म्हणून
मला वाटतं, भरुन करायला म्हणून ज्या मिरच्या येतात त्यातही हा प्रकार चांगला लागेल.
मस्त!
मला वाटतं, भरुन करायला म्हणून ज्या मिरच्या येतात त्यातही हा प्रकार चांगला लागेल.>>>>> अनुमोदन !
जबरा , खतरा --/\--
जबरा , खतरा --/\--
जबरदस्त!
खल्लास पाकृ!
फारच सुरेख
मस्तच. नक्की करून पहाणार.
पाकृ छान आणि फोटो सुद्धा!
पाकृ छान आणि फोटो सुद्धा!
सर्वांना धन्यवाद :)
सर्वांना धन्यवाद :)
यावरून आठवलं, जर्मनीत चक्क
यावरून आठवलं, जर्मनीत चक्क गोड चवीच्या मिरच्या मिळतात असे वाचले आहे. कुणी खाल्ल्यात का?
या मिरच्याही थोड्याफार गोड
In reply to यावरून आठवलं, जर्मनीत चक्क by एस
या मिरच्याही थोड्याफार गोड असतात चवीला.
मस्त फोटो
पाकृ सुद्धा छान आहे.
मस्त !
या पाकॄ मध्ये पनीर कमी आणि मिर्च्याच जास्त दिसत आहेत ! ;)
(पनीर पकोडा प्रेमी) :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Uchimandai... :- Vettaikaaran
Mast dusra get.lal aani
Mast dusra get.lal aani hotya morcha ithe miltat.ekda krun pahin.
मस्त लागतात ह्या मिरच्या
मस्त लागतात ह्या मिरच्या :)
सही...सुंदर दिसते आहे डिश, या
सही...सुंदर दिसते आहे डिश, या कोणत्या प्रकारच्या मिरच्या आहेत?
स्वीट मिनी पेपर्स
In reply to सही...सुंदर दिसते आहे डिश, या by सप्तरंगी
स्वीट मिनी पेपर्स
त्यांचा जालावरुन फोटो

मस्त दिसतायत मिरच्या!
मस्त दिसतायत मिरच्या!