डेस्टिनेशन - देवभूमी अर्थात हिमाचल प्रदेश मु. पो . सांगला , किन्नर कॅंप्स भाग ३
असाच सुंदर निसर्ग बघत आम्ही चाललो होतो आणि एका वळणार आम्हाला सतलज नदीचं दर्शन झालं. खूपच छान वाटलं ते पाहून. नदीच पात्र चांगलेच रुंद होतं. आणि पाणी फारच उथळ होत. आम्ही एके ठिकाणी चहा प्यायला थांबलो तिथून नदी अगदीच जवळ दिसत होती. नदीचा खळखळाट चांगलाच जाणवत होता. सतलज नदीत रिव्हर राफ्टिंग सारखे गेम्स चालतात अशी माहिती ड्राइवरने दिली. पण आम्ही जिथे जाणारा होतो तिथे हि सोय नव्हती. आम्ही सतलज एका कडेला ठेवून तिच्या बाजूने प्रवास सुरु केला. हळूहळू वस्ती विरळ होत चाललेली आणि गावं लांबच्या लांब पसरलेली दिसत होती. गावात कधी कधी मोजकीच घरं लगत होती. पण एक या टोकाला तर दुसरं त्या टोकाला.
मिसळपाव