Skip to main content

अलकनंदेचा पर्जन्यरात्रीचा प्रवास

लेखक धर्मराजमुटके यांनी शुक्रवार, 29/06/2018 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
सांजवेळ झाली तसे अलकनंदाने आपले थकलेले दोन्ही डोळे तळव्यांनी दाबले. कार्यालयातले सर्व सहकर्मी कधीच निघून गेले होते. अलकनंदाने तिच्या वहनयोग्य लघुसंगणकाच्या पडद्याकडे एक शेवटची नजर टाकली. काही नवीन ऋणपरमाणु प्रपत्र वरिष्ठांकडून आलेली नव्हती. क्षेत्रीय कार्यालये आणि केंद्रीय कार्यालय यांच्यातल्या संपर्कांबाबत अलकनंदाचे काम नेहमीच अंतिम मुदतरेषेवर चालत असे. प्रपत्रांच्या प्रतिसादास किंचित जरी उशीर झाला तरी साप्ताहिक पुनरावलोकनात त्याचा उल्लेख होत असे. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. आगगाडीने ख्रिस्तीमंदिरद्वार ते अलपिष्टन मार्ग स्थानकापर्यंत जाताना लघुसंगणकाची पिशवी भिजली असती.

काही लिहिण्यापुरती

लेखक मनमेघ यांनी शुक्रवार, 29/06/2018 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
काही वाक्यांपुरतेच तिचे माझे संभाषण पाडी घण हृदयात आत आत काही शब्दांपुरताच तिचा माझा स्नेहबंध मी सबंध असतोही नसतोही काही अर्थांपुरतेच तिचे माझे नाते गूढ जशी ओढ नकळती खळाळती काही लिहिण्यापुरती तिची माझी पाटी कोरी आणि सरी उराउरी अक्षरांच्या ! ~ मनमेघ

अनवट किल्ले ३५ : कर्‍हा, अजमेरा ( Karha, Ajmera )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 29/06/2018 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
बिष्टा पाहून आम्ही फाट्यावरुन सटाण्याच्या दिशेने वळालो आणि कोळीपाडा गावात पोहचलो. आमचे पुढचे लक्ष्य होते "कर्‍हा". वास्तविक कर्‍हा हे नाव उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर येते ती सासवडची कर्‍हा नदी आणि सासवडचे भुमीपुत्र असलेल्या आचार्य अत्रेंचे "कर्‍हेचे पाणी" हे आत्मचरित्र. Karha 1 पण इथे आमच्या समोर कर्‍हा हा दुर्लक्षित किल्ला उभा होता. सर्वानुमते लंच ब्रेक घ्यायचे ठरले. पायथ्याशी असलेल्या घनदाट झाडीत सावली पाहून आम्ही बसलो , डबे उघडले.

वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार

लेखक हेमंत ववले यांनी शुक्रवार, 29/06/2018 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
तरुण, उत्साही पर्यटक

प्रथमेश चे वय अंदाजे २०-२१ वर्षे असेल. नुकतीच पदवी घेऊन कोर्टात वकीलीची प्रॅक्टीस करण्यास त्याने सुरुवात केली. मित्र मैत्रिणींचा जुना ग्रुप अनेक महिन्यांनी एकत्र आला. आणि त्यांनी कॅम्पिंग ला जायचे ठरवले. गुगल इंटरनेट वर सरअह करुन, वेगवेगळ्या कॅम्पसाईट्स ची तुलना करुन त्यांनी निसर्ग शाळा निवडले. प्रथमेश ने आजपर्यंत ट्रेकींग केले होते. पण कॅम्पिंगचा अनुभव तसा पहिलाच. पहिल्या दिवशी संध्याकाळी साइटवर येताना ते अक्षरशः चिंब भिजुनच आले होते. निसर्गशाळेपर्यंत पोहोचणे सुध्दा धाडसाचे आणि निसर्गाच्या अलौकिक चमत्कारांच्या गराड्यातुन येण्यासारखे आहे.

हजारो बेटांचा देश...... फिनलँड.... भाग ४ हेलसिंकी सांबा कार्निवल.

लेखक बरखा यांनी गुरुवार, 28/06/2018 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/42878 भाग १ https://www.misalpav.com/node/42891 भाग २ https://www.misalpav.com/node/42898 भाग ३ हेलसिंकी मधे सिनेट स्क्वेअर नावाचे एक ठिकाण आहे. येथे एक भले मोठे चर्च असून चर्च समोरील मो़कळ्या जागेवर विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. येथेही बेरेच पर्यटक भेट देण्यास येतात. आम्ही ईथे आलो ते सांबा कार्निवल बघायला. सांबा हा एक नृत्याचा प्रकार आहे.

वाया गेलेली कविता

लेखक कहर यांनी गुरुवार, 28/06/2018 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रहर चालला तो दुपारचा त्यातून घन आलेले दाटून दमट जराशी हवा पसरली लपाछपी खेळतसे ऊन दूर कुठे तो बसून रावा घालीत होता किर किर शीळ उदास होते आयुष्य झाले सरता सरेना आजची वेळ अशाच वेळी बसून एकटा हळूच असे तो निरखत तिजला एक भेंडोळे एक लेखणी होता हाती घेऊन बसला काही अंतरावर ती होती घागर बुडवीत पाण्यामध्ये रेखीव काया लवचिक बांधा वर्ण गोमटा कपडे साधे तिला ना होती जाणीव त्याची गुणगुणतसे आपल्या तंद्रीत आडोशास तो बसला होता काही खोडीत काही लिहीत घागर भरुनी ती निघताना याची लेखणी थांबे पुरी शीळ घालुनी तिज तो बोले तुजवर लिहिले हे वाच सुंदरी निघे गुलाब मग खिशातुनी जशी ती एकेक ओळ वाचता जरा थांबुनी मग ती वद

‘क’ जीवनसत्व : आंबट फळांची दणकट देणगी !

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 28/06/2018 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्यजनांना ‘क’(C) या एकाक्षरी नावाने परिचित असलेल्या या जीवनसत्वाचे अधिकृत नाव Ascorbic acid असे आहे. त्याच्या नावाप्रमाणे ते आम्लधर्मीय असून ते आंबट फळांमध्ये विपुल प्रमाणात असते. आवळा, लिंबू व संत्रे हे त्याचे सहज उपलब्ध असणारे स्त्रोत. त्यातून लिंबू हे बारमाही फळ असल्याने आपण त्याचा रोजच्या आहारात समावेश करतो. शरीराच्या बळकटीसाठी आवश्यक असणाऱ्या ‘क’चा शोध १९३०मध्ये लागला.

दी टायगर्स असोसिएशन - रहस्यकथा भाग २

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 27/06/2018 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमाला अर्धवट सोडण्याचे पाप माझ्या माथी लागले आहेच. त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो. या मालिकेतील पुढचे लेख ३-४ दिवसांचे अंतर ठेवून प्रकाशित करेन जेणेकरून इतर लेखांवर अन्याय होणार नाही. भाग.1 https://www.misalpav.com/node/४२५८४ ------------------ आमचा नूकताच डिप्लोमा करुन झालेला होता. एकीकडे मित्रांच्या ताटातूटीमुळे होणारा त्रास आणि दुसरीकडे खूणावणारी कॉलेज लाईफ असे ते सोनेरी दिवस.