Skip to main content

बटाट्याचे उपयोग

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 09/12/2019 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
बाटाट्याचे उपयोग स्वयंपाकघरात गाल फुगवून बसला होता बटाटा अंगावरल्या डोळ्यांनी मला पाहत होता || माझ्याशी बोलायला लागला तो जेव्हा खरे नाही वाटले मला तेव्हा तुम्हालाही वाटेल मी सांगे हा प्रसंग खोटा || " खाण्यामध्ये उपयोग माझे आहेत खूप मोठे तरी तुम्ही का बोलतात डोक्यात आहे कांदे बटाटे नाकाने सोलाल कांदे तर आहे तुमचाच तोटा || कांद्याचे वाढले ना रे बाजारी भाव चढ्या दराने गंजले सारे रंकराव आता मला आला आहे मान मोठा || कधीही मी कामी येई जेव्हा नसे भाजी ताजी कोणत्याही भाजीत मिसळून जाण्या मी राजी बहुगुणी असा सगळ्या भाज्यांत शहाणा मोठा || माझी करा रस्सा भाजी सुकी भाजी मटार बटाटा भाजी किंवा करा मिक्

दोसतार - २८

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 09/12/2019 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : http://misalpav.com/node/45780 या
प्रश्नावर घाटे सरांना बाउन्सर च्या अपेक्षेने पुढे आलेल्या बॅट्स्मनला एकदम सरपटी बॉल यावा तसे झाले असेल. टंप्याच्या त्या शंकेने सरांचीच काय पण वर्गातल्या सगळ्यांचीच विकेट घेतली होती. तास संपल्याची घंटा झाली . घाटे सरांची सुटका झाली. त्या दिवशी शाळा सुटताना टम्प्याची शंका सगळ्यांच्या घरी गेली.
घरी जाताना कोपर्‍यावर शितल्या आणि आळीतली आणखी दोनतीन जण, सायकलवर बांबू घेऊन आलेल्याला काहीतरी सांगत होते. कसला तरी मांडव घालायचे चालले होते. काहीतरी चालले होते.

पानिपत चित्रपट परीक्षण: सोपी करून सांगितलेली गुंतागुंतीची कथा!!

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 08/12/2019 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
माझे हे परीक्षण वाचण्याआधी महत्वाची सूचना: मी पानिपत "चित्रपटाचे" हे परीक्षण लिहिले असून खरोखर घडलेले पानिपत युद्ध आणि त्या संदर्भातील इतिहासातील खरेखोटेपणा याचे परीक्षण लिहिलेले नाही आणि त्याबद्दल लिहिण्याची माझी पात्रताही नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

माहेर, सासर

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 08/12/2019 04:53 या दिवशी प्रकाशित केले.
माहेर, सासर नदीच्या त्या किनारी साजण माझा उभा कधीचा वाट बघतो माझी जीवाचा तो सखा अल्याड गाव माझे त्यात मी राहिले पल्याड त्याचे गाव कधी नाही पाहिले चिरेबंदी साचा भक्कम असे माझे घर नाही दिसत येथून घर त्याचे आहे दूर मनात त्याची सय मध्येच जेव्हा येते त्याचाकडची वाट नजरेला खुणावते मनी लागली हुरहुर कसे असेल सासर कसे का असेना मी शेवटी सोडेन माहेर - पाषाणभेद ०८/१२/२०१९

अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 07/12/2019 05:26 या दिवशी प्रकाशित केले.
अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर अहो डॉक्टर काढा की माझे वेंटीलेटर मला काही झाले नाही बघा मी लिहीन सुद्धा लव लेटर (कोरस: हिला द्या हो डिसचार्ज लेटर) न मी आजारी न मी बेचैन डोकेदुखी नाही मला न तापाची कणकण पण मग का देता मला तुम्ही इंजेक्शन? काढा की माझे वेंटीलेटर थोडे औषध मी घेते थोडे तुम्हीपण घ्या ना माझ्या हृदयाची धडधड कान देवून ऐकाना सलाईन ऑक्सीजन दुर करा अन घ्या माझे टेंपरेचर काढा की माझे वेंटीलेटर इसीजी नका करू तुम्ही पल्सही नका पाहू कोणी लॅब टेस्ट नका सांगू, बंद करा तो समोरचा मॉनिटर काढा की माझे वेंटीलेटर पलंगावर स्पेशल रूमच्या, मी आहे झोपलेले काळजी घेण्या

त्रिपात्री आणि एक अंकी नाटक....?

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 06/12/2019 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
खालील नाटक हे तद्दन काल्पनिक आहे. केवळ टाइमपास म्हणून लिहिले आहे. ह्या नाटकात कुठल्याही प्रकारचे विचारमंथन नाही. त्यामुळे, खूप विचार करणार्यांनी पुढील नाटक वाचले नाही तर फारच उत्तम. ज्यांनी वाचले आहे, त्यांच्यासाठी....ह्या नाटकाला योग्य ते शीर्षक द्यावे, ही नम्र विनंती. धन्यवाद. ... ........... रोहिणी : तुम्ही पेपरात बातमी वाचली असेलच ना? की एक मुलगी लग्न झाल्यावर तिसऱ्याच दिवशी प्रियकराला घेऊन पळून गेली. खूप चर्चा ही केली असेल ना. मला शिव्या पण देऊन झाल्या असतील. कदाचित ...कदाचित कशाला? नक्कीच... माझ्या घराण्याचा पण उद्धार केला असणार. मुलीला संस्कार कसे नाहीत?

आशय - भाग ७ - समाप्त

लेखक किंबहुना यांनी शुक्रवार, 06/12/2019 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ६ प्रस्तावना - पहिल्या प्रस्तावनेत पण मी म्हणालो होतो, की महिला अत्याचार हा साधारणपणे नेहमीच ऐरणीवर येणारा विषय आहे, पण पौगंडावस्थेतील मुले देखील बऱ्याच वेळेस अश्याच गोष्टीना सामोरी जात असतात. या भागात अजून काही टाळता ना येण्याजोगे प्रसंग येतील. यामध्ये मला स्वतःला victim card खेळायची इच्छा नाही, देवाच्या कृपेने मी आता वयाच्या अश्या टप्प्यावर आहे की या गोष्टींचा काहीही दृश्य परिणाम माझ्या आयुष्यावर नाही, मला स्वतःला मुलगा पण नाही, ज्याची मी काळजी करावी.

क्लीनचीट ची फॅक्टरी

लेखक बाजीगर यांनी शुक्रवार, 06/12/2019 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
बातमी : सिंचन घोटाळ्यात अजीत पवारांना क्लीनचीट https://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/… धूतपापेश्वर जसा वाढू लागला अपराध तशी वाढली गरज उद्धार-हात काहींनी मिळवली यावर डाॅक्टरी आणि उघडली क्लीनचीट ची फॅक्टरी जनता पहातेय कारभार नंगा घ्या धूवून हात जोवर वहातेय सत्तेची गंगा कधीतरी उघडेल जनता तिसरा डोळा आणि भ्रष्टघराणी होतील चोळामोळा.
काव्यरस

दोसतार -२७

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 06/12/2019 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://misalpav.com/node/45778
ती दोघेही त्यांच्या त्यांच्या मित्रमैत्रीणीना सांगणार, ती त्यांच्या मित्रमैत्रीणीना , त्या त्यांच्या, ती त्यांच्या. असे करताना कोणाच्या घरी पाहुणे वगैरे आले असतील तर तेही ऐकणार, आणि ते त्यांच्या त्यांच्या गावी गेल्यावर तिथे सांगणार. ते ज्याना सांगणार ते इतरांना सांगणार. हळू हळू हे भारतभर होणार. बातम्या अशाच पसरत असतील. ….
रेडीओवरच्या बातम्या सगळेजण एकाच वेळेस ऐकतात . त्यांना पसरवायची गरज नसते. पण एकाला समजलेली बातमी तो दुसर्‍या दोघांना सांगतो. दुसरे दोघे आणखी दोघा दोघांना सांगतात.

कव्वाली: तुला पाहिले की

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 05/12/2019 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
कव्वाली: तुला पाहिले की किती तुझी आठवण यावी किती मी तुझ्यासाठी झुरावे काही बंधन नाही त्याला तुझ्यासाठी मी मरावे दुर जरी असशील तू माझ्या मनाला तू ओढून नेते पण तुला पाहिले की काळजात धकधक होते किती तू वार केले माझ्या हृदयावर खोल जखमा वरून केल्या त्यावर नाही कधी जरी रक्ताचा थेंब त्यातून वाहीला तुझ्या नजरेचा बाण तेथे गुंतून राहिला त्या कत्तलीने मी कसा मेलो ते माझे मला ठावूक पाहिले एकवार तू अन मी जळून गेलो खाक नको आता तरी तू वेळ लावू पुन्हा सामोरी ये ग ये तुला पाहिले की काळजात धकधक होते सागरामध्ये असते पाणी, पाण्याचीच वाहते नदी मी तुझाच आहे अन तुझ्याविना राहिलो का कधी? तुझा चेहेरा समोर जेव्हा जे