Skip to main content

(मनसुबे)

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 05/03/2008 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा पुलस्ति यांची अप्रतिम गझल मनसुबे गंध हा कसला कळेना श्वास गुदमरतोच आहे रेशमी सदरा जरी हा रोज मी धूतोच आहे मज किती हुसकावले, दुर्लक्ष केले, टाळलेही मी तरी दारी तिच्या हा नित्य घुटमळतोच आहे लपवलेले तोंड जाताना तिच्या खोलीवरी मी हाय बापाला तिच्या मम मनसुबा कळतोच आहे! नेमका आलाच तो ही आज सामोरा मला अन बोलला काहीच नाही पण मिळाली पोच आहे काल अंधारात त्याने एवढे समजावले मज कान डावा आज माझा हा जरा दुखतोच आहे! उघड रे डोळे अता तू - शुद्ध तुज असलीच जर का कोण हे कानात माझ्या आज ओरडतोच आहे? या टुकार विडंबनाची फारशी मज खंत

बसा दोस्तहो या दारूवर* बोलू काही !

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 05/03/2008 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
जरा चुकीचे, खूप बरोबर बोलू काही ! बसा दोस्तहो या दारूवर* बोलू काही ! खच्चून घुटके मद्याचे हे घेत रहा तू मिटले नाहीत डोळे तोवर बोलू काही बसा दोस्तहो या दारूवर बोलू काही ! उभाच पाहून ताठ मला कुजबुजले सारे पाठ लागू दे भूईस नंतर बोलू काही बसा दोस्तहो या दारूवर बोलू काही ! मिळेल तितके मद्य तुला तर हवेच आहे साकी लावे खिशास कातर बोलू काही बसा दोस्तहो या दारूवर बोलू काही ! उद्या-उद्याची कशास पर्वा ड्राय डे जरी खोल बुडूया! तरंगल्यावर बोलू काही बसा दोस्तहो या दारूवर बोलू काही ! `ग्लास' धरी बा डोळ्यावरती चष्मा म्हणूनी वाट आंधळी!

आमची कविता

लेखक धनंजय यांनी बुधवार, 05/03/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
स्फूर्तीस्थान अविनाश ओगले यांची अप्रतिम कविता माझी कविता आमची कविता आमची कविता इतक्या सहज भेटणार नाही तुला तुझ्या बोलण्याने तुझ्या हसण्याने फसणार नाही तुला. रोज आंगणात वाळवत असते पिळून अखंड धूणी इतक्या जवळ जाऊ नकोस ...तिचा राग सोसणार नाही तुला

माझी कविता.

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 05/03/2008 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
माझी कविता इतक्या सहज भेटणार नाही तुला. माझ्या बोलण्यात माझ्या हसण्यात दिसणार नाही तुला. खोल मनात जळत असते एक अखंड धूनी... इतक्या जवळ येऊ नकोस ..तिची धग सोसणार नाही तुला. -अविनाश ओगले

"प्रपोज करणे" आणि नकार पचवणे ....

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 05/03/2008 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
काय हो , तुम्ही कधी कुठल्या मुलीला "मागणी घातली " आहे का ? मागणी म्हणजे जी 'चहा-पोह्याच्या' ऑफेशियल कार्यक्रमात घालतात तसली नाही तर स्वताच काही तरी "टाका भिडवून" म्हणतो मी. कसा वाटला तो अनुभव ?

आयुर्वेद

लेखक सृष्टीलावण्या यांनी बुधवार, 05/03/2008 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात नारायणपेठेत पत्र्या मारुतीजवळ वैद्य शेंडेशास्त्रींचा दवाखाना आहे. पूर्वी तिथे मोठी शेंडी कार्यरत होती पण आता तेथे बाळासाहेब नावाची छोटी शेंडी काम करते. हे बाळासाहेब सुद्धा तेव्हढ्याच कमालीचे कुशल कारागिर आहेत. आजही ते काही नसा दाबून स्थानिक भूल न देता सहजतेने दात काढतात. पण त्यांचा भर दात न काढता शक्यतो ते टिकविण्यावर असतो. ते दर शनिवारी सकाळी १०.०० वाजता मुंबईत दादर स्थानकाबाहेर माधववाडीत येतात आणि आम्ही केवळ दातांवरच नव्हे तर सर्वच आजारांवर त्यांचा सल्ला घेतो. असो. लेखाचा मुद्दा की आयुर्वेद हे एक अजब, गुढ, गहन ज्ञान आहे. मी फार पूर्वी वाचले होते.

संडे स्पेशल (पानगी)

लेखक स्वाती राजेश यांनी बुधवार, 05/03/2008 03:37 या दिवशी प्रकाशित केले.
विजुभाउनी विचारलेली "पानगी "ची रेसिपी. पानावर थापून करायची ती पानगी. १ वाटीभरून तांदळाचे पीठ १/२ टी.स्पून मीठ २ टी.स्पून साखर १/२ ते पाऊण वाटी दुध केळीची पाने १टे.स्पून तूप पातेल्यात तांदळाचे पीठ घेऊन त्यात मीठ, साखर वथोडे दुध घालून हाताने कालवावे. हे मिश्रण सैलसर असावे. त्याचे ३भाग करून, एक भाग केळीच्या पानावर गोलाकार पसरावा. वरून दुसरे पान झाकावे व गॅसवर तवा ठेऊन त्यावर ही तयार केलेली पानगी पानासकट ठेऊन दोन्ही बाजुंनी भाजून घ्यावी. पानगी शिजली कि पानापासून सहज निघून येते. पाने करपतात, काढून टाकता येतात. दोन्ही बाजुंनी भाजून पानगी ताटलीत काढावी. वर थोडे साजूक तूप घालून खाण्यास द्यावी.
Taxonomy upgrade extras

काश्मिरसिंग

लेखक विकास यांनी बुधवार, 05/03/2008 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
एखादी गोष्ट/चित्रपट असावा तशी ही सत्यघटना! काश्‍मीरसिंग आज मायदेशी परतणार इस्लामाबाद, ता. ३ - गेली ३५ वर्षे पतीची चातकासारखी वाट पाहणारी परमजितकौर हिचे स्वप्न आज साकार होत आहे. गेली ३५ वर्षे तिने परिस्थितीशी झुंज दिली. मोलमजुरी करून मुलांना मोठे केले. हे करीत असताना ती "त्याला' विसरली नाही. तिने धावा सुरूच ठेवला होता. अखेर तिला यश आले....

मला आवडलेल्या काही अलिकडील कविता

लेखक मुक्तसुनीत यांनी बुधवार, 05/03/2008 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी संकेतस्थळांवर भटकताना अनेकदा कविता वाचायला मिळतात. अनेक नवे लोक आपापल्या परीने काहीतरी प्रयत्न करून पहात असतात. या भटकंतीमधे सापडलेल्या या काही कविता. या सर्व कविता नव्व्दीच्या दशकातल्या किंवा नंतरच्या आहेत. त्या अशा कवींच्या आहेत जे मला केवळ आंतरजालामुळे माहीत झाले. विषय , मांडणी, भाषेला दिलेली वाटावळणे , या सर्व बाबतीमधे या कविता फार अनवट आणि म्हणूनच महत्त्वाच्या ठराव्यात. कविता या प्रकाराच्या शक्यताना जेव्हा आतापर्यंतच्या मार्गांपेक्षा वेगळ्या अंगानी भिडण्याचे प्रयत्न होतात तेव्हा एक नवीन प्रकारची कविता जन्म घेते. सुरवात करतो मन्या जोशीच्या एका कवितेने.