Skip to main content

संजय दत्तची लोकसभेची उमेदवारी

लेखक हरकाम्या यांनी गुरुवार, 12/03/2009 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांचा लाडका ? आणि गांधीजींच्या विचारांवर आधारित अशा सिनेमात काम करुन लोकप्रियता मिळालेला अभिनेता ? आणि बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी शिक्शा सुनावण्यात आलेला संजय दत्त याला एका राजकीय पक्शाने लोकसभेसाठि उमेदवारी देउ केलेली आहे व त्यासाठि उभे राहता यावे यासाठि हा प्राणी सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी तुरुंगात असलेला अफजल गुरु यालाही उद्या असेच वाटू लागले तर काय होइल . याची कल्पनाही करवत नाही. नशीब आमचे हे की अजुन आमच्या एकाही राजकीय पक्शाच्या हे लक्शात आले नाही.

लव्ह मॅरेज की ऍरेंज ? तुम्ही नाव द्या.

लेखक जागु यांनी गुरुवार, 12/03/2009 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
आठवतो तुला तो दिवस? ज्या दिवशी आपण गुंतलो एकमेकांत! आधिच निरोप आला होता फक्त पाहायला येणार आहात आधीही पाहील होतस लांबुन मी तुला आणि तु मला आवडले म्हणूनच आलास परत तुझ्या परीवाराला घेऊन मला दाखवायला अन निरखायला. आतच बसले होते मी धडधडणारे ठोक्यांवर मात करत. एकीकडे तुला पाहण्याची ओढही होती तुही आवडला होतास मला म्हणूनच तर हुरहुर चालू होती मला बोलावल तुझ्या आत्पेष्टांनी मी आले तुमच्या समोर थरथरणार्‍या कप बशांना सावरत ! सगळ्यांची नजर एकदाच माझ्यावर शांत झाली, कपबशांची किणकिण मात्र जास्तच जाणवू लागली. मला बसवले तुमच्या सोबत तुझ्याच माणसांनी आणि विचारले , "आमचे घर सांभाळशील का ?
Taxonomy upgrade extras

झाडांच्या अश्याही कविता

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 12/03/2009 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
१. प्राक्तनात प्राण लाचार जगण्याचे आंदण मिळते फांदीच्या ओलाव्याला नवजात बांडगूळ गिळते . . २. फळभरल्या झाडावरुनी पाखरे निघाली जाया घरट्याचे छत्र गनिम नजरेत विषारी माया . . ३. देवडी विसावून पायी परमार्थ असे बसलेला पानांचे प्राण खुडून अर्पितो दान देवाला . . ४. सावलीत शांत झाडाच्या मरणाची केवळ भ्रांत खंगलेला, खिन्न मनाचा झोपला देह विश्रांत . . ५. रसशुष्क वाळली फांदी वाळीत टाकली कोणी ? डोळ्यात वाळव्यांच्या मगरीचे भावुक पाणी . . . .
Taxonomy upgrade extras

आम्हा गरीबांचे बघा

लेखक अंकुश चव्हाण यांनी गुरुवार, 12/03/2009 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हा गरीबांचे बघा सारे पत्त्यांचे बंगले. वेदनेच्या पायावर आमच्या सुखांचे ईमले. शीळ्या भाकरीचा घास, तेही तुकडे जळके. चार कुडाच्या या भिंती, वर छप्पर गळके. काजळल्या कन्दिलाचा प्रकाशही काजळला. सुख - सौख्याचा आस्वाद आम्हा कधी ना कळला. आमचे जग हे स्वप्नांचे सारा स्वप्नांचाच खेळ. आसु आणि हासूमध्ये कधी नसतोय मेळ. आम्हासाठी जीवन हे असे अळवावरचे पाणी. न भावे जगजेठी मना सखी वाटते विराणी...

ह्रदय-ज्योत परिवार - ओळख

लेखक अडाणि यांनी गुरुवार, 12/03/2009 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, आपणास 'ह्रदय-ज्योत परिवार' ह्या न्यासाची (ट्रस्ट) ओळख करून देवू इच्छितो. ह्रदय्-ज्योत परिवार हा गेली ५ वर्षे जन्मजात असलेल्या ह्रदयदोषासंबंधी काम करतो. आपल्याकडे बर्‍याचवेळा योग्य माहिती अभावी वेळेवर उपचार होत नाहित. दोषाचे निदान झाले तर उपचारांचा खर्च परवडत नसतो किंव्वा पैसे कसे जमा करवेत ह्याची माहिती नसते. अजूनही बर्‍याच लोकांना ह्रदयरोग आणि ह्रदयदोष ह्यातील फरक माहिती नसतो. ह्या सर्व बाबींच्या अनुशंगाने न्यास काम करतो.

मराठी चित्रपटातील संवादच दळीद्री?

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 12/03/2009 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, देवदत्तरावांनी सुरू केलेला सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये हा धागा वाचनात आला. त्यात अनेकांनी हिंदी चित्रपटातील लक्षात राहिलेली वाक्ये, लक्षात राहिलेले संवाद नोंदवले आहेत. याकरता हिंदी चित्रपट सृष्टीचा आपल्यावरील पगडा कारणीभूत आहे, तसेच तुमच्याआमच्या सारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांना जसेच्या तसे लक्षात राहावेत इतपत त्यातील संवाद/वाक्ये परिणामकारक आहेत असे म्हणावे लागेल.

"लव टू मरेज" प्रवासवर्णन

लेखक सौरव जोशी यांनी गुरुवार, 12/03/2009 06:37 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र टाईम्स मध्ये मागे एक सदर आल होत... विषय होता "लव टू मरेज प्रवासवर्णन" मी थोड वेगळ पण स्वानुभवाने लिहीण्याचा प्रयत्न केला, आज "मिसळ पाव" चा मेम्बर झालोय तर म्हटल सुरुवात त्या लेखानेच करु कारण तो लेख ह्रदयाच्या अगदी जवळ आहे! पहा तुम्हाला आवडतो का... लि़खाण सुधारण्यासाठी आलेल्या सूचना व टिका, दोन्हीचे स्वागत! प्रेम काय असते हे कळायच्या अगोदरच प्रेम करून मोकळा झालेला मी!! (Thanks to Bolywood Movie संस्कार)... जेव्हा विचारांमध्ये प्रगल्भता आली, सारासार विवेक बुद्धी जागृत झाली तेव्हा."मी कोणावर खरच प्रेम करू शकतो का?" हा यक्षप्रश्न समोर उभा ठाकला.

वीकांत आणि अवीकांत: तर्क क्रीडा आणि फरक

लेखक प्रमेय यांनी गुरुवार, 12/03/2009 04:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गेला बरेच काळ मी मिसळपावचा सदस्य आहे, त्याआधीपासून वाचक आहे! माझ्या मनात कित्येक दिवसांपासून एक किडा वळवळत आहे. :/ किडा असा आहे की: एकूण लेख आणि कविता यांचा विचार करता जेव्हा जेव्हा वीकांत येतो तेव्हा तेव्हा मिपावर लेखांचा ढीग पडतो! (स्पर्धा पहावी तर इथे! १००वा लेख काय:O , ५० ओळींचे कवित्व म्हणावे का महाकाव्य! ) या लेखांना प्रतिक्रिया म्हणून महाढीग उत्तरे येतात, वाद घडतात, भावी लेखांची बीजे रोवली जातात. एकंदरीत, विपुल लेखन जाहले आणि उदंड पीक आले अशी परिस्थिती निर्माण होते. यात जर जोडून सुट्टी आली तर मग विचारायला नको अशी परिस्थिती होते.

फ्रॉस्ट्/निक्सन

लेखक शब्देय यांनी गुरुवार, 12/03/2009 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रॉस्ट्/निक्सन हा यंदाच्या ऑस्करसाठी नामांकन मिळवलेल्या चित्रपटांपैकी एक. यावेळी अगदी ठरवून सगळे ऑस्कर नामांकीत चित्रपट एक एक करुन पाहिले. ( अर्थात चित्रपट एक एक करुनच पाहतात...एकदम सगळे कुणी नाही पाहतं कारण ठसका लागतो.. जमल्यास ह.घ्या. न जमल्यास असो.) फ्रॉस्ट्/निक्सन बद्द्ल मी बरेच गैरसमज करुन घेतले होते. प्रोमो पाहून ही कोण्या एका फ्रॉस्ट् ने निक्सनच्या घेतलेल्या मुलाखतीची एक डॉक्युमेंटरी असावी असा आपला मी एक पूर्वग्रह करुन घेतला होता. निक्सनच्या वॉटरगेट प्रकरणाबाबतचे माझे (अ)ज्ञानही राजकारणी लोकांनी केलेला एक झोलझाल इतपतच मर्यादित होते.

समज-गैरसमज

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 12/03/2009 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
"लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा' असं म्हटलं जातं. (म्हणजे काय, कुणास ठाऊक!) लहानपण हा आयुष्यातला सगळ्यात मोलाचा, महत्त्वाचा टप्पा असतो, एवढंच त्यातून घेण्यासारखं. अर्थात, हे कळतं लहानपण सरल्यावर आणि जास्त अक्कल आल्यावरच. लहानपणात मात्र आपणच हुशार, असं वाटत असतं. त्या वयात मनात काही संकल्पना, व्याख्या, तत्त्वं घट्ट बसलेली असतात. मोठ्ठं झाल्यानंतरही त्या प्रतिमांचं, संकल्पनांचं भूत मानगुटीवरून उतरायला बराच वेळ द्यावा लागतो. माझ्याही लहानपणी अशा अनेक कल्पना, गृहीतकं मनात घट्ट बसली होती.