Skip to main content

लव्ह मॅरेज की ऍरेंज ? तुम्ही नाव द्या.

लव्ह मॅरेज की ऍरेंज ? तुम्ही नाव द्या.

लेखक जागु
Published on गुरुवार, 12/03/2009
आठवतो तुला तो दिवस? ज्या दिवशी आपण गुंतलो एकमेकांत! आधिच निरोप आला होता फक्त पाहायला येणार आहात आधीही पाहील होतस लांबुन मी तुला आणि तु मला आवडले म्हणूनच आलास परत तुझ्या परीवाराला घेऊन मला दाखवायला अन निरखायला. आतच बसले होते मी धडधडणारे ठोक्यांवर मात करत. एकीकडे तुला पाहण्याची ओढही होती तुही आवडला होतास मला म्हणूनच तर हुरहुर चालू होती मला बोलावल तुझ्या आत्पेष्टांनी मी आले तुमच्या समोर थरथरणार्‍या कप बशांना सावरत ! सगळ्यांची नजर एकदाच माझ्यावर शांत झाली, कपबशांची किणकिण मात्र जास्तच जाणवू लागली. मला बसवले तुमच्या सोबत तुझ्याच माणसांनी आणि विचारले , "आमचे घर सांभाळशील का ? " हृदयाचे ठोकेच थांबले, पटकन हो म्हणून गेले गडबड गोंधळ सगळच मनात लोळू लागल. तुझ्याही मनाच तेच चालु होत. म्हणून लगेच मला विचारायला लावलस "मी आवडलो का विचारा तिला मनापासून ?" माझी मी राहीलेच नाही तेंव्हापासून ! बाहेर मी आले तुम्हाला सोडायला, मनातल्या ओढीने कटाक्ष टाकला तुझ्यावर तू ही तसाच टाकला होतास चोरून माझ्यावर. लव्ह तर झाल होत सुरू, फक्त मॅरेज बाकी होत तेही झाल आणि आयुष्या प्रेममय झाल.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

याद्या 1404
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

छान आहे... आवडली कविता.