Skip to main content

'नांदा सौख्यभरे' (राखी तू मांडले। तुझे स्वयंवर)

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 05/08/2009 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
राखी तू मांडले। तुझे स्वयंवर 'वर' अनावर। देशोदेशी 'टीआरपी'साठीच। मिडियाचा स्टंट प्रसिद्धी इंस्टंट। मिळे तुला आपुल्या देहाचा। मांडसी बाजार कैसा हा आजार। राखी तुझा भारतीय नार। आहेस तू राखी संस्कृतीची 'राखी'। लाज थोडी देतो आशीर्वाद। लग्नगाठ बांधा एकाशीच 'नांदा। सौख्यभरे' -अविनाश ओगले
काव्यरस

राखी : देवस्थळी ते सावंत!

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 05/08/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
rakhi राखीपौर्णिमेचं लहानपणापासूनच कधीही फारसं अप्रूप नव्हतं. एकतर मला सख्खी बहीण नाही. त्यामुळे तिच्याकडून राखी बांधून घेण्याची क्रेझ नव्हती. मामेबहिणी कधीतरी असायच्या रत्नागिरीत. तेव्हा राखीबंधनाचा सोहळा व्हायचा. पण ती राखी नैसर्गिक न वाटता, "बंधन'च वाटायचं. शेजारची स्वरूपा लहानपणापासून राखी बांधायची. आजही बांधते.

संस्कार

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 05/08/2009 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
चुकले मी परत अस कधीही करणार नाही. तुझी शप्पथ. तुला वाटत तस काहीही नाही. हव तर मार परत एकदा मला. तु सांगशिल ती शिक्षा मला मंजुर आहे. आता इतर मैत्रीणी ऐनवेळी आल्या नाहीत त्याला मी काय करु? आता ही पोर हाताशी नसती तर हीला कधीच सोडली असती. आई म्हणायच का ह्या बयेला? कसले संस्कार आयशीच्या घोवाचे. तरी सांगत होतो एवढा जाच करु नकोस. नाही दिवस राहीले पुर्वीचे. हिच्या आग्रहाकरता कन्या शाळेत घातली. आता पोर रुपाने माझ्यावर गेली त्यात तीचा काय दोष? ही तीच्या रुपावर जळते की काय? ३६ गुण मिळतात म्हणून बापाने सांगितले. लग्न केले. लग्न कसले बोडक्याचे. १७ वर्षाचा जाच झाला. प्रत्येक गोष्टीत उलटच डोक चालत. लग्न जेम

फुलांच्या देशात ......

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 05/08/2009 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कंपनीचे (फुग्रो) हेडऑफीस लायशेंडॅम (Leichendam) हॉलंड इथे असल्याने दरवर्षी किमान दोन तरी चकरा होतातच हॉलंडच्या. यावेळी कालच्या मे महिन्यात परत एक दौरा झाला. यावेळी वुरबर्ग येथे राहण्याची सोय केली होती कंपनीने. इथे आलो की इथली फुले कॅमेर्‍यात पकडणे हा माझा छंद असतो. या वेळी ठरवले होते की नेहेमीच ट्युलीप्स च्या मागे लागतो, (मग सिझन असो वा नसो, मी आपला ट्युलीप्स शोधत फिरतो वेळ मिळेल तसा) या वेळेस त्या वाटेला जायचे नाही. मग इतर फुलांच्या मागे लागलो.

आंतरराष्ट्रीय बीयर दिवस

लेखक सुनील यांनी बुधवार, 05/08/2009 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज आंतरराष्ट्रीय बीयर दिवस आहे, हे मिपाकरांच्या ध्यानात आलेले दिसत नाही! असो, सध्या कार्यबाहुल्यामुळे वेळ नाही, परंतु सविस्तर लेखासाठी जागा राखून ठेवत आहे!!

महाबळेश्वर ते कास... चालत...

लेखक विमुक्त यांनी बुधवार, 05/08/2009 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझा मित्र यशदीप साताऱ्याचा. त्यामुळं मी बऱ्याचदा साताऱ्याला जात असतो. साताऱ्याच्या आसपास भरपूर भटकून झालयं. अजिंक्यतारा, यवतेश्वर, कास, बामणोली, जरंडा, नांदगीरी (कल्याणगड), सूळपाणी, मेरुलींग, पाटेश्वर, माहुली असं बरचंस भटकलोय. पण कासची मजा वेगळीच. केवढं ते पठार!!! मस्त बेभान वारा असतो; आणि गर्दी, गोंधळ अजीबात नसल्यामुळं फारच निवांतपणा जाणवतो. पाऊस संपत आल्यावर बारीक-बारीक रंगीबेरंगी गवतफुलं बघतानातर जणू जमीनीवर रंगीत गालीछा अंथरल्या सारखं वाटतं. असंच एकदा कासच्या पठारावर असताना... यशदीप: पश्या...

हिंदोळा

लेखक शरदिनी यांनी बुधवार, 05/08/2009 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदोळा साम्राज्ये लयाला जाती पडली नि:शस्त्र समता भाव तेथे ऋजुता टणत्कार ढसाढसा तप्त अग्निवर्षा सुप्त जनगणना भावविभोर कंकणराणा तुझा फ़सफ़शीत उत्साह जणू तेजतर्रार गोक्षुरादि गुग्गुळ संहत नायट्रिक आम्लात माझ्या दुधारी वेदनेचे समूळ उच्चाटन प्रेरणा समिधा यांची एकत्र भावधुम्मस आणि एकटाच डोलणारा सचिंत हिंदोळा ५ ऑगस्ट २००९, पुणे
काव्यरस

फक्त पुरुषांसाठी!

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 05/08/2009 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
फक्त पुरुषांसाठी हॅहॅहॅ ! लगेच डोळे विस्फारु नका! हे आवाहन आहे पुरुषस्पंदन या वर्षीच्या दिवाळी अंकासाठी पुरुष लेखकांना! मावा ( मेन अगेन्स्ट व्हायलन्स ऎन्ड अब्युज) या स्वयंसेवी संस्थेतर्फे गेली तेरा वर्षे समाजातील स्त्रियांवरील हिंसा व गैरवर्तन यांना प्रतिबंध करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. मुंबईचे हरीश सदानी हे या विषयात "वाहुन" गेलेले एक कार्यकर्ते आहेत.पुण्यातील गीताली वि म, विद्या बाळ, मंगला सामंत या स्त्री-पुरुष समता वादी करणा-या चळवळीतील महिला कार्यकत्त्यांबरोबर समांतर व पुरक काम करणारे कृतीशील विचारवंत आहेत.