Skip to main content

फक्त पुरुषांसाठी!

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 05/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
फक्त पुरुषांसाठी हॅहॅहॅ ! लगेच डोळे विस्फारु नका! हे आवाहन आहे पुरुषस्पंदन या वर्षीच्या दिवाळी अंकासाठी पुरुष लेखकांना! मावा ( मेन अगेन्स्ट व्हायलन्स ऎन्ड अब्युज) या स्वयंसेवी संस्थेतर्फे गेली तेरा वर्षे समाजातील स्त्रियांवरील हिंसा व गैरवर्तन यांना प्रतिबंध करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. मुंबईचे हरीश सदानी हे या विषयात "वाहुन" गेलेले एक कार्यकर्ते आहेत.पुण्यातील गीताली वि म, विद्या बाळ, मंगला सामंत या स्त्री-पुरुष समता वादी करणा-या चळवळीतील महिला कार्यकत्त्यांबरोबर समांतर व पुरक काम करणारे कृतीशील विचारवंत आहेत. पुण्यात पुरुष उवाच चे काम करणारे श्री मुकुंद, हे दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सेनापती बापट रोड वर कुमार प्राईड येथील आपल्या निवासस्थानी अभ्यासवर्ग, चर्चा, सुसंवाद असे कार्यक्रम गेली अनेक वर्षे घेताहेत. गीताली-मुकुंद हे दांपत्य पुण्यातील पुरोगामी चळवळींना अपरिचित नाहीत. हरीश सदानी हे त्या वर्तुळातलेच. या वर्षीच्या विशेषांकात त्यांनी स्त्री-पुरुष संबंधातील एका पैलुवर लक्ष केंद्रित केले आहे ते म्हणजे मैत्री. मैत्री विशेषांकासाठी २५०० शब्दांपर्यंत आपण आपले लिखाण हे १२ सप्टेंबरपुर्वी खालील पत्त्यावर पाठवावे हरीश सदानी, ७०५, परिश्रम बिल्डिंग, भंडार गल्ली, लेडी जमशेदजी रोड, माहिम, मुंबई ४०००१६ भ्रमणध्वनी- ९८७०३०७७४८ विरोपाचा पत्त्ता- harsh267@rediffmail.com लेखनाविषयी सविस्तर माहिती इथे पहा. चला तर मग उचला टंकनी

वाचने 3281
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

अरे प्रकाश, हे निबंधांचं अलिकडे काय फ्यॅड चालवलं आहेस तू?! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

हॅहॅहे तात्या इथे ल्वॊक लई भारी लिवतात. जरा त्यान्ला लिवायला प्रव्रुत्त करुनशॅन जरा हातभार लावावा म्हंतो . मिपाची लिंक हरीश सदानीना पाठवली आहे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

हॅहॅहॅ जाता जाता : हॅहॅहॅ -(हॅहॅहॅ) टॅहॅहॅहॅ

In reply to by टारझन

>>टॅहॅहॅहॅ मूल जन्मतः ट्यॅहॅ करते असे म्हणतात. ;) नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

सविस्तर लेखनासाठी "इथे" टिचकी मारली तर नुसती टिचकीच ऐकायला येते दिसत काहीच नाही :(

मावा ( मेन अगेन्स्ट व्हायलन्स ऎन्ड अब्युज) अध्यक्षपदाची निवडणूक कधी असते हो? एक उच्चशिक्षीत ज्योतीषी महाराज ओळखीत आहेत त्यांना हे पद भुषवायला आवडेल. आणि हो लेख काय लेखमाला लिहतील तिथे.

In reply to by सहज

व्हय व्हय आमी बी मत दिवु कि त्यास्नी ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

हरीश सदानी, ७०५, परिश्रम बिल्डिंग, भंडार गल्ली, लेडी जमशेदजी रोड, माहिम, मुंबई ४०००१६ हॅ हॅ.... हरीश सदानी हे लेडी जमशेदजी रोड वर राहतात !! हॅ हॅ... -- मिसळभोक्ता

मेन अगेन्स्ट व्हायलन्स ऎन्ड अब्युज प्रकाशकाका ह्यावर तुम्ही तुमच्याच अनुभवावर एखादा निबंध का लिहित नाही? हॅहॅहॅ

सध्या व्रुत्तवाहिन्यांवर नकली मावा जप्त केला अशी दरदिवसाआड ब्रेकिंग न्युज असते. त्यातला हा कुठला "मावा "