Skip to main content

एक कर्मयोगी रामदास

लेखक भास्कर केन्डे यांनी गुरुवार, 06/08/2009 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
बालवयापासून कौटुंबिक जबाबदार्‍या, काबाडकष्ट करून घेतलेले शिक्षण आणि पुढे नोकरी व एकत्रित कुटुंबासाठी वाहून घेतलेले जीवन हा आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबप्रमुखाच्या जीवनाचा लेखाजोखा. यात कितीतरी मूक यातना, क्षणोक्षणी उराशी बाळगलेली परंतू कधीही पूर्ण न झालेली स्वप्ने, समाजाबरोबरच आप्तस्वकियांकडून झालेला मानसिक त्रास असा प्रचंड गाळ साचलेला असतो. या गाळात रुतून धीर खचलेल्या मनाने व क्षीण बनलेल्या शरीराने मग हा मध्यमवर्गी कुटूंब प्रमूख काळाशी तडजोडी करत उत्तर आयुष्याला खंगलेल्या अवस्थेत सामोरा जातो. त्यातही काही शारीरिक व्याधींचा ससेमिरा लागलेला असेल तर विचारायलाच नको.

शेयर मार्केट (बेसिक) भाग -१

लेखक दशानन यांनी गुरुवार, 06/08/2009 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : - मराठी भाषे मध्ये शेयर मार्केट विषयी जास्त माहीती उपलब्ध नाही आहे ती माहीती सरळ साध्या भाषेत देण्याचा प्रयत्न ह्या लेख मालिकेतून मी करणार आहे, ज्यांना जास्त माहीती आहे त्यांनी प्रतिसादामध्येच ती माहीती द्यावी जेणे करुन नवीन व्यक्तीला माहीतीचा उपयोग करुन घेता येईल. मी काही सर्व काही माहीती आहे व माझीच माहीती आहे ह्या आवेशामध्ये लिहीत नाही आहे जर कुठे चुकत असेल तर जाणकारांनी योग्य तो प्रकाश टाकावा ही विनंती. ह्या लेख माले साठी मी दैनिक भास्कर / टिव्ही -१८ व माझा काही वर्षाचा अनुभव ह्यांची मदत घेत आहे.

गेट वे,झवेरी स्फोटःतिन्ही दोषींना फाशी

लेखक विकास यांनी गुरुवार, 06/08/2009 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी इथल्या रेडीओवर पण ऐकले आणि आत्ता म.टा. मधे पण वाचले:
गेटवे ऑफ इंडिया आणि झव्हेरी बाजार येथे २००३ साली बॉम्बस्फोट घडवून ५२ जणांचे बळी घेणा-या आणि शेकडोंना जखमी करणा-या हनीफ सय्यद अनीस , त्याची पत्नी फहमिदा आणि अशरत अन्सारी यांना विशेष पोटा कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली.
आता मानवतावाद्यांनी यांचापण अफझल गुरू केला नाही म्हणजे मिळवले...

फक्त अनिवासी भारतीयांसाठी - नवा धागा

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 06/08/2009 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
वाचकांच्या सोयीसाठी नवा धागा उघडत आहे. जुन्या धाग्यासाठी पहा : http://www.misalpav.com/node/8846 सदर काथ्याकूट फक्त अनिवासी भारतीयांसाठी आहे. इतरांना फाट्यावर मारण्यात आले आहे. त्यांनी चपला शोधाव्यात, ही नम्र विनंती. तर अनिवासी भारतीयांनो, खालील प्रश्नाचे उत्तर द्यावे. त्याबरोबरच, स्वतःचे अनिवासीत्व वर्गीकृत करावे, ही देखील विनंती. (म्हणजे तात्पुरते : अमेरिकेतील एच १ - ब सारखे जे काही जग भर आहे ते, भारतीय नागरीक, परंतु परदेशी रहिवासः अमेरिकेतील ग्रीन कार्डसारखे जे जगभर आहे, ते.

लव्ह.. आज कल!

लेखक ज्ञानेश... यांनी गुरुवार, 06/08/2009 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
("लव्ह.. आज कल" हा इम्तियाज अलि दिग्दर्शीत चित्रपट नुकताच पाहण्यात आला. त्या अनुषंगाने मनात आलेले काही विचार.) पुर्वीच्या काळी चित्रपटात कसे असायचे की नायिकेची 'सगाई' ठरल्याची बातमी आली तरी नायकाचा चेहरा पांढराफटक पडायचा. :S मग ही सगाई होवू नये, आणि यदाकदाचित झालीच तर 'शादी'पर्यंत जाऊ नये यासाठी सगळा आटापिटा चालायचा. नायिकेचे पालक हेच अनेकदा व्हिलन असायचे. काळ नेहमी पुढे जात असतो. त्यामुळे नंतर नंतर नायिकेची लग्नघटिका समीप येईपर्यंत नायक निर्धास्त राहू लागले.

जन उडाण संपाचे

लेखक कौतुक शिरोडकर यांनी गुरुवार, 06/08/2009 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
मायेच्या हिरव्या वाढीने मिटते, वाट्यांच्या मोहात धुंद ओसरते जन उडाण संपाचे, नित्य पावसाते, का होते बेफाम, कसे चळवळते ! आवाजी नेत्यांच्या हरपून भान उठती, गुरगुरत्या हाकेला कधी रोखठोकच भिडती बोंबलती, कोकलती, उडती, धडपडती का लढती ? कधी आयोगी मागण्यांवर जन हे वेडे झुलती जन सवंग होऊन रस्त्यावरती फिरती अन्‌ गळ्यात फलका आवर्जूनी धरती ! जन उडाण संपाचे, नित्य पावसाते, का होते बेफाम, कसे चळवळते ! गडगडती, बडबडती, कधी फोडती, अडवती कधी धरणे मोर्च्याच्या नादात पार चिडती वळवळती सारखे शासना सहजच ना ते भुलती कधी मोक्याच्या चार अटींना जन हे अडून बसती ! जाणती परी ते नित्य नेमे का पिडती ? त्रासवी तरी त्यागाचा आ
काव्यरस

काहीच्या काही...

लेखक विमुक्त यांनी गुरुवार, 06/08/2009 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आला आला पावसाळा... सुरु झाल्या शाळा... जपा तुमच्या बाळा... swine flu ला घालू आळा... आहे आजार हा काळा... परदेश्यां मुळं पडला आपल्या गळा... सारा देश सोसतोय त्याच्या झळा... रात्री पालकांचा लागत नाही डोळा... मंत्र्यांचा भाषणांचा सोहळा... नुसता शब्दांचा खुळखूळा... त्यांचा होवो चोळामोळा... NIV करेलच उपाय गोळा... खरंतर आला होता कंटाळा... तेवढ्यात दिसला कागदाचा बोळा... म्हणून सुचला हा चाळा... चांगलं काही असेल तर हे वाचणं टाळा...

डंकर्कचे विद्धविवेचन

लेखक शरदिनी यांनी गुरुवार, 06/08/2009 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
इस्पिक राजा आणि किल्वर राणीचा सुकुमार धूम्रतरल सहवास बाहेर झिम्मड पाऊस नास्पतीची गळणारी पाने अन् मोक्याच्या क्षणी त्याची निरभ्र माघार न सोसणारं कदाचित अपेक्षांचं ओझं पण का व्हावी नेहमीच ही थुलथुलीत प्रतारणा? हे नातंच असं पोकळ रंग, गंध ना चव जणू हिंग उडालेली पोकळ बांधानी डबी मग फेकून द्याव्या सार्‍या सहवासखुणा अन् घेतले दिलेले मनातलेच अल्लड काहीबाही----------- ----------------------काहीबाही म्हणजे हेच--- -रुसवा फुगवा रुतला चावा
काव्यरस

(थांब ना ...)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 06/08/2009 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: प्राजुची कविता थांब ना आणि सध्या झालेली सर्दी. गळत आहे नाक माझे औषध झणी आण ना भिजले सगळे रुमाल आता तरी थांब ना जाहला डोक्यात कल्लोळ खालती मज पाहवे ना सांग कसा प्रतिसाद देऊ थोडे तरी थांब ना साचला आता प्रवाह प्रगती थोडी जाहली श्वास घेता श्रम जाहले व्हिक्स कुठे मज सांग ना उठता प्रभाती आवाज बंद वाकुल्या का काढीसी? स्वाईन फ्लूचा अंदाज घेसी जिव्हेस तुज हाड ना आवाज निघता मोद होई क्षणिक तोही मग ठरे राणीची* याद देसी क्रूरवक्त्या थांब ना संपल्या खाणाखुणा, या सर्दकालाच्या जरी दर्दभरे नाक सांगेल, ती कहाणी थांब ना

(थांब ना..)

लेखक चेतन यांनी गुरुवार, 06/08/2009 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजु ताईंची सुंदर कविता " थांब ना " http://misalpav.com/node/8842 वाचुन हे सुचले सर्द आहे खाट माझी, तू जरासा थांब ना दाटले रे मूक मय हे, सोबतीला थांब ना साठली गर्दी दुचाक्यांची चहू बाजूस या सापडे एखाद 'घर' ते, पाहूनी तू थांब ना एवढाही रेट नाही सांग ते रे मजकडे पाहुनी तारुण्य माझे, आज थोडा थांब ना रात्रवेळा होत आली, झोपल्या या बावळ्या भास्कराची माय निजली, रात्र तू रे थांब ना राहिले सारेच व्यापारी जगी हे पाहिले सापडे "फंटूश" येथे, या ठिकाणी थांब ना रंगल्या खाणा खुणा या, थुंकणार्‍याच्या जरी मोगरा/घोगरा सांगेल सारी, ही कहाणी थां
काव्यरस